Advertisement
शेती

सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करा

नोंदणी कुठे व कशी करायची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Story Highlights
  • नोंदणीची मुदत वाढवली: सीसीआयने कापूस नोंदणीसाठी अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवली.
  • हमीभावाची संधी: शेतकऱ्यांना सीसीआयमार्फत कापूस किमान आधारभूत किमतीवर विकण्याची संधी.
  • पैशांसाठी प्रतीक्षा: मागील वर्षी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब; यावर्षी तातडीने देयकाची अपेक्षा.
  • शेतकऱ्यांची मागणी: सीसीआयने खरेदीचे लक्ष्य आणि पैसे मिळण्याची वेळ याबाबत स्पष्ट माहिती
Advertisment

महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिके धोक्यात आली आहेत. मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कापूस उत्पादनातही बसला आहे. यामुळे कापसाचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच गावखेड्यांमधील व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करत असल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा वसूल करणे कठीण जाते.

शेतातील पिकलेला कापूस – मराठवाड्यातील कापूस पिकाचे दृश्य
मराठवाड्यातील शेतात फुललेला कापूस; सीसीआयमार्फत हमीभावात खरेदीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू.

 

Advertisement

मात्र, या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी एक पर्याय उपलब्ध आहे. सरकार दरवर्षी सीसीआय (Cotton Corporation of India) च्या माध्यमातून कापूस किमान आधारभूत किमतीवर खरेदी करते. यंदाही सरकार कापसाची खरेदी किमान आधारभूत किमतीवर करणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वी 1 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करणे अपेक्षित होते. परंतु,

Advertisement

 

अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि इतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आता सीसीआयने नोंदणीसाठी आणखी 30 दिवसांची मुदत वाढवली आहे. शेतकरी आता 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने कापूस खरेदीसाठी नोंदणी करू शकतात.

 

किमान आधारभूत किंमत(MSP) किती आहे?

सी सी आय किती रुपयांमध्ये कापूस खरेदी करणार?

“सी सी आय” म्हणजे Cotton Corporation of India (CCI)

कापसासाठी त्यांनी निश्चित केलेली किमान समर्थन किंमत (MSP) पुढीलप्रमाणे आहे:

मध्यम धाग्याच्या कापसाची MSP = ₹ 7,710 प्रति क्विंटल

दीर्घ धाग्याच्या (Long Staple) कापसाची MSP = ₹ 8,110 प्रति क्विंटल
ऑनलाइन नोंद नेमकी कशी करायची?

हि हि वाचा-“5G आणि एआयमुळे बदलणारे शेतीचे भविष्य

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) ही भारत सरकारची एक महत्त्वाची संस्था आहे जी दरवर्षी शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीने (MSP) कापूस खरेदी करते. यामुळे बाजारभाव घसरल्यासही शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळते.

सी सी आय ची माहितीचा फोटो
सी सी आय ची माहिती

शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी (Registration) करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते:

1. ऑनलाइन नोंदणी:
शेतकऱ्यांनी सर्वप्रथम www.cotcorp.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. तिथे “Farmer Registration” किंवा “किसान नोंदणी” हा पर्याय निवडावा.

2. माहिती भरणे:
नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आपले नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक, जमीन तपशील, पीक क्षेत्रफळ आणि जमिनीचा 7/12 उतारा (किंवा तत्सम मालकीचा पुरावा) या माहितीची नोंद करावी लागते.

 

 

3. दस्तऐवज अपलोड करणे:
शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा आणि पीक पिकवले असल्याचा पुरावा (उदा. पिक निरीक्षण अहवाल किंवा गाव तलाठ्याचा दाखला) अपलोड करणे आवश्यक आहे.

 

हि हि वाचा-MSP2026-केंद्र सरकारने रब्बी हंगाम 2026-27 साठी नवे हमीभाव जाहीर केले

4. सत्यापन प्रक्रिया:

नोंदणी झाल्यानंतर संबंधित मार्केट यार्ड (खरेदी केंद्र) किंवा कॉटन कॉर्पोरेशनचे अधिकारी ही माहिती तपासतात. तपासणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला SMS द्वारे नोंदणी क्रमांक आणि तारीख कळवली जाते.

5. कापूस विक्री:
निश्चित तारखेला शेतकऱ्यांनी आपला कापूस खरेदी केंद्रावर आणावा. कापसाची गुणवत्ता तपासणी झाल्यावर MSP प्रमाणे पेमेंट शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते.

 

Pahalgam Terror Attack-भारत पाकिस्तानातून कोणत्या वस्तू आयात करतो ?

 

👉 महत्त्वाचे:

फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडूनच CCI खरेदी करते.

नोंदणी मोफत आहे.

शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक व बँक खाते तपशील अचूक द्यावेत.

ही प्रक्रिया पारदर्शक असून शेतकऱ्यांना सरकारी किमतीचा थेट लाभ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे.

सीसीआय हमीभावात कापूस खरेदी करणार असल्यामुळे या संधीचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. 31 ऑक्टोबरपूर्वी आपली ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, ज्यामुळे हमीभाव आणि व्यापाऱ्यांच्या दरातील फरकाचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल. मात्र, गेल्या वर्षी कापूस खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी बराच कालावधी वाट पाहावी लागली होती. अशी परिस्थिती यावर्षी निर्माण होऊ नये, हीच अपेक्षा शेतकरी सीसीआयकडून व्यक्त करत आहेत.

आधीच शेतकरी अडचणीत असताना, पैसे मिळण्यास विलंब झाल्यास त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होईल. त्यामुळे सीसीआयने यावर्षी नेमका किती कापूस खरेदी करणार आहे आणि शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button