- शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची संधी?
- बिहार निवडणुकीचा जय-पराजय भाजपासाठी डोकेदुखी ठरणार?
- शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळू शकते?
- बिहार निवडणुकीचा महाराष्ट्रावर परिणाम?
बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर; महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार परिणाम?
बिहार निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या असून.नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका पार पडतील आणि निकालही लागतील.
परंतु बिहार निवडणुकीचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या राजकारणावरही दिसू शकतो.
या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याची एक संधी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सध्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत.
आजपासून बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका आणि निकाल होणार असून या निकालांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो, अशी सध्या चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर असा अंदाज वर्तवला जात आहे की महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे देशाचे पुढील राष्ट्रपती होऊ शकतात.

बिहार निवडणुकीचा जय-पराजय भाजपासाठी डोकेदुखी ठरणार?
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचे सरकार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत जाऊन सरकार स्थापन केले होते,
परंतु नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करून पुन्हा सरकार स्थापन केले.
नितीश कुमार यांच्या पक्षाचा परंपरागत मतदार वर्ग हा मुस्लिम समाज आणि यादव समाज आहे.
भारतीय जनता पक्षाची हिंदुत्ववादी विचारधारा मात्र बिहारमधील मुस्लिम समाजाला पसंत पडणार नाही, अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी सतत बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
जर मुस्लिम मतदार नितीश कुमार यांच्या पक्षापासून दूर गेला, तर याचा फटका त्यांना मोठा बसू शकतो आणि त्यांच्या सत्तेवर संकट येऊ शकते.
अशा परिस्थितीत नाराज झालेले नितीश कुमार केंद्रातील मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेऊ शकतात.
हे हि वाचा –२ वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका – सरकारचा इशारा
सध्या केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार दोन सहयोगी पक्षांच्या भरवशावर चालत आहे.
यामध्ये लोकसभेत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाचे 16 खासदार आणि नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) चे 12 खासदार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे 240 खासदार आहेत.
जर बिहार निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी पाठिंबा काढून घेतला, तर केंद्र सरकार अल्पमतात येऊ शकते.
तर दुसऱ्या बाजूला, जर बिहारची निवडणूक भाजप आणि जनता दल (युनायटेड) यांनी जिंकली, तर मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता आहे.
जनता दल (युनायटेड) ची इच्छा असेल की मुख्यमंत्री पुन्हा एकदा नितीश कुमार व्हावेत,
तर भारतीय जनता पक्षाने जास्त जागांवर लढल्यामुळे त्यांचे अधिक आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.
अशा वेळी भाजपचे आमदार त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करू शकतात.
तथापि, सत्तेची चावी ही नितीश कुमार यांच्या हातातच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवले नाही, तर ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बिहार निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण त्यामुळे भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.

शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळू शकते?
बिहार निवडणुकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीएतून बाहेर पडतील आणि मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेतील, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.?
असे झाल्यास केंद्रातील अल्पमतात आलेल्या मोदी सरकारला शरद पवार यांच्या 8 खासदारांचा पाठिंबा लागेल.
त्या वेळी शरद पवार पाठिंबा देतील की नाही, हे सांगता येत नाही.
परंतु शरद पवार यांना देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याची इच्छा लपलेली नाही.
त्यांची पंतप्रधान होण्याची संधी पूर्वी हुकली होती, त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांना देशाचे पुढील राष्ट्रपतीपद देऊन राजकीय समीकरण साधू शकते,
अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
NITISH KUMAR NEWS नितीश कुमार नाराज? शरद पवार यांची भाजपाशी जवळीक?
बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
आता या सर्व शक्यता बिहार निवडणुकीनंतर कितपत खऱ्या ठरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
काही खाजगी सर्वेक्षणांनुसार, वर सांगितल्याप्रमाणे राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
असे झाल्यास त्याचा फायदा शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांनाही होऊ शकतो,
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचेही लोकसभेत 9 खासदार आहेत.
मागील काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि शरद पवार यांच्या भेटी वाढल्या आहेत.
त्यामुळे देशात नवीन राजकीय समीकरण तयार होईल का, अशी चर्चा सुरू आहे.
हे हि वाचा –भाजपाच्या खासदाराने गरबा दांडिया चा कार्यक्रम बंद पडला?
आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की जर असे राजकीय समीकरण घडले,
तर शरद पवार खरोखरच एनडीएसोबत जातील का?
आम्ही काही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली असता काहींचे मत होते की शरद पवार एनडीएसोबत जातील,
तर काहींच्या मते ते एनडीएसोबत जाणार नाहीत.
तुम्हाला काय वाटते? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.







