
सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणखी एक
धक्का बसण्याची शक्यता आहे. नेमकं पडद्यामागे काय घडतंय आणि
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या अडचणीत वाढ का होणार आहे, ते पाहूया.

काही दिवसांपूर्वी झालेल्या उबाठा गटाच्या सहा खासदारांच्या बंडखोरीचा मुद्दा गाजत
असतानाच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षापुढे एक नवे आव्हान उभे राहिले आहे.
या पक्षाचे लोकसभेमधील कार्यालय त्यांना रिकामे करावे लागू शकते, अशी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा-दात घासताना या ४ चुका टाळा! दंतवैद्यांनी दिला महत्त्वाचा इशारा
सहा खासदारांनी पक्ष सोडला
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
यामुळे लोकसभेत नऊ खासदार असलेल्या पक्षाचे संख्याबळ आता केवळ तीन खासदारांवर आले आहे.
हा उद्धव ठाकरे यांना बसलेला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
है ही वाचा-विधिमंडळात ‘वंदे मातरम्’ची परंपरा कोणी सुरू केली? भाई केशवराव धोंडगे यांच्या ऐतिहासिक मागणीची कहाणी
गेल्या आठवडाभरात कोणता खासदार पक्ष सोडणार आणि कोणता नाही, याबाबत चर्चा सुरू होत्या.
जेव्हा या खासदारांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याच सहा
खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे ठरवले.
लोकसभेतील पक्ष कार्यालय जाणार?
उबाठा गटाकडे लोकसभेमध्ये एकूण नऊ खासदार विजयी झाले होते. मात्र,
आता सहा खासदारांनी पक्षाला रामराम केल्यामुळे ही संख्या केवळ तीनवर आली आहे.
संसद भवनामध्ये कार्यालय असण्यासाठी त्या पक्षाकडे किमान पाच खासदार असणे आवश्यक असल्याची चर्चा आहे.
आता उबाठा गटाकडे केवळ चारच खासदार उरले असल्याने संसदेतील
कार्यालय परत घेतले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.
मात्र, लोकसभा सचिवालयाकडून किंवा राज्यसभा सचिवालयाकडून अद्याप
असा कोणताही अधिकृत आदेश देण्यात आलेला नाही. तरीही याबाबत चर्चा रंगत आहे.
संसद परिसरातील संविधान सदनामध्ये तिसऱ्या मजल्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाचे कार्यालय आहे. आता हेच कार्यालय वाचविण्याचे आव्हान पक्षासमोर उभे राहिले आहे.
कारण ज्या पक्षाकडे किमान पाच खासदार असतात, त्यांनाच संसद परिसरामध्ये कार्यालय मिळते.
मात्र, खासदारांची संख्या कमी झाल्यामुळे हे कार्यालय जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
सध्या लोकसभेमध्ये तीन आणि राज्यसभेमध्ये एक असे एकूण चारच खासदार या पक्षाकडे आहेत.
या संदर्भात लवकरच लोकसभा सचिवालयाकडून कार्यालय रिकामे
करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
उबाठा गटाच्या सहा खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
“ऑपरेशन टायगर” यशस्वी झाल्याची घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
हा उबाठा गटाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे
आता कार्यालय जाण्याची वेळदेखील या गटावर येऊ शकते.







