डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? नागरिकांना फसवणाऱ्या नव्या सायबर फसवणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
व्हिडिओ कॉलद्वारे धमकावून पैसे उकळण्याचा प्रकार वाढला; 1930 वर तक्रार करण्याचे आवाहन

आजच्या डिजिटल युगामध्ये अनेक गोष्टींमुळे मानवाच्या आयुष्यामध्ये मोठे बदल झाले आहेत, पण याच डिजिटल युगामध्ये फसवणुकीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

सायबर क्रिमिनल हे वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य नागरिकांना फसवत असतात. कधी बँकेच्या नावाने तर कधी वेगवेगळ्या आकर्षक योजनांच्या नावाने. आणि यातील आणखी एक प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट.
हेही वाचा-हातपाय सुन्न होणे: सामान्य कारणे की गंभीर आजार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
हेही वाचा-तिरुपती बालाजी दर्शनासाठी नवीन पर्याय: ₹300 मध्ये मिळणार झटपट दर्शन, जाणून घ्या पूर्ण माहिती
यामुळे देखील मोठ्या प्रमाणात घाबरून लोकांची फसवणूक केली जाते. पण आज विधानसभेत हा मुद्दा गाजला आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर दिले. ते काय म्हणाले ते पाहूया.
डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमके काय?
सायबर क्रिमिनल एक वेगळीच पद्धत अवलंबतात. यामध्ये एका व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना पोलीस स्टेशन किंवा सीआयडी किंवा सीबीआय यांसारखे कार्यालय तयार करून तेथे एखादा वर्दीवाला माणूस बसवला जातो व तो कडक शब्दांमध्ये नागरिकांना धमकावतो.
https://youtu.be/qk6zuPGFa7o?si=L9Q2D8KAsozZLE7y
यामध्ये प्रामुख्याने “तुम्ही कुठले तरी पार्सल मागवले, त्यामध्ये काही घातक गोष्टी होत्या आणि यामुळे तुम्हाला तुमच्या जागेवरच डिजिटल अरेस्ट केले गेले आहे. आता तुम्हाला हलता येणार नाही, तुम्हाला
कोर्टात जाऊन जामीन घ्यावा लागेल आणि तुम्हाला अटक करायला पोलीस येणार आहेत” अशा पद्धतीची धमकी दिली जाते. आणि या धमकीला बळी पडणारे आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ नये
म्हणून विनवणी करतात आणि येथेच सायबर क्रिमिनल त्यांच्याकडून पैशाची मागणी करतात. या मागणीमध्ये मागितलेले पैसे ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतले जातात आणि नागरिकांची मोठी फसवणूक होते. यालाच डिजिटल अरेस्ट असे सायबर क्रिमिनलने नाव दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की डिजिटल अरेस्ट करता येत नाही, तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. अशा पद्धतीचा जर तुम्हाला फोन आला
तर घाबरू नका व तसेच त्वरित 1930 या टोल फ्री नंबरवर कॉल करा व आपली तक्रार नोंदवा. जर सायबर क्रिमिनलद्वारे तुमची फसवणूक झाली असेल, तरीसुद्धा त्वरित आपण याच नंबरवर आपली तक्रार दाखल करू शकता. कारण की सगळ्या बँकांशी सरकारचा संपर्क आहे,
त्यामुळे जे पैसे बँकेत ट्रान्सफर केले गेलेले आहेत ते तुम्हाला परत मिळू देखील शकतात, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच हे सायबर क्रिमिनल अकाउंटमध्ये पैसे आल्यानंतर
लगेच कुठल्यातरी बाहेर देशातील, ज्या देशांसोबत आपला करार नाही अशा देशांमध्ये पैसे ट्रान्सफर करतात आणि ते पैसे परत आणणे अवघड जाते. त्यामुळे असे काहीतरी घडल्यास आपण त्वरित 1930 नंबरवर कॉल करावा.
डिजिटल युगामध्ये आपली फसवणूक टाळायची असेल तर आपल्याला याबाबतीत सखोल माहिती असणे गरजेचे असते. यासंदर्भामध्ये केंद्र शासन तसेच राज्य शासन वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असते.
त्यामुळे आपणही सायबर क्रिमिनलांच्या कुठल्याही धमकीला किंवा आमिषाला बळी पडू नये, एवढीच अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करतो.
आपण देखील सायबर क्रिमिनलांच्या धमक्यांना किंवा आमिषाला बळी पडू नये आणि काही अडचण आल्यास न घाबरता 1930 या टोल फ्री नंबरवर संपर्क करावा.







