New GST-आनंदाची बातमी २. ५०लाख कोटी रुपये येणार सामान्य जनतेच्या खिश्यात?

जीएसटी2.0 सुधारित दर हे सोमवारपासून लागू झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या नवीन जीएसटी प्रणाली बद्दल माहिती दिली आणि याचा फायदा ग्राहकांना कसा होईल हे सांगितले वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी या जीएसटी मुळे2.5 लाख कोटी रुपयांची बचत होईल
अमेरिकेने लावलेल्या टेरिफ धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसेल असं अर्थतज्ज्ञांना वाटत होतं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जीएसटी मध्ये कपात करून सर्वांनाच एक सुखद धक्का दिला अमेरिकेच्या टेरीफ धोरणामुळे भारतीय बाजारांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा होती मात्र या उलट जाऊन भारतीय बाजारपेठांमध्ये आता वस्तू आणखीन स्वस्थ झाले आहेत 12% चा जो स्लॅब होता तो तब्बल 90% ने कमी करून फक्त पाच टक्के एवढा ठेवला यामुळे सामान्य ग्राहकांना2.5 लाख कोटी रुपयांचा फायदा होईल म्हणजे एवढेच पैसे जनसामान्यांच्या खिशामध्ये येतील
लोकांना नेमका फायदा कसा होईल?
सोमवारपासून अनेक वस्तूंचे भाव हे कमी होतं ना आपल्याला दिसतील आणि त्यामुळे याचा परिणाम हा घरगुती बजेट वर झालेला दिसेल कारण की अनेक वस्तूंचे भाव कमी झाल्यामुळे त्याचा थेट फायदा हा ग्राहकांना होणार आहे फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही की घरगुती उपकरणे ही आठ ते दहा टक्क्याने स्वस्त होणार आहेत त्यामुळे त्याच्या किमती देखील उतरतील आणि यामुळे लोक अधिक खरेदी करतील अशी आशा वर्तवली जात आहे
दैनंदिन वस्तू व किराणा यामध्ये 13 टक्के बचत होऊ शकते
कपडे औषधे बूट स्टेशनरी यामध्ये सात ते बारा टक्क्यांपर्यंत होऊ शकते
जीवन विमा व आरोग्य विमा वैयक्तिक विमा यामध्ये 18% पर्यंत बचत होऊ शकते
हे हि वाचा –“E-Aadhaar App द्वारे आधार कार्ड अपडेट करा | पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर बदलण्याची सोपी प्रक्रिया”
टीव्ही मध्ये साडेतीन हजार रुपयाची बचत तर एअर कंडिशन मध्ये 2800 रुपयाची बचत होऊ शकते तर दुचाकी वाहन देखील स्वस्त होणार आहेत त्यामुळे दुचाकी च्या किमती या आठ हजार रुपयांनी कमी होऊ शकतात शेतकऱ्यांसाठी देखील या जीएसटी स्लॅब मध्ये दिलासा आहे कारण की ट्रॅक्टर व बाकी त्यावर यंत्रामध्ये 40 हजार रुपये बचत होऊ शकते त्यासोबतच छोट्या कारच्या देखील किमती या 70 ते 80 हजार रुपयांनी स्वस्त होऊ शकतात त्यामुळे निश्चित गाड्या किंवा मोटरसायकल खरेदी करणाऱ्याला चैनीची वस्तू खरेदी करणाऱ्याला यामुळे मात्र दिलासा मोठा मिळणार आहे
कोणत्या वस्तू किती रुपयाने स्वस्त होतील

किराणा मालाच्या खर्चामध्ये 13% ची बचत होणार आहे कारण की नवीन जीएसटी प्रमाणे किराणामालावरील देखील जीएसटी कमी होणार आहे त्यामुळे महिलांचे बजेट हे आता चांगले होणार आहे 13 टक्के पैसे वाचल्यामुळे निश्चित यामुळे महिला वर्ग मात्र कमालीचा खुश आहे
कपडे धुण्याचे पावडर 18 ते 5 % नी स्वस्त होऊ शकतात यामुळे जे पावडर 150 रुपयाला मिळत होते ते आता 135 रुपयाला मिळणार आहे
दूध पावडर एक किलोचे दर हे सध्या 475 रुपये आहेत तर दूध पावडर देखील बारा ते पाच टक्क्यांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे त्याचे नवीन दर आता 440 रुपये किलो असतील
