Advertisement
राजकीय बातम्या

नितीश कुमारच मुख्यमंत्री? पूर्ण विश्लेषण

बिहार निवडणूक 2025: एनडीएचा विक्रमी विजय

Advertisment

नितीश कुमारच मुख्यमंत्री?

 

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. भारतीय जनता पार्टी 87 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याखालोखाल जनता दल (युनायटेड) या पक्षाला 80 जागा मिळाल्या. तरीदेखील मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांचेच नाव निश्चित झाले आहे.

Advertisement
नितीश कुमारच मुख्यमंत्री?
बिहारमध्ये परत नितीश कुमार?

 

Advertisement

बिहार विधानसभा निवडणूक निकाल

 

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएने सर्वाधिक 202 जागा जिंकत एक नवीन विक्रम तयार केला आहे. यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते पाहूया—

भाजपा – 87, जेडीयू – 80, एलजेपी – 22, काँग्रेस+ – 5, आरजेडी – 36, AIMIM – 5, इतर – 8.

 

ही ही वाचा-सोयाबीन दरात प्रचंड तफावत! जालना 6500 – नांदेड 3700; शेतकरी चिंतेत

ही वाचा-AIMIM ने सीमांचलमध्ये पुन्हा शक्ती दाखवली

 

या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. काँग्रेसला तर दोन अंकी संख्या देखील गाठता आली नाही. भारतीय जनता पार्टी आणि जेडीयू यांनी समान म्हणजेच 102 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 87 जागांवर भारतीय जनता पार्टी आणि 80 जागांवर जेडीयू विजयी झाले.

 

नितीश कुमार मुख्यमंत्री होणार?

 

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचेच नाव पुढे येत आहे. त्यांच्या मित्रपक्ष भाजपाला त्यांच्यापेक्षा जास्त जागा मिळूनही भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नितीश कुमार हेच बिहारचे पुढील मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता जास्त आहे.

 

राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, केंद्रातील सरकार हे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर टिकून आहे. नितीश कुमार यांना नाराज करण्याची भाजपाची तयारी नाही.

 

 

त्यामुळे अधिक जागा जिंकल्यानंतरही भारतीय जनता पार्टी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करतील, अशा चर्चा सुरू आहेत. नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.

 

मंत्रिमंडळ वाटप कसे होणार?

 

अंदाजे 20 नोव्हेंबर 2025 रोजी पटणा येथे शपथविधी होईल, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याविषयी चर्चा सुरू आहे. संभाव्य मंत्रिमंडळात भाजप आणि जेडीयू या दोन्ही पक्षांना समान मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.

 

हिंदुस्तान अवाम मोर्चा आणि RLM या पक्षांना एक–एक मंत्रिपद, तर लोक जनशक्ती पार्टीला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

 

उपमुख्यमंत्री कोण होणार?

 

उपमुख्यमंत्री पदासाठीही दोन नावे चर्चेत आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख दावेदार आहेत—सम्राट चौधरी, जे भाजपाचे प्रमुख नेते आहेत. तसेच, महिला मतदारांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे यावेळी एखाद्या महिलेला उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

 

निष्कर्ष

 

जास्त जागा मिळूनही बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीला नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री बनवावे लागणार आहे, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तरीदेखील याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. महाविकास आघाडीत मात्र नैराश्य पसरले आहे.

 

या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. AIMIM ने या निवडणुकीमध्ये विशेष कामगिरी करून दाखविली आहे. आता नेमके पाहावे लागणार आहे की नितीश कुमार हेच बिहारचे पुढील मुख्यमंत्री होतील का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button