1 जुलै 2026 पासून बदलणार हे 7 मोठे नियम.
1 जुलै 2026 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. LPG दर, UPI द्वारे PF पैसे, HDFC क्रेडिट कार्ड, पासपोर्ट शुल्क, रेल्वे दंड आणि आयकर रिटर्नच्या मुदतीबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती.

1 July 2026 New Rules
New Rules 1 July 2026 – या १ जुलैपासून काही सरकारी नियमांमध्ये बदल होणार
प्रत्येक महिन्याला काही नियम बदलत असतात, तर काही नवीन नियम लागू होत असतात.
त्यामुळे सर्वांचे लक्ष १ तारखेकडे लागलेले असते. १ जुलै रोजी कोणत्या
नियमांमध्ये बदल होणार आहे, त्याविषयी आपण चर्चा करूया.
या १ जुलैपासून काही सरकारी नियमांमध्ये बदल होणार आहे. हे सर्व नियम संपूर्ण देशासाठी लागू असतील.
या नियमांचा नेमका परिणाम आपल्या आयुष्यावर काय होईल, ते आपण समजून घेऊया.
या नवीन नियमांमध्ये UPI द्वारे पैसे काढण्यापासून ते क्रेडिट कार्डचे नियम आणि वाढीव
पासपोर्ट शुल्कापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. १ जुलैचा तुमच्या आर्थिक
स्थितीवर आणि जीवनावर कसा परिणाम होईल, हे आपण सविस्तरपणे पाहूया.
आयकर भरण्याची शेवटची तारीख?
(ITR Last Date 2026)
बिना ऑडिट भरला जाणारा टॅक्स, म्हणजेच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांद्वारे भरला जाणारा
इन्कम टॅक्स भरण्याची शेवटची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॅपिटल गेन,
मालमत्ता खरेदी तसेच इतर स्वरूपातील नॉन-बिझनेस उत्पन्नाचे ऑडिट करण्याची गरज नसते.
अशा करदात्यांसाठी आयकर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.
तरी सर्व नोकरदार वर्गाने आपला इन्कम टॅक्स वेळेत भरून घ्यावा.

एलपीजीच्या दरामध्ये बदल होणार?
(LPG Price July 2026)
प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या दरांचे पुनरावलोकन केले जाते.
यामध्ये दर वाढू किंवा कमी होऊ शकतात. मागील काही महिन्यांमध्ये संपूर्ण जगात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि
एलपीजीचा पुरवठा कमी झाल्यामुळे एलपीजीचे दर वाढले होते. मात्र, आता युद्ध
थांबल्यामुळे आणि एलपीजीचा पुरवठा पूर्ववत झाल्यामुळे सरकार एलपीजीचे भाव कमी करू शकते.
हे ही वाचा-पायऱ्या चढताना गुडघे दुखतात? डॉक्टरांनी सांगितली सांध्यांच्या नुकसानीची सुरुवातीची लक्षणे
एचडीएफसी क्रेडिट कार्डचे नियम बदलणार
(HDFC Credit Card New Rules)
नवीन आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही १ जुलैपासून सुरू होत आहे.
या निमित्ताने एचडीएफसी बँक आपल्या काही प्रमुख क्रेडिट कार्डांच्या अटींमध्ये सुधारणा करत आहे.
नवीन नियमांनुसार, देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आता प्रत्येक
तिमाहीत खर्चाची नवीन मर्यादा पूर्ण करावी लागेल. या धोरणानुसार,
पुढील तिमाहीत मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठी
ग्राहकांना मागील तिमाहीत किमान ₹६०,००० खर्च करणे आवश्यक असेल.
हेही वाचा-हॉटेलमध्ये जेवायला जाता? तुकाराम मुंढे यांनी सांगितलेले हे 6 नियम प्रत्येक ग्राहकाने जाणून घ्यावेत
पीएफचे पैसे आता यूपीआयद्वारे काढता येणार?
(UPI PF Withdrawal)
कर्मचारी भविष्य निधी अर्थात पीएफचे पैसे आता यूपीआयद्वारेही काढता येणार आहेत.
कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे.
हा प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे सहजपणे यूपीआयद्वारे काढता येतील.
त्यामुळे पीएफचे पैसे मिळण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार नाही, तर काही मिनिटांतच पैसे मिळू शकतील.
पासपोर्टच्या शुल्कामध्ये वाढ
(Passport Fee Increase 2026)
सरकारने पासपोर्टच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. मागील एक दशकापासून या शुल्कात वाढ
करण्यात आलेली नव्हती. ३६ पानांचा नवीन पासपोर्ट काढण्यासाठी किंवा त्याचे
नूतनीकरण करण्यासाठी लागणारे शुल्क पूर्वी ₹१५०० होते, ते आता वाढून ₹२५०० झाले आहे.
तसेच, तात्काळ पासपोर्टसाठी पूर्वीचे शुल्क ₹३५०० होते, ते आता ₹५००० करण्यात आले आहे.
म्हणजेच, नवीन पासपोर्ट किंवा नूतनीकरणासाठी ₹१००० अधिक
मोजावे लागतील, तर तात्काळ पासपोर्टसाठी ₹१५०० अधिक द्यावे लागतील.
रेल्वेमधील दंडात वाढ?
(Railway Fine New Rules)
विनातिकीट प्रवास करणे, रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणे अशा नियमांचे
उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारला जातो. या दंडामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
जर एखादा प्रवासी विनातिकीट प्रवास करत असेल, तर त्याला तिकिटाच्या दुप्पट
किंवा किमान ₹२५० दंड भरावा लागत होता. तो आता वाढवून ₹५०० करण्यात आला आहे.
तसेच, महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये पुरुषांनी प्रवास केल्यास त्यांना आता ₹२५०० दंड भरावा लागेल.
तुम्ही तुमचे ओळखपत्र मोफत अद्ययावत करू शकता
नागरिकांना मोठा दिलासा देत सरकारने पुढील काही महिन्यांसाठी ऑनलाइन
ओळखपत्र अद्ययावत करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत केली आहे. यापूर्वी पोर्टलवर नाव,
पत्ता किंवा इतर तपशील दुरुस्त करण्यासाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी शुल्क आकारले जात होते.
मात्र, आता या मोफत सुविधेचा लाभ घेऊन नागरिक आपली महत्त्वाची
ओळखपत्रे कोणत्याही खर्चाशिवाय सहजपणे अद्ययावत करू शकतात.
निश्चितच, या नियमांचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल. गॅसच्या किमती
कमी झाल्यास त्याचाही लाभ ग्राहकांना मिळेल. युद्ध संपल्यामुळे एलपीजी
ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तसेच, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.







