मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनची जोरदार चर्चा! अवघ्या 1 तास 55 मिनिटांत प्रवास शक्य?
रेल्वे ॲटलास नकाशामध्ये प्रस्तावित मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गाचा समावेश; पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूरमार्गे धावणार हायस्पीड ट्रेन

- “मुंबई ते हैदराबाद फक्त 1 तास 55 मिनिटांत!”
- “2 तासांच्या आत मुंबई ते हैदराबाद प्रवास”
- “पंढरपूरचा विकास आता झपाट्याने?”
- “देशाला मिळणार दुसरी बुलेट ट्रेन?”
Mumbai Hyderabad Bullet Train
महाराष्ट्राला आणखीन एक बुलेट ट्रेन मिळणार असल्याची चर्चा आहे. मुंबई-हैदराबाद(Mumbai Hyderabad Bullet Train)या प्रस्तावित बुलेट ट्रेनला मंजुरी मिळाली असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. रेल्वे ॲटलास या नकाशात तिचा समावेश करण्यात आला आहे.

प्राथमिक आराखड्यानुसार प्रस्तावित असलेल्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गाचा समावेश आता रेल्वे ॲटलास नकाशात करण्यात आला आहे. प्रस्तावित हायस्पीड बुलेट ट्रेन फक्त 1 तास 55 मिनिटांमध्ये मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करेल.
हेही वाचा-पेट्रोल पंपावर मिळतात या 6 मोफत सुविधा; जाणून घ्या ग्राहकांचे कायदेशीर अधिकार
हेही वाचा-वाढते वजन ठरू शकते धोकादायक! वजन कमी करण्यासाठी या सोप्या टिप्स आजच अवलंबा
बुलेट ट्रेनचा मार्ग कसा असेल?
रेल्वे ॲटलासमध्ये दाखविलेल्या नकाशाप्रमाणे मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग प्राथमिक आराखड्यानुसार पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, कर्नाटकातील कलबुर्गी आणि विकाराबाद जंक्शन या ठिकाणांवरून हैदराबाद येथे जाईल. हा मार्ग प्रस्तावित असून याला परवानगी मिळण्याची देखील चर्चा आहे.
प्रवासाला वेळ किती लागणार?
- प्रस्तावित मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. हायस्पीड ट्रेन असल्यामुळे फक्त दोन तासांच्या आत मुंबई ते हैदराबाद प्रवास करणे शक्य होणार आहे. पुणे-मुंबई हा प्रवास अवघ्या 48 मिनिटांमध्ये पूर्ण करता येईल, तर मुंबई-हैदराबाद प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 तास 55 मिनिटे लागतील.
तसेच पुणे ते सोलापूर हे अंतर पार करण्यासाठी बुलेट ट्रेनला दीड तास लागतील. एवढ्या कमी वेळेमध्ये बुलेट ट्रेनने हा प्रवास करणे शक्य होणार आहे. आज मुंबई ते हैदराबाद जाण्यासाठी जवळपास आठ ते दहा तास लागतात. तोच प्रवास आता दोन तासांत करणे शक्य होणार आहे.
बारामती, सोलापूर, पंढरपूर चा विकास होणार
प्रस्तावित बुलेट ट्रेन बारामती, पंढरपूर, सोलापूर या मार्गाने कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करेल. बुलेट ट्रेन सुरू झाल्यामुळे या शहरांचा विकास झपाट्याने होईल. विशेष करून महाराष्ट्रात तसेच देशभरामध्ये पंढरपूरचे महत्त्व विठुरायामुळे अधिक आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे हे आराध्य दैवत आहे. आता मुंबईकरांना पंढरपूरला जाण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागेल. त्यामुळे संबंधित ठिकाणांच्या विकासाला चालना मिळेल.
महाराष्ट्राला व देशाला दुसरी बुलेट ट्रेन मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांनी देखील मागील काही दिवसांपूर्वी मुंबई-हैदराबाद हा प्रवास फक्त दोन तासांच्या आत होईल, त्याविषयी काम सुरू असल्याचे सांगितले होते. अद्यापही हा बुलेट ट्रेन मार्ग प्रस्तावितच आहे.







