Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

लोहा शहरात पाणीच पाणी पंचशील कांबळे,बी.डी. जाधव सर,गजानन दांगटे मदतीला धावले

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट

Advertisment

नांदेड जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरले. मात्र यावेळी अनेक जण लोकांच्या मदतीसाठी धावून आले. यामध्ये ॲड. पंचशील कांबळे, बी.डी. जाधव सर आणि गजानन दांगटे यांचा समावेश आहे.

 

Advertisement

सकाळपासूनच लोहा तालुक्यामध्ये तसेच लोहा शहरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून दुकानांमध्ये देखील पाणी घुसले आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे तसेच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. अशा या कठीण काळामध्ये अडचणीत अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी काही समाजसेवकांनी स्वतः पाण्यात उतरून मदत करण्याचे ठरविले. अगदी सकाळी पाच वाजल्यापासून मदतीसाठी लोहा शहरात व परिसरात अनेक जण उतरले. त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया.

Advertisement

 

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट

 

काल रात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोहा तालुक्यातील व शहरातील नाल्यांना पूर आला आहे. ही परिस्थिती पाहण्यासाठी लोहा-कंधार तालुक्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भर पावसात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. लोहा शहरातील विविध ठिकाणी जाऊन जनतेशी संवाद साधला. तसेच सुनेगाव येथे जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला व प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.

 

याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की लोहा व कंधार तालुक्यातील जनतेला प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश दिले. भर पावसात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यामुळे जनतेने समाधान व्यक्त केले.

 

 

 

ॲड. पंचशील कांबळे

 

नांदेड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व व लोहा नगरपालिकेचे नगरसेवक, तसेच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे निकटवर्तीय ॲड. पंचशील कांबळे यांनी सकाळी लवकर बालाजी मंदिर परिसरात जाऊन पाल टाकून राहणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांशी संपर्क साधला. त्यांच्या पालांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाण्यात उतरून कांबळे यांनी त्यांना सुरक्षित जागी हलवले. तसेच त्यांच्या गृहउपयोगी वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्या.

 

यानंतर त्यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर माननीय तहसीलदारांशी संपर्क साधून पंचनामे करण्याची व नुकसानभरपाई देण्याची विनंती केली. पंचशील कांबळे यांच्या पुढाकारामुळे न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या पालामध्ये राहणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आणि त्यांचे आभार मानले. कांबळे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून पालांमध्ये राहणाऱ्या लोकांची बिकट परिस्थिती सर्वांसमोर आणली.

 

 

 

बी. डी. जाधव सर

 

लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचे निवृत्त शिक्षक बी. डी. जाधव सर हे समाजकार्यामध्ये अग्रेसर आहेत. या बिकट परिस्थितीतही त्यांनी पाण्यात उतरून घरांमध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांना मदत केली. तसेच लोहा शहरालगतच्या सुनेगाव गावातील दलित वस्तीमध्ये पाणी शिरल्याची माहिती प्रशासनाला व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दिली.

हे ही वाचा –खाजगी शाळांमध्ये गरीब मुलांसाठी मोफत शिक्षणाचा मार्ग मोकळा

हे ही वाचा –नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू; ७ तासांत प्रवास

 

यानंतर आमदार चिखलीकर यांनी प्रत्यक्ष भागाचा दौरा केला. यावेळी बी. डी. जाधव सर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आणि शेती व घराचे नुकसान भरून काढण्याची मागणीही केली. त्यांच्या पुढाकारामुळे सुनेगाव गावातील पूरस्थिती ही सर्वांसमोर आली.

 

 

गजानन दांगटे

 

गजानन दांगटे हे लोहा तालुक्यातील प्रसिद्ध युट्युबर व रील स्टार आहेत. वेळोवेळी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडतात. आजही लोहा शहरातील अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याची वास्तवस्थिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणली.

 

लोहा शहरातील पुरस्थितीचे सविस्तर विश्लेषण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले. त्यामुळे लोहा शहरातील नागरिकांनी गजानन दांगटे यांचे आभार मानले. सोशल मीडियाच्या मदतीने जनतेचे प्रश्न सर्वांसमोर आणता येतात हे त्यांनी दाखवून दिले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button