भाजपाच्या खासदाराने गरबा दांडिया चा कार्यक्रम बंद पडला?
पुण्यात गरबा-दांडिया कार्यक्रम बंद; मेधा कुलकर्णींचा आवाजप्रदूषणावर थेट हस्तक्षेप, व्हिडिओ व्हायरल

पुण्यात गरबा-दांडिया कार्यक्रमावर कारवाई; खासदार डॉ. मेधा कुलकर्णींची थेट हस्तक्षेपाने गोंगाट थांबला

हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी काम करते सतत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या तोंडात हिंदुत्व हिंदुत्व हे चालू असतं पण भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने चक्क नवरात्र मधील गरबा दांडिया चा कार्यक्रम बंद पाडला म्हणून आश्चर्य व्यक्त केले जात आहे
खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यामधील एका कार्यक्रमात जाऊन तेथील गरबा दांडिया बंद पडला यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत जर अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सोडून इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर हिंदू धर्मातील एखादा कार्यक्रम बंद पडला असता तर भाजपा नक्कीच आक्रमक झाला असता पण आता नवरात्रीमध्ये चालू असलेला हा कार्यक्रम भाजपाच्या खासदाराने बंद पडला त्यामुळे एकही भाजपाचा नेतापुढे येऊन बोलायला तयार नाही
आवाजाची मर्यादा ओलांडली म्हणून हा कार्यक्रम बंद पडला असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले तसेच या भागामध्ये काही वयोवृद्ध नागरिक आहेत असेही सांगितले पाहूया या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट
पुणे : पुण्यातील कोथरूडमधील ‘जीत मैदान’ येथे शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेला गरबा-दांडिया कार्यक्रम अचानक बंद करण्यात आला. भाजपा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मोठ्या आवाजामुळे नागरिकांना होत
असलेल्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत थेट मैदानावर पोहोचून हा कार्यक्रम थांबवला. त्यांच्या या भूमिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, “परिसरातील लोकांना या गोंगाटाचा मोठा त्रास होत होता. मला गेल्या काही तासांत अनेक स्थानिक नागरिकांचे फोन आले. या भागात कॅन्सरचे रुग्ण आहेत, तसेच ९० वर्षांची महिला आहे.
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या आवाजाचा त्रास सहन करावा लागत होता. मागील दहीहंडीच्या वेळीही अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या.”
हेही वाचा-हृदयरोग टाळण्यासाठी आवश्यक माहिती: कारणे, लक्षणे, तपासण्या आणि उपचार
त्यांनी पुढे सांगितले की, “आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम सुरू ठेवला जात होता. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असतानाही कोणतीही कारवाई झाली नाही.
पोलिस उपायुक्त आणि आयुक्तांकडे तक्रार करूनही परिणाम दिसला नाही. त्यामुळे नागरिकांच्या त्रासाचा विचार करून मला स्वतः जाऊन कार्यक्रम बंद पाडावा लागला.”
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी मोठ्या आवाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. काही तरुणांनी कार्यक्रम अचानक थांबल्याने नाराजी व्यक्त केली,
तर काहींनी खासदारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. या घटनेनंतर गरबा आयोजक आणि प्रशासन यांच्यात जबाबदारी टाळण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
हेही वाचा-रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे: कोणते रोग दूर होतात, कोणते होत नाहीत?
डॉ. कुलकर्णी यांनी यापुढे कोथरूडमधील जीत मैदानावर असे गोंगाटमय कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशाराही दिला आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ध्वनीप्रदूषणाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. गणेशोत्सव, ईद, दहीहंडी आणि आता नवरात्रोत्सव अशा अनेक उत्सवांमध्ये डीजे, ढोल-ताशे आणि स्पीकरच्या आवाजामुळे परिसरातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांच्या प्रतिक्रिया दोन गटांत विभागल्या आहेत. काहींना खासदारांचा हस्तक्षेप योग्य वाटत आहे,
तर काहींना कार्यक्रम अचानक बंद झाल्याने नाराजी वाटत आहे. मात्र, या घटनेनंतर प्रशासनावर कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


