Advertisement
खेळ

२२ चेंडूत शतक! ३ षटकांत इतिहास रचणारा खेळाडू कोण?

१९३१ साली केलेली २५६ धावांची तुफानी खेळी आजही क्रिकेटविश्वाला थक्क करते; ३ षटकांत शतक अजूनही अटळ

Advertisment

Don Bradman

क्रिकेटच्या इतिहासात आज टी-२०मध्ये जलद शतकं पाहायला मिळतात, पण तब्बल ९० वर्षांपूर्वीच एक असा विक्रम झाला होता, जो आजही अविश्वसनीय वाटतो. आधुनिक क्रिकेटमध्येही ज्याची बरोबरी करणे जवळपास अशक्य आहे — तो विक्रम म्हणजे Don Bradman यांचा!

 

Advertisement

३ षटकांत शतक झळकावले… हा अशक्यप्राय विश्वविक्रम करणारा हा जगातील एकमेव फलंदाज आहे.

Advertisement

 

 

जगामध्ये एकाच फलंदाजाने क्रिकेटच्या मैदानावर अशी खळबळ माजवली की, जगात कोणी त्याचे स्वप्नही पाहिले नसेल. ३ षटकांत शतक करण्याचा विश्वविक्रम… ही काही चेष्टा नाही, तर एक वास्तव आहे.

 

 

एका फलंदाजाने अवघ्या तीन षटकांत शतक झळकावून खळबळ उडवून दिली. त्याच्या भेदक फटकेबाजीने विरोधी संघाच्या गोलंदाजांना हतबल केले. त्याने केवळ २२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले नाही, तर आपल्या २५६ धावांच्या खेळीत २९ चौकार आणि १४ षटकारही ठोकले.

Don Bradman
Don Bradman

 

या धोकादायक फलंदाजाने ३ षटकांत शतक झळकावले.

 

ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन

 

नोव्हेंबर १९३१ मध्ये खेळल्या गेलेल्या एका क्लब सामन्यादरम्यान, त्याने तीन षटकांत शतक झळकावून खळबळ उडवून दिली. २ नोव्हेंबर १९३१ रोजी, डॉन ब्रॅडमनने लिथगोविरुद्ध ब्लॅकहीथकडून फलंदाजी करताना २५६ धावांची एक ऐतिहासिक खेळी केली,

हेही वाचा-आता हॉस्पिटल्स मनमानी पद्धतीने बिल आकारू शकणार नाही; सरकारने उचललं मोठं पाऊल

हेही वाचा-पालकांना दिलासा,स्कूलबस चे भाडे सरकार ठरविणार.

 

ज्यात २९ चौकार आणि १४ षटकारांचा समावेश होता. त्या काळात, एका षटकात आठ चेंडू असायचे. डॉन ब्रॅडमनने आपल्या खेळीची सुरुवात पहिल्या षटकात ३३ धावा, दुसऱ्या षटकात ४० धावा आणि तिसऱ्या षटकात २९ धावा करून केली.

 

 

डॉन ब्रॅडमनने लिथगोचा गोलंदाज विल ब्लॅकच्या पहिल्याच षटकात तीन षटकार आणि तीन चौकारांसह ३३ धावा ठोकल्या. या षटकातील उर्वरित धावा एकेरी आणि दुहेरी धावांनी केल्या गेल्या. दुसऱ्या षटकात, लिथगोचा गोलंदाज हॉरी बेकर डॉन ब्रॅडमनला गोलंदाजीसाठी आला. डॉन ब्रॅडमनने भुकेल्या सिंहाप्रमाणे हॉरी बेकरवर हल्ला चढवला आणि त्याच्या षटकात ४० धावा ठोकल्या.

 

 

डॉन ब्रॅडमनने हॉरी बेकरच्या या षटकात चार षटकार आणि चार चौकार मारले. तिसऱ्या षटकात पुन्हा विल ब्लॅक गोलंदाजीसाठी आला आणि डॉन ब्रॅडमनने तीन षटकार आणि दोन चौकारांसह २९ धावा ठोकल्या. उर्वरित तीन धावा एकेरी धावांनी केल्या गेल्या. अशाप्रकारे, डॉन ब्रॅडमनने अवघ्या २२ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.

 

 

टी-२०च्या आधीच ‘टी-२०’ खेळला गेला!

आजच्या काळात ३०-३५ चेंडूत शतक झाले तर ते विक्रमी मानले जाते. पण २ नोव्हेंबर १९३१ रोजी ब्रॅडमनने जे केले, ते आजच्या आक्रमक क्रिकेटलाही मागे टाकणारे होते.

ब्लॅकहीथकडून खेळताना त्यांनी लिथगोविरुद्ध फक्त २२ चेंडूत शतक झळकावले!

त्या काळात एका षटकात ८ चेंडू असायचे — आणि ब्रॅडमनने केवळ ३ षटकांत १०० धावा पूर्ण केल्या.

 

त्याने ३ षटकांत शतक कसे झळकावले?

 

१. डॉन ब्रॅडमन विरुद्ध विल ब्लॅक – ६, ६, ४, २, ४, ४, ६, १ – पहिल्या षटकात ३३ धावा

 

२. डॉन ब्रॅडमन विरुद्ध हॉरी बेकर – ६, ४, ४, ६, ६, ४, ६, ४ – दुसऱ्या षटकात ४० धावा

 

३. डॉन ब्रॅडमन विरुद्ध विल ब्लॅक – १, ६, ६, १, १, ४, ४, ६ – तिसऱ्या षटकात २९ धावा

 

चौकार आणि षटकारांची सुनामी

 

ब्लॅकहीथकडून फलंदाजी करताना, डॉन ब्रॅडमनने लिथगोविरुद्ध २९ चौकार आणि १४ षटकारांसह २५६ धावांची ऐतिहासिक खेळी केली. ब्रॅडमनचा साथीदार, वेंडेल बिल यानेही ६८ धावा केल्या. उर्वरित ३३ धावा अतिरिक्त होत्या. प्रथम फलंदाजी करताना, ब्लॅकहीथने ३५७ धावा केल्या आणि लिथगोसमोर ३५८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात,

 

लिथगोचा संघ केवळ २२८ धावाच करू शकला. ब्लॅकहीथने हा सामना १२९ धावांनी जिंकला. डॉन ब्रॅडमनची ही खेळी इतिहासाच्या सुवर्ण पानांवर कोरली गेली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button