सॅनिटरी नॅपकिन यामध्ये देखील बारा टक्क्याची घट होणार आहेत त्यामुळे याच्या किमती 250 वरून 223 रुपये होतील
बल्ब यामध्ये सुद्धा 12 ते पाच टक्के एवढी बचत होऊ शकते जुने दर 80 रुपये आहेत तर नवीन दर हे 74 रुपये असतील
पंखा यामध्ये सुद्धा 18 ते पाच टक्के जीएसटी कपात होईल आणि यामुळे 1500 रुपयांचा पंखा आता एक हजार तीनशे वीस रुपयाला मिळेल
प्रेशर कुकर यामध्ये जीएसटी कपात ही बारा ते पाच टक्के असेल त्यामुळे सातशे रुपये किंमत असलेल्या प्रेशर कुकर आता 650 रुपयाला मिळेल
तूप देखील स्वस्त होणार आहे 675 रुपये किलो असलेले तूप आता 645 रुपये ला भेटणार आहे
सणासुदीच्या काळामध्ये रवा आणि मैदा देखील स्वस्त होणार आहे यावर सुधारित जीएसटी पाच टक्के असल्यामुळे 60 रुपये किलो असलेले रवा मैदा आता 57 रुपये किलो मिळणार आहे साखर देखील आता स्वस्त होणार आहे पन्नास रुपये किलो वरून 47 रुपये किलो एवढा दर होणार आहे
वाहन खरेदी वाढणार?
दसरा दिवाळी या दरम्यान मोठ्या प्रमाणात नवीन वाहन खरेदी करण्याची पद्धत आहे साडेतीन मुहूर्तापैकी असलेले या मुहूर्तावर आवर्जून लोक गाड्या घेतात आता गाड्या देखील स्वस्त होणार आहे बाईक किंवा स्कूटर हे 8000 रुपयांचे स्पष्ट होणार आहेत तर कार 70 हजार रुपये स्वस्त होणार आहे त्यामुळे या दोन मुहूर्तावर ज्यांना नवीन गाड्या घ्यायच्या आहेत त्यांची मात्र मोठी बचत होणार आहे मागील काही दिवसांमध्ये विशेषता 22 तारखेच्या नंतर गाड्यांच्या बुकिंग मध्ये मोठा फरक पडला ते दिसून येत आहे लोक मोठ्या प्रमाणात गाड्या विकत घेत आहेत त्यामुळे वाहन विक्री सुद्धा आता टॉप गियर मध्ये चालणार आहे
हे हि वाचा –“अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरीव अनुदान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा”
शालेय साहित्य मात्र महाग होण्याची शक्यता आहे?
व या शाळेचे बॅग या मात्र महागच राहण्याची शक्यता आहे कारण की नवीन जीएसटी करांचा पुनः विचार करण्याची मागणी ही देशातील उद्योजकांनी केलेली आहे सध्या असलेल्या शुल्करचनेमुळे आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे या जीएसटी कपातीचा फायदा हा ग्राहकांना पोहोचण्याची शक्यता कमी आहे असा देखील अंदाजा सध्या वह्या तयार करणाऱ्या व शालेय बॅग तयार करणाऱ्या कंपन्यांना वाटत आहे त्यामुळे निश्चित सरकार याच्यावर सकारात्मक विचार करेल अशी सध्या चर्चा चालू आहे
शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा
शेतकऱ्यांना सौर पंपावर मोठा दिलासा मिळणार आहे 1750 कोटी रुपये यामुळे वाचणार आहेत नरेंद्र मोदी सरकारचा अत्यंत प्रभावी असेल पीएम सूर्यग्रह योजनेला याचा फायदा होणार आहे तीन किलो वॅट ची सोयंत्र बसविण्यामध्ये आता नऊ ते 11 हजार रुपयांची बचत होणार आहे तसेच शेतकऱ्यांना दिला जाणारा सौर पंपावर देखील आता सतराशे पन्नास कोटी रुपये ची बचत होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्ग देखील आनंद व्यक्त करत आहे
नवीन जीएसटी प्रमाणे अनेक वस्तू स्वस्त होतील त्यामुळे निश्चित ग्राहकांचा फायदा होईल व अमेरिकेच्या टेरिटोरणाचा कुठलाही परिणाम हा भारतीय बाजारावर होणार नाही तसेच यासाठी आपण स्वदेशी वस्तू या वापरायला पाहिजेत त्यामुळे आपला इतर देशांवरचा अवलंबून राहायचे प्रमाण कमी होईल निश्चित स्वदेशी वस्तू वापरा








