Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरू

कुंभमेळ्यासाठी प्रशिक्षित युवकांची तयारी

Advertisment

आयटीआयमध्ये ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रम सुरु; कुंभमेळ्यासाठी प्रशिक्षित युवकांची फौज तयार

 

मुंबई : तीर्थक्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तर्फे ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ हा विशेष अल्पमुदतीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमाची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement
वैदिक संस्कार
नाशिक कुंभमेळा

 

Advertisement

या अभ्यासक्रमाला राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (National Skill Qualification Framework – NSQF) यांची मान्यता मिळाली आहे. या कोर्सच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र, धार्मिक मेळे, यात्रा आणि इतर श्रद्धास्थळांवर कार्य करण्यासाठी युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

या प्रशिक्षणामध्ये भाविकांचे स्वागत, मार्गदर्शन, आरोग्य आणि स्वच्छता जनजागृती, तसेच सामाजिक समन्वय यांसारख्या कौशल्यांचा समावेश असेल.

 

वैदिक कार
आयआयटी

https://www.iitb.ac.in/

मंत्री लोढा यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमामुळे भाविकांना अधिक सुव्यवस्थित सेवा मिळणार असून धार्मिक वातावरणात शिस्तबद्ध व्यवस्थापनास मदत होईल. विशेष म्हणजे, २०२६–२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, या अभ्यासक्रमातून प्रशिक्षित झालेल्या हजारो युवकांची फौज भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहील.

हेही वाचा-दुधाळ जनावरांसाठी केंद्र सरकारची नवी विमा योजना — 80% हप्ता केंद्राकडून

हेही वाचा-दिवाळीपहाट कार्यक्रमात यावर्षी गायिका अनुराधा पौडवाल येणार

त्यामुळे कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दी आणि धार्मिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करता येईल.

 

मंत्री लोढा यांनी यावेळी म्हटले की, “हा उपक्रम युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार असून भारतीय संस्कृती, परंपरा आणि सेवाभाव जोपासणाऱ्या पिढीचे घडविण्यात मदत करेल.”

 

 

या अभ्यासक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून तीर्थक्षेत्रातील सेवेत प्रशिक्षित व संस्कारित युवकांचा सहभाग वाढणार आहे. त्यामुळे हा उपक्रम सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या राज्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button