
Cockroach Janata Party
न्यायमूर्तींनी केलेले हे वक्तव्य आणि त्यानंतर उदयास आलेला नवीन पक्ष म्हणजे कॉकरोच जनता पार्टी(Cockroach Janata Party). या पक्षाला सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळाले.
हे यश एवढे मोठे होते की फक्त 54 पोस्टमध्ये या कॉकरोच जनता पार्टीने इंस्टाग्राममध्ये भारतीय जनता पार्टीलादेखील मागे टाकले. भारतीय जनता पार्टीपेक्षा कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स जास्त झाले आणि
यावरून कॉकरोच जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टीला पर्याय असल्याचे बोलले जाऊ लागले. नेमकं कॉकरोच जनता पार्टीचे भवितव्य काय राहील ते पाहूया.

कॉकरोच जनता पार्टी अस्तित्वात कशी आली?
न्यायमूर्तींनी एक निकाल देताना जे खोटे प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवतात त्यांना कॉकरोच असे संबोधले होते. यानंतर स्वतः न्यायमूर्तींनी याबाबतीत खुलासादेखील केला. त्याच दरम्यान पुण्यातील अभिजीत दीपके यांनी बेरोजगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना
https://youtu.be/mkRaTe2NDE8?si=5T4XyAm2uRm8u6kx
केली आणि सोशल मीडियावर या पार्टीची चर्चा सुरू झाली. जवळपास सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉकरोच जनता पार्टीबाबत चर्चा सुरू झाली. म्हणजे तालुकाध्यक्ष कोण असणार, जिल्हाध्यक्ष कोण असणार आणि कशा पद्धतीने भारतीय राजकारणामध्ये कॉकरोच जनता पार्टी पुढील काळामध्ये निर्णायक ठरेल.
हेही वाचा-दुधात भेसळ आहे का? घरच्या घरी अशा ओळखा पाणी, डिटर्जंट आणि स्टार्चची मिलावट
हेही वाचा-जास्त केस गळत आहेत? डॉक्टर सांगतात ही ५ सप्लिमेंट्स, जी Hair Fall कमी करण्यास करू शकतात मदत
इंस्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीने बीजेपीला मागे टाकले
इंस्टाग्रामवर फक्त 54 व्हिडिओ अपलोड करून कॉकरोच जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीला फॉलोअर्समध्ये मागे टाकले. यामुळेच देशभर या पार्टीची चर्चा होऊ लागली. अगदी विरोधी पक्षातील काही पक्षांमध्ये तर
आनंदाचे वातावरण तयार झाले. भारतीय जनता पार्टीला पर्याय मिळाला आहे, अशा पद्धतीचे वक्तव्यदेखील विरोधी पक्षातील काही नेतेमंडळी करू लागली.
जे विरोधी पक्षाला नाही जमले ते कॉकरोच जनता पार्टीला जमले
सध्या देशामध्ये बेरोजगारी, वाढती महागाई, इंधनाचा तुटवडा असे अनेक प्रश्न असताना विरोधी पक्ष मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे पाहायला मिळाले. खरं पाहायला गेलं तर विरोधी पक्षाला एक नामी संधीच तयार झाली होती, पण विरोधी पक्षाने याकडे फारसे लक्ष दिले नाही. .
एखादे देशव्यापी जनआंदोलन जर उभे केले असते तर हे निश्चितच भारतीय जनता पार्टीला अवघड गेले असते. पण आपल्या आंदोलनामध्ये कोणी येईल की नाही आणि आंदोलन केल्यानंतर जर जनतेने आपल्यालाच उलट प्रश्न विचारले तर काय होईल, या
दोन कारणांमुळे विरोधी पक्षाने आंदोलन करणे टाळल्याची चर्चा आहे. पण याच काळामध्ये कॉकरोच जनता पार्टीने मात्र लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि यामुळेच रातोरात कॉकरोच जनता पार्टी प्रसिद्ध झाली.
कुठलाही कार्यकर्ता नसताना, कुठलेही राजकीय पाठबळ नसताना अभिजीत दीपके यांनी ही कमाल करून दाखवली. जे विरोधी पक्षाला नाही जमलं ते कॉकरोच जनता पार्टीने करून दाखविले.
कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा कशी असेल?
कॉकरोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजीत दीपके यांनी काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. यादरम्यान त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, कॉकरोच जनता पार्टी भविष्यकाळामध्ये सक्रिय राजकारणात येईल काय?
तर यावर दीपके यांनी उत्तर दिले की, आम्ही अधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्यानंतरच कुठलातरी निर्णय घेऊ. पण ते हेही सांगायला विसरले नाहीत की, सध्या देशाला एका राजकीय पर्यायाची गरज आहे.
त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी भविष्यामध्ये राजकारणात आल्यानंतरच पुढील दिशा ठरेल. तसं पाहायला गेलं तर राजकारण हे काही सोपं नाही. अनेक वर्षांचा संघर्ष आणि
तळागाळापर्यंत पोहोचण्याची कला ही त्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असावी लागते. जर कॉकरोच जनता पार्टीला नवीन पर्याय उपलब्ध करून द्यायचा असेल तर त्यांना प्रचंड मेहनत करावीच लागणार आहे. फक्त एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्स वाढले म्हणजे राजकारण एवढं सोपं नाही. त्यामध्ये प्रचंड कष्ट घ्यावे लागतात.
आज जरी या पक्षाचे अस्तित्व नसले तरीदेखील मागील काही दिवसांमध्ये झालेल्या चर्चा आणि कॉकरोच जनता पार्टीने सरकारला विचारलेले प्रश्न हे मात्र जनतेला आवडल्याचे दिसत आहे. त्यामुळेच इंस्टाग्रामवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स वाढले.
कॉकरोच जनता पार्टीला भविष्यकाळामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे तसेच खूप मोठे कामदेखील करावे लागणार आहे आणि यासाठी त्यांना पुरेसा वेळदेखील द्यावा लागणार आहे. निर्णय घेतला तर काही होऊ शकते.
आता पाहावं लागेल की, कॉकरोच जनता पार्टी कशा पद्धतीने जनतेचे प्रश्न घेऊन त्यावर काम करते. यावर या पार्टीचे भविष्य ठरणार आहे. पण एकंदरीत बेरोजगारी, महागाई, इंधनाचा तुटवडा, शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे जनतेच्या मनामध्ये असंतोष आहे, हेही तेवढेच खरं.







