Advertisement
Uncategorized

करोनग्रस्तां साठी सुरु केलेला भाऊंचा डबा सलग १००० दिवसापासून चालू आहे डॉ पुरषोतम केशवराव धोंडगे यांचा सत्कार

Advertisment

क्रांतिज्योती,ज्ञानसागर, प्रेरणा शक्तीपीठ साक्षीने भाऊचा डबा नाबाद १००० दिन पूर्ण डाॅ पुरुषोत्तम भाऊ यांचा सत्कार
कंधार बहाद्दरपुरा -आज कुळवाडी भुषण,जाणता राजा,नारीशक्तीचा बहुमान करणारे जाणता राजा
यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षी आलेल्या छ.शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या
जयंतीनिमित्य विद्रोही विचारवंत,मन्याड खोर्‍यातील ढाण्या वाघ, शब्दनिर्मितीप्रभू,,
अजानबाहू व्यक्तीमत्व डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या शतकोत्सवी
वर्षानिमित्त १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनी अन् कामगार दिनी सामाजिक बांधिलकीतून
मानवत धर्म जपणारा कोरोना काळात कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाईक यांच्या सोयीसाठी
सुरु झालेला भाऊचा डबा हा उपक्रम १००० दिवसाचा पल्ला यशस्वी गाठल्या बद्दल
संयोजक-प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब-अध्यक्ष-श्री शिवाजी मोफत
एज्युकेशन सोसायटी कंधार यांचा सत्कार लोहा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कै.माणिकराव पाटिल पवार
प्रतिष्ठाण लोहा व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटिल.पवार मित्रमंडळाच्या वतीने क्रांतीकारी नगरी
बहाद्दरपूरा येथील क्रांतिज्योत ज्ञानसागर प्रेरणा शक्तीपीठ डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब
यांच्या चीर समाधीस्थळी लोकशाही न्यूज आणि जय महाराष्ट्र न्यूज
चॅनलच्या वतीने डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊचा सामाजिक कार्याचा गौरव केला.
त्या बद्दल मन्याड खोर्‍याच्या पारंपारिक पध्दतीने खारीक खोबऱ्यांचा हार,सन्मान
चिन्ह,शाॅल देवून सत्कार केला.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे
गजानन उपवाड सर,छावा जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
शहराध्यक्ष राम पाटील पवार,भीमाशंकर मामा कापसे मित्र मंडळाचे युवा नेतृत्व प्रसाद पोले,
माधव पवार पार्डीकर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारचे सदस्य रमाकांत जोगदंड
बहाद्दरपुऱा नगरीचे माजी उपसरपंच भाई उत्तमराव भांगे व भाई गुरुनाथ पा.पेठकर,
आदीजण उपस्थित होते.प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे साहेबांना विविध संकल्पनेच्या
मनस्वी सदिच्छा आणि मानाची जयक्रांति
डॉ पुरषोत्तम केशवराव धोंडगे याना संकल्प टुडे चा मानाचं मुजरा

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button