PM Kisan 22वा हप्ता : तुमच्या गावात कुणाला मिळणार 2000 रुपये? 2 मिनिटांत यादी तपासा
ई-केवायसी, लाभार्थी यादी आणि नियम समजून घेतले नाहीत तर पीएम किसानचा हप्ता अडकू शकतो

PM Kisan Yojana : 22 वा हप्ता मिळणार की अडकणार? यादी तपासा, चुका दुरुस्त करा आणि 2000 रुपये खात्यात मिळवा

राज्यातील लाखो शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या(PM Kisan Yojana) 22 व्या हप्त्याकडे डोळे लावून बसले आहेत. केंद्र सरकारकडून लवकरच प्रत्येकी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
मात्र, प्रत्येक शेतकऱ्याला हा हप्ता मिळेलच असे नाही. कारण लाभार्थी यादी, ई-केवायसी आणि कागदपत्रांतील त्रुटी अनेकांसाठी अडथळा ठरत आहेत.
हे ही वाचा-लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी? एकनाथराव शिंदेंची मोठी घोषणा
हे हो वाचा-31 तारखेचा योगायोग: राजीव गांधी आणि सुनेत्रा पवार यांचा शपथविधी, दुःखातून नेतृत्वाची जबाबदारी
पीएम किसान योजना नेमकी काय देते?
पीएम किसान सन्मान निधी योजना( PM Kisan Yojana) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा होते. बियाणे, खत, औषधे आणि शेतीच्या इतर खर्चासाठी ही मदत शेतकऱ्यांना मोठा आधार ठरते.
22 वा हप्ता कधी येणार?
22 व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी केंद्र सरकारकडून लवकरच वितरण होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता विलंब न करता आपली माहिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गावनिहाय यादीत नाव आहे की नाही, 2 मिनिटांत कसे पाहाल?
शेतकरी घरबसल्या त्यांच्या गावातील लाभार्थी यादी ऑनलाइन पाहू शकतात.
स्टेप्स:
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
“Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करा
राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडा
“Get Report” वर क्लिक करा
याक्षणी तुमच्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसेल.
लाखो शेतकऱ्यांची नावे का कापली गेली?
अलीकडे केंद्र सरकारने लाभार्थी यादीचे काटेकोर पुनरावलोकन केले. यामध्ये नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांची नावे मोठ्या प्रमाणावर वगळण्यात आली.
मुख्य कारणे अशी आहेत:
एका कुटुंबातून पती-पत्नी दोघांनीही लाभ घेतलेला
अल्पवयीन व्यक्तींच्या नावावर नोंद
जमिनीच्या नोंदी आणि आधार तपशील जुळत नसणे
ई-केवायसी न केल्यास थेट हप्ता बंद
अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे त्यांचा हप्ता रोखण्यात आला आहे. आधार क्रमांक, बँक खाते आणि जमीन नोंदी यामध्ये कोणतीही चूक असल्यास पैसे खात्यात जमा होत नाहीत.
2000 रुपये खात्यात मिळवण्यासाठी आत्ताच काय करा?
22 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी:
ई-केवायसी पूर्ण केली आहे का ते तपासावे
बँक खाते आधारशी लिंक आहे का ते पाहावे
लाभार्थी यादीत आपले नाव आहे का याची खात्री करावी
वेळेत दुरुस्ती केल्यास 22 वा हप्ता अडकण्याचा धोका टळू शकतो.







