Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

साखरच नाही तर किचनमधील या 4 वस्तूही महागल्या; वाढत्या दरांचा तुमच्या खिशावर मोठा परिणाम

साखरेचा दर 70 रुपये किलोवर पोहोचला असताना डाळ, खाद्यतेल आणि कांद्याच्या किमतीतही वाढ; सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचा खर्च वाढण्याची शक्यता

Advertisment

साखरेचे वाढते भाव

साखरेचे भाव 70 रुपये प्रति किलो झाले आहेत, त्यामुळे सामान्य ग्राहक चांगलाच चिंतेत पडला आहे.

Advertisement

पण तुम्हाला माहिती आहे का की साखरेसोबतच आणखी काही गोष्टींचे भाव वाढले आहेत?

Advertisement

याबाबत चर्चा होत नाही. नेमके कोणत्या वस्तूंचे भाव मागील काही महिन्यांमध्ये वाढले आहेत

आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशाला कसा होणार आहे, त्याविषयी माहिती जाणून घेऊया.

साखरेचे वाढते भाव
किचन मधील या खाद्य वस्तू महागल्या

साखर सत्तर रुपये किलो झाल्यामुळे सध्या सर्वत्र याची चर्चा चालू आहे. पण आपल्या किचनमधील आणखी काही गोष्टींच्या

दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नेमक्या त्या कोणत्या वस्तू आहेत, ते आपण पाहूया.

 

डाळ देखील महागली

 

गेल्या वर्षी देखील मान्सून व्यवस्थित राहिला नाही, म्हणून डाळींच्या किमती वाढल्या होत्या.

त्यातच मागील काही महिन्यांमध्ये गायींच्या किमती तीन ते चार रुपयांनी वाढल्या आहेत.

हें ही वाचा-पाकिटावरील FSSAI नंबरचा खरा अर्थ काय? १४ अंकांमध्ये दडलेली आहे महत्त्वाची माहिती, असा करा नंबर चेक

यंदा देखील अल निनोच्या परिणामामुळे मान्सून कमी राहण्याची शक्यता आहे.

आणि असे झाल्यास यंदा देखील डाळींचे उत्पादन देशामध्ये कमी होणार असल्याची चर्चा आहे.

त्याचा थेट परिणाम डाळींच्या भावावर होणार आहे. आयात केलेली डाळ

ही देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या डाळींपेक्षा निश्चितच महाग असेल. त्याचाही परिणाम यंदा आपल्याला दिसू शकतो.

 

साखर 70 रुपये पार

 

साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. साखर सध्या देशातील अनेक भागांमध्ये सत्तर रुपये प्रति किलो एवढ्या दराने

मिळत आहे. इथेनॉलच्या उत्पादनामुळेच साखरेचे उत्पादन घटले असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

हे ही वाचा-मंगळावर ‘एलियन’ दिसले?नासाने केले फोटो शेअर

पण केंद्र शासनाने याबाबतीत स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की इथेनॉलमुळे साखरेचे उत्पादन कमी झालेले नाही.

 

मागील आठवड्यामध्ये साखरेच्या दरांमध्ये सात रुपये प्रति किलो एवढी वाढ झाली.

तर आपण महिन्याचा विचार केला तर गेल्या महिन्यांमध्ये साखर सतरा रुपये प्रति किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात महागली आहे.

साखरेच्या वाढलेल्या किमती कमी व्हाव्यात यासाठी सरकार यंदाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याच्या विचारात आहे.

सरकारकडून देशात साखरेचा पुरवठा वाढवण्यावर भर दिला जात आहे. देशात साखरेचा तुटवडा तयार झाला असून,

एका साखर निर्यातदार देशाला साखर परदेशातून आयात करण्याची वेळ आली आहे.

तरीही या सणासुदीच्या दिवसांसाठी देशांतर्गत साठा उपलब्ध असून, साखर वितरकांना सरकारच्या निर्देशाप्रमाणे स्वतःकडे

ठराविक साठाच ठेवता येणार आहे. आता मोठे सण येणार आहेत,

त्यामुळे साखरेची मागणी देखील वाढणार आहे. या समस्येवर सरकार काय मार्ग काढते, ते पाहावे लागेल.

 

खाद्य तेलाच्या किमतीही वाढल्या

 

डाळी आणि साखरेप्रमाणेच खाद्यतेलाच्या किंमतीमध्येही दोन ते तीन टक्के वाढ झाली आहे आणि याला कारण आहे पाम

ऑइलच्या किमतीमध्ये झालेली वाढ. सध्या पाम ऑइलचे भाव 20 महिन्यांच्या उच्चांकावर आहेत.

 

जगामध्ये सर्वात जास्त पाम ऑइलची निर्यात इंडोनेशिया हा देश करतो. पण गेल्या वर्षी इंडोनेशियामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे

पाम ऑइलचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचाही परिणाम भारतीय बाजारपेठेवर पाहायला मिळत आहे.

 

कांदाही महागला

 

मागील महिन्यामध्ये कांद्याच्या देखील किमतीमध्ये पाच ते सहा रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.

नवीन कांदा बाजारपेठेमध्ये यायला उशीर झाल्यामुळेच कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

 

साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारी स्तरावर काही निर्णय घेतले जाणार आहेत,

अशी सध्या चर्चा आहे. कारण येणाऱ्या काळात असलेल्या सणांमुळे

साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर सरकार काय पावले उचलते, ते पाहावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button