
DGCA रिपोर्ट -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. दिनांक 28 जानेवारी 2020 रोजी ते सकाळी मुंबईवरून एका खाजगी विमानाने बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी येत असताना बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला.
या अपघातामध्ये अजितदादा पवार यांच्या समवेत आणखी चौघा जणांचा मृत्यू झाला. आता हा विमान अपघात नेमका कसा झाला, याविषयीची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात DGCA ने दिली आहे.

DGCA रिपोर्ट

DGCA म्हणजे काय?
DGCA हे नागरी विमान वाहतूक मंत्रालय (Ministry of Civil Aviation) यांच्या अखत्यारीत येते. भारतातील सर्व विमानसेवा, पायलट, विमानतळ, विमानांची तांत्रिक स्थिती आणि सुरक्षा नियम यांचे नियंत्रण व नियमन करण्याचे काम DGCA करते.
DGCA ची मुख्य कामे
विमानसेवांचे परवाने देणे
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना उड्डाणासाठी परवानगी देणे.
पायलट व क्रूला परवाने
पायलट, को-पायलट, एअर होस्टेस, इंजिनिअर यांना प्रशिक्षण, परीक्षा व लायसन्स देणे.
विमानांची सुरक्षितता तपासणी
विमानांची तांत्रिक तपासणी, देखभाल आणि फिटनेस सर्टिफिकेट देणे.
हवाई अपघात प्रतिबंधक नियम
सुरक्षा नियम तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करणे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
नियम तोडणाऱ्या विमान कंपन्या किंवा कर्मचाऱ्यांवर दंड, परवाना रद्द किंवा निलंबनाची कारवाई.
आंतरराष्ट्रीय समन्वय
ICAO (International Civil Aviation Organization) च्या नियमांनुसार भारतीय विमान वाहतूक व्यवस्था चालते याची खात्री करणे.
DGCA चे काम कसे चालते?
DGCA नियमावली (CAR – Civil Aviation Requirements) जारी करते.
नियमितपणे ऑडिट, तपासण्या आणि निरीक्षणे केली जातात.
विमान अपघात, तांत्रिक बिघाड किंवा तक्रारींची चौकशी केली जाते.
केंद्र सरकारला धोरणात्मक सल्ला दिला जातो.
DGCA चे मुख्यालय
नवी दिल्ली
थोडक्यात सांगायचे तर…
भारतातील नागरी विमान वाहतूक सुरक्षित, विश्वासार्ह आणि नियमबद्ध राहावी यासाठी DGCA ही सर्वोच्च नियंत्रण संस्था आहे.
हेही वाचा-भारतातील राजकीय नेत्यांचे विमान अपघातातीलनिधन
हे ही वाचा-घड्याळ ठरली अजित दादांची शेवटची ओळख
विमान अपघाताला कारण ठरलेला घटनाक्रम
अजितदादा पवार यांच्या विमान अपघात मृत्यूनंतर चौकशी करण्यात आली. या चौकशीत असे समोर आले की बारामती विमानतळ हे एक अनियंत्रित विमानतळ (Uncontrolled Airfield) आहे.
https://x.com/DGCAIndia/status/2016458492924862758?t=qF-3R7Ycd_4plUxRMmlaiw&s=19
बारामतीच्या हवाई वाहतुकीची माहिती बारामतीतील उड्डाण प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षक किंवा वैमानिकांकडून दिली जाते. हवाई वाहतूक नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे.
हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या व्यक्तीने दिलेल्या जबाबानुसार, अजितदादा पवार हे VI-SSK या विमानातून प्रवास करत होते. बारामती वाहतूक नियंत्रण केंद्राशी पहिला संपर्क सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी झाला. त्यानंतर विमानाचा संपर्क बारामतीपासून 30 नॉटिकल मैल अंतरावर असताना झाला. त्यांना पुणे येथील केंद्राकडून परवानगी देण्यात आली.
वैमानिकाला त्याच्या विवेकानुसार दृश्य हवामान परिस्थिती म्हणजेच Visual Meteorological Conditions (VMC) मध्ये विमान खाली उतरवण्याचा सल्ला देण्यात आला. विमानातील कर्मचाऱ्यांनी वारे आणि दृश्यमानतेबाबत चौकशी केली. त्यावेळी वारे शांत असून दृश्यमानता (Visibility) 3000 मीटर असल्याची माहिती देण्यात आली.
विमान धावपट्टी क्रमांक 11 च्या फायनल अप्रोचवर असल्याचे कळविण्यात आले. मात्र वैमानिकाला धावपट्टी दिसत नव्हती, त्यामुळे पहिल्या प्रयत्नात विमान खाली उतरवता आले नाही. त्यानंतर वैमानिकाने गो-अराउंड (Go Around) म्हणजेच पुन्हा उड्डाण करून वळण घेण्याचा निर्णय घेतला.
यानंतर पुन्हा एकदा विमानाच्या स्थानाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी धावपट्टी क्रमांक 11 च्या फायनल अप्रोचवर असल्याचे सांगितले आणि बारामती केंद्रातील कर्मचाऱ्याने धावपट्टी दिसल्यास कळविण्यास सांगितले. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांनी धावपट्टी दिसत नसल्याचे सांगत, दिसल्यानंतर लगेच कळवतो असे उत्तर दिले.
यानंतर काही वेळातच त्यांनी धावपट्टी दिसत असल्याचे कळवले आणि अवघ्या काही मिनिटांत म्हणजेच सकाळी 08:43 वाजता विमान उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
सकाळी 08:44 वाजता धावपट्टी क्रमांक 11 च्या सुरुवातीच्या भागाजवळ आगीच्या ज्वाळा दिसल्या. तात्काळ आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. विमानाचे अवशेष धावपट्टीच्या डाव्या बाजूला सापडले. यानंतर विमान अपघाताचा तपास करणाऱ्या विभागाने सूत्रे हातात घेतली. या विभागाचे महासंचालक तपासणीसाठी अपघातस्थळी दाखल झाले.
नोंद : सदरील माहिती ही वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे घेण्यात आली आहे.







