अजित दादा पवार हे शरद पवारांना कोणते गिफ्ट देणार होते?
अजित दादा पवार यांची काय इच्छा होती?

Ajit Pawar news-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे काल बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले होते.आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी लाखो लोकांचा जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामती मध्ये पोहोचला होता.

पण अजित दादा पवार यांची एक इच्छा राहिली अशी माहिती एका जवळच्या व्यक्तीने दिली ती नेमकी इच्छा काय होती. व अजित पवार यांचे काका शरद पवार यांना ते त्यांच्या वाढदिवसाला काय गिफ्ट देणार होते ते पाहूया
अजित दादा पवार यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार
आज बारामती मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले याप्रसंगी लाखो चा जनसमुदाय उपस्थित होता. अनेक बडे राजकीय नेते उद्योजक आमदार खासदार याप्रसंगी उपस्थित होते.
हेही वाचा-बारामती विमान अपघात कसा झाला? DGCA रिपोर्ट
हेही वाचा-विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? अपघातानंतर सत्य उघड करणारा सर्वात महत्त्वाचा पुरावा
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी देशाचे गृहमंत्री अमित शहा ,नितीन गडकरी,अभिनेता रीतेश देशमुख,मंत्री रामदास आठवले ,मुरलीधर मोहोळ,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपस्थित होते.काल झालेल्या विमान अपघातामध्ये अजितदादा पवार यांचे निधन झाले होते.
अजित दादा पवार यांची इच्छा काय होती ?
आज दिवसभर सर्वच मराठी प्रसार माध्यमांमध्ये अजित दादा पवार यांच्या संदर्भातल्या बातम्या येत होत्या यामध्येच एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांची निकटवर्तीय अंकुशराव काकडे यांनी एक खुलासा केला अंकुशराव काकडे म्हणाले की दोन्हीही राष्ट्रवादीचे विलनीकरण व्हावे जो राजकीय दुरावा शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये आलेला आहे.
तो कमी व्हावा परत एकदा पवार कुटुंबीय एकत्र यावेत अशी अपेक्षा अजितदादा पवार यांनी माझ्याकडे व्यक्त केली होती.अशी माहिती अंकुशराव काकडे यांनी दिली त्यांनी सांगितले अजित दादा पवार यांनी स्वतः मला या संदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करावी असे त्यांनी मला सांगितले की अजितदादा पवार यांची इच्छा पूर्ण झाली नाही अशी खंत देखील याप्रसंगी अंकुशराव काकडे यांनी व्यक्त केली
अजित दादा पवार शरद पवार यांना काय गिफ्ट देणार होते?
शरद पवार यांच्या पुढच्या वाढदिवसाला अजितदादा पवार हे गिफ्ट देणार होते अजित दादा पवार हे त्यांचे काका शरद पवार यांना दोन्हीही राष्ट्रवादी विलनीकरण करून एकच राष्ट्रवादी करण्याचा त्यांचा मानस होता.व हे गिफ्ट ते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना देणार होते.अशी माहिती अजितदादा पवार यांच्या निकटवर्ती यांनी प्रसार माध्यमांना बोलताना दिली
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर झालेच आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे काय होणार याविषयी सुद्धा सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत.कारण अजित पवारांची जी इच्छा होती त्याप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीपासून दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवीत होत्या आत्ता होत.
असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवीत आहेत शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजितदादा पवार प्रफुल पटेल ही स्वतः शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेले होते तेव्हापासून या काका पुतण्याच्या अनेक वेळा भेटी झाल्या आणि त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा देखील प्रसारमाध्यवानमध्ये होऊ लागल्या पण अजित दादा पवार यांचे अकाली जाण्यामुळे आता पुढे काय होणार हे पहावं लागेल







