“अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरीव अनुदान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा”
“महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत : फडणवीस सरकारकडून अनुदान जाहीर”
- नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी व किती मिळेल?
- पुरामध्ये अनेक जनावरे वाहून गेले आहेत?
- पुरामुळे घरांची झालेली पडझड त्यांना मदत कधी?
- सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची काय परिस्थिती आहे
मुंबई आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला याप्रसंगी बोलताना सध्याची परिस्थिती राज्यात कशी आहे?शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले काय?शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार व किती मिळणार?पुरामध्ये वाहून गेलेल्या जनावरांना बाबतीत काय निर्णय घेण्यात आला?या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis LIVE)यांनी उत्तर दिले

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारकडून भरीव मदत जाहीर.
सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची काय परिस्थिती आहे?
>या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis LIVE)यांनी राज्यामध्ये सध्या कुठं कुठं रोजच पाऊस पडत आहे विशेषता बीड जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा या ठिकाणी दोन दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे तेथे पूर आलेला आहे मदत आणि बचाव कार्य हे युद्ध पातळीवर चालू आहे एन डी आर एफ च्या १७ तुकड्या तैