Advertisement
खेळ

टीम इंडियाचे 2026-27 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

IPL, इंग्लंड दौरा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसह वर्षभर रंगणार क्रिकेटचा थरार

Advertisment

Team India Schedule 202

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी नुकतेच मराठी वर्ष सुरू झाले आहे आणि या वर्षामध्ये भारतीय क्रिकेट संघ किती व कोणत्या संघाच्या विरुद्ध सामने खेळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण घेऊया

भारतामधील सर्वात प्रसिद्ध खेळ कुठला आहे असं जर मी तुम्हाला विचारलं तर उत्तर असेल क्रिकेट. देशामध्ये सर्वाधिक क्रिकेटचे चाहते आहेत आणि आयपीएल सारखे सामने देखील आपल्या देशात खेळले जातात.

Advertisement

 

Advertisement

त्याविषयी देखील प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनामध्ये उत्सुकता असते. नुकतेच गुढीपाडवा झालेला आहे म्हणजेच मराठी वर्ष लागलेले आहे. पुढील वर्षभरामध्ये भारत देशाचा क्रिकेट संघ कुठल्या कुठल्या मालिका खेळणार आहे व कोणत्या देशासोबत त्या मालिका खेळणार आहे, त्याचे सविस्तर वेळापत्रक पाहूया.

Team India Schedule 2026
Team India Schedule 2026

 

आयपीएल 2026

भारतीय खेळाडू तसेच इतर देशातील खेळाडू मिळवून आयपीएल खेळवला जातो. यंदा या आयपीएलचे सामने हे 28 मार्च 2026 ते 31 मे 2026 पर्यंत खेळविले जातील. बंगळुरू येथे पहिला व शेवटचा सामना खेळवला जाईल.

 

 

टीम इंडिया वर्षभरात खेळणार 30 टी20, 20 वनडे, 10 कसोटी सामने

जून 2026

जून 2026 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान 6 जून ते 20 जून या दरम्यान भारतामध्येच एक कसोटी आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत.

https://www.bcci.tv/international/men/series-and-tournaments

जुलै 2026

जुलै 2026 मध्ये भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये तीन वनडे, पाच टी20 सामने इंग्लंड येथे खेळवले जाणार आहेत.

हेही वाचा-Jamun Benefits in Marathi | जांभळाचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

हे ही वाचा –४२ दात असलेला माणूस! मलेशियातील अभियंत्याचा जागतिक विक्रम; पाहून लोकही थक्क

जुलै-ऑगस्ट 2026

जुलै-ऑगस्ट 2026 च्या दरम्यान भारत श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी दोन कसोटी सामने तर 3 टी20 खेळविले जाणार आहेत. या टी20 मालिकेतून मिळणारा पैसा हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.

 

सप्टेंबर 2026

युएईमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये तीन टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. सदरील सामने हे युएईमध्ये खेळविले जाणार आहेत.

 

तसेच याच महिन्यामध्ये भारत सरकारने जर मंजुरी दिली तर भारताचा संघ हा बांगलादेश दौरा करणार आहे. मंजुरीनंतर तीन वनडे, तीन टी20 सामने खेळविले जाणार आहेत.

 

याच महिन्यामध्ये भारत झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे, पण अद्यापही हे आणखी बीसीसीआयने स्पष्ट केले नाही. जर हे सामने झाले तर यामध्ये तीन टी20 सामने खेळविले जाणार आहेत.

 

सप्टेंबर-ऑक्टोबर 2026

25 सप्टेंबर 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 यादरम्यान जपान येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा या टी-ट्वेंटी स्पर्धा असतील.

 

सप्टेंबर-ऑक्टोबर 2026

वेस्ट इंडिजचा संघ हा भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांदरम्यान तीन वनडे, पाच टी20 सामने खेळविले जाणार आहेत.

 

ऑक्टोबर-डिसेंबर 2026

या दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या दरम्यान पाच वनडे, पाच टी20 आणि दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. पहिला वनडे हा 22 ऑक्टोबर रोजी खेळविला जाणार आहे.

 

डिसेंबर 2026

भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये भारतात तीन वनडे, टी20 सामने खेळले जाणार आहेत.

 

जानेवारी-फेब्रुवारी 2027

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारतामध्ये खेळविली जाणार आहे. या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे.

यंदाचे वर्ष हे पूर्ण क्रिकेट सामन्यांनी भरलेले आहे, त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांनी आजच आपल्या कॅलेंडरमध्ये या सामन्यांची नोंद करून ठेवावी.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button