अपमान ते मुख्यमंत्रीपद! विजय थलपती यांच्या यशामागची प्रेरणादायी कहाणी
जयललिता यांच्याकडून झालेल्या अपमानानंतर विजय थलपती यांनी घेतला राजकारणात उतरण्याचा निर्णय; पहिल्याच निवडणुकीत 108 जागांवर विजय

Vijay Thalapathy Success Story
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये विजय जोसेफ उर्फ विजय थलपती यांनी खरोखरच चमत्कार केला असे म्हणावे लागेल, कारण की आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 108 जागा विजय थलपती यांनी निवडून आणल्या व ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री देखील झाले.

पण यामागे एक कारण आहे, ज्यामुळे सुपरस्टार असलेले विजय थलपती यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. कारण होता त्यांचा झालेला एक अपमान. या अपमानामुळेच विजय राजकारणात सक्रिय झाले आणि मुख्यमंत्री देखील झाले.
हेही वाचा-पेट्रोल पंपावर मिळतात या 6 मोफत सुविधा; जाणून घ्या ग्राहकांचे कायदेशीर अधिकार
हेही वाचा-उष्माघातापासून वाचण्यासाठी खिशात कांदा ठेवा? सिंधिया यांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण
आधी अभिनेता आणि त्यानंतर यशस्वी राजकारणी अशी अनेक उदाहरणे आपल्याला देशातील राजकारणात पाहायला मिळतात. अनेक चित्रपट अभिनेते राजकारणात येऊन थेट मुख्यमंत्री देखील झाले. याचमध्ये आणखी एक नाव जोडले गेले ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांचे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक यामुळेच विजय राजकारणात आले.
https://youtu.be/wr_S21wEvg4?si=WSw1xXrcYPx4aOJZ
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याकडून अपमान
वर्ष होते 1993. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या स्वर्गीय जयललिता आणि त्याच वेळेला तामिळनाडू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार होता विजय थलपती. त्यावेळी विजय यांची लोकप्रियता खूप जास्त होती. त्यांचे चित्रपट एकामागून एक यशस्वी होत होते आणि
अशातच विजय थलपती यांचा बहुचर्चित चित्रपट ‘थलायवा’ रिलीज होणार होता. पण या ‘थलायवा’ नावासोबत आणखी एक टॅगलाईन होती ‘टाईम टू लीड’. याचा अर्थ होतो सत्ता हातात घेणे आणि हीच टॅगलाईन जयललिता यांच्या पक्षातील काही बड्या नेत्यांना आवडली नाही.
त्यांनी असा अंदाज बांधला की विजय आता राजकारणात येणार. त्यांची लोकप्रियता पाहता हे जयललिता यांच्या पक्षासाठी जड जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली.
जयललिता यांच्या पक्षाचे टेन्शन वाढले होते. काय करावे ते कळत नव्हते आणि अशातच एक धमकी असलेला फोन आला. त्यानंतर तत्कालीन जयललिता सरकारने या चित्रपटावर राज्यात बंदी घातली. हा चित्रपट विजय थलपती
यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता, कारण की हा चित्रपट जर रिलीज झाला नसता तर विजय थलपती अक्षरशः रस्त्यावर आले असते. त्यामुळे विजय प्रचंड तणावाखाली आले आणि त्यांनी थेट जयललिता यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला
व त्यांना आपली बाजू पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जयललिता यांचे कार्य दाखवले, पण काहीतरी कारण सांगून जयललिता यांनी विजय थलपती यांची भेट नाकारली.
विजय प्रचंड तणावाखाली आले. काय करावे ते कळत नव्हते आणि त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू जनतेसमोर मांडली. त्यानंतर जयललिता सरकारने ती टॅगलाईन हटवून चित्रपट रिलीज करण्याचा सल्ला दिला
आणि प्रत्यक्षात तसेच घडले. ‘टाईम टू लीड’ ही टॅगलाईन हटवून फक्त ‘थलायवा’ या नावाने चित्रपट रिलीज केला गेला. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला, पण जयललिता यांनी भेट नाकारल्याचे विजय यांना आवडले नाही, अशी चर्चा तेव्हा होती. कदाचित तेव्हाच विजय यांनी एक दिवस मीही तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार असे ठरवले असेल.
विजय थलपती यांची राजकारणात एन्ट्री
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले विजय थलपती यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला व 2024 साली त्यांनी टी.व्ही.के. या पक्षाची स्थापना केली. संपूर्ण तामिळनाडू अक्षरशः पिंजून काढत त्यांनी जनतेसमोर आपले मुद्दे मांडायला सुरुवात केली. त्यामुळे राजकारणात देखील विजय थलपती प्रचंड यशस्वी होऊ लागले. त्यांचे मुद्दे लोकांना पटू लागले.
त्यानंतर पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या. यामध्ये तामिळनाडूचाही समावेश होता. एम. के. स्टॅलिन यांची सत्ता हटवत विजय यांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये तब्बल 108 जागा जिंकल्या व ते किंगमेकर नाही तर किंगच्या भूमिकेमध्ये जनतेसमोर आले. काँग्रेस व इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे विजय यांनी तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केली व ते मुख्यमंत्री देखील झाले. असा हा प्रेरणादायी प्रवास विजय थलपती यांचा आहे.
आयुष्य जगत असताना बऱ्याच वेळेला आपला अपमान होतो, पण अपमानाचा बदला हा यशाने घेणे कधीही चांगले असते. एका इंग्लिश म्हणीप्रमाणे ‘यशस्वी होणे म्हणजे सर्वात मोठा बदला’. असेच काही स्वप्न पाहून विजय थलपती थेट तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले.
आपण देखील आयुष्यामध्ये यशस्वी होऊनच बदला घेतला पाहिजे. ज्या लोकांनी आपल्यावर टीका केली, ज्यांनी आपला अपमान केला त्यांना उत्तर हे यशानेच मिळाले पाहिजे. त्याची मजा काही औरच असते. विजय
यांचा हा प्रेरणादायी प्रवास निश्चित तुम्हाला आवडला असेल. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून अहोरात्र मेहनत केल्यास यश हे नक्कीच मिळते, हे या गोष्टीवरून सिद्ध होते.







