“महानगरपालिका निवडणुका कधी?
आचारसंहिता 15 डिसेंबरनंतर लागू होण्याची शक्यता; राज्यात तयारीला वेग”

महानगरपालिका निवडणुका
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अशातच महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार
याविषयी मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. याबाबतची एक मोठी अपडेट समोर येत आहे.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता कधी लागणार आणि निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र आता महानगरपालिका निवडणुका नेमक्या कधी होणार, आचारसंहिता कधी लागणार याविषयी महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
महानगरपालिका निवडणुका कधी?
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इत्यादी महानगरपालिकांसह राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुका एकदाच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण यापूर्वी नगरपालिका, नगरपंचायत,
जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुका या एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे.
https://mahasec.maharashtra.gov.in/Site/1406/Important-Judgments
यामुळे महानगरपालिका निवडणुका देखील एकदाच आणि एकत्रित घेतल्या जातील, अशी शक्यता आहे. राजकीय भाषेत सांगायचे तर ही एक मिनी विधानसभा ठरू शकते, कारण सर्वच पक्ष मोठ्या प्रमाणावर
हेही वाचा-भारताचं एकमेव शहर जिथे कांदा आणि लसूण बंदी आहे
हेही वाचा-बिहार विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत?
तयारीला लागलेले आहेत. आजच काका शरद पवार आणि पुतण्या अजित दादा पवार यांच्या काही महानगरपालिकांमध्ये युती होण्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत.
आचारसंहिता कधी लागू होणार?
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी राज्यातील सर्व निवडणुका घेणे बंधनकारक आहे. जर जानेवारीमध्ये निवडणुका घेणे आवश्यक असेल, तर त्याआधी, म्हणजे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर — 15 डिसेंबरनंतर कधीही महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येत आहे.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष बैठकींचे सत्र घेत आहेत. युती, रणनीती आणि उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा जोरात सुरू आहेत.
राजकीय पक्षांची तयारी जोरात
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. महाविकास आघाडीत मनसेचा सहभाग असेल की नाही याविषयी उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले असले, तरी काँग्रेस यात सहमत नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे शरद पवार आणि अजित दादा पवार हे काही महानगरपालिकांमध्ये एकत्र येणार असल्याचे संकेत आहेत, मात्र अधिकृत घोषणा अद्याप नाही.
निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांनी भूमिपूजन, उद्घाटन सोहळे आणि लोकहिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. लवकरच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे
आणि त्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल. राज्यातील महानगरपालिका निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य आहे.







