बिहार विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत?
बिहार विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण

बिहार विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण; एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले. मतदानानंतर लगेच आलेल्या विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. अनेक रेकॉर्डब्रेक सभादेखील या निवडणुकीच्या काळात पाहायला मिळाल्या. मुख्य लढत एनडीए आणि महाविकास आघाडी यांच्यात होती. बिहारमधील मतदारांनी रेकॉर्डब्रेक मतदान केले.
अनेक ऑपिनियन पोल्समध्ये सत्ता परिवर्तनाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, परंतु एक्झिट पोल्सचे आकडे मात्र उलट चित्र दाखवत आहेत.
सत्ताधारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि इतर मित्रपक्ष पुन्हा एकदा सत्तेत परतताना दिसत आहेत. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी केले होते. त्यांचा प्रभाव या एक्झिट पोल्समध्ये स्पष्टपणे दिसून येतो. मात्र काँग्रेसची स्थिती जवळपास तशीच राहील असे आकडे दर्शवतात.
तेजस्वी यादव यांनी पहिल्या टप्प्यानंतर वाढलेले मतदान आमच्याच फायद्याचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु एक्झिट पोल्सचे निकाल त्यांच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळे ठरले. मागील काही महिन्यांतील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निर्णयांमुळेच हा बदल घडल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हे आकडे एक्झिट पोल्सचे आहेत; १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच खरे निकाल स्पष्ट होतील. तथापि, या आकड्यांमुळे एनडीए ला काहीसा आनंद आणि महाविकास आघाडीला मात्र चिंतेत टाकणारा आहे?
हेही वाचा-रेकॉर्ड ब्रेक हरभरा उत्पादनासाठी योग्य लागवड पद्धत
हेही वाचा-बँक लॉकर खरंच सुरक्षित आहेत का?
🏛 २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल
२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल बहुतेक एक्झिट पोल्सच्या अंदाजांच्या विरुद्ध होते. एनडीएने १२५ जागा जिंकल्या आणि ३७.२६% मते मिळवली, ज्यामुळे कमी बहुमताने सरकार स्थापन झाले. महाआघाडीने ११० जागा आणि ३७.२३% मते मिळवली.
त्या निवडणुकीत भाजप एनडीए आघाडीतील सर्वात मजबूत पक्ष म्हणून उदयास आला. भाजपने ७४ जागा जिंकल्या, तर नितीश कुमार यांच्या जेडीयूने ४३ जागा मिळवल्या. मित्रपक्ष व्हीआयपी आणि एचएएमने प्रत्येकी चार जागा जिंकल्या.
आरजेडीने ७५ जागा, काँग्रेसने १९ जागा आणि डाव्या पक्षांनी एकत्रितपणे १६ जागा जिंकल्या. एआयएमआयएमने ५ जागा जिंकल्या. बसपा, एलजेपी आणि अपक्षांना प्रत्येकी १ जागा मिळाली.
📊 २०२५ मध्ये एक्झिट पोल्सने वर्तवलेला अंदाज
एनडीएला -140 ते 150 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे
महाविकास आघाडी-85-95 जागा मिळण्याचा अंदाजा व्यक्त केला आहे
जे एस पी -0 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे
इतर -5 ते 10 जागा मिळण्याचा अंदाजा व्यक्त केला आहे
नोट- सदरील एक्झिट पोल हा विविध वृत्तवाहिन्या व संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल च्या एकंदरीत अंदाजावरून वरील जगाचा अंदाजा व्यक्त केला आहे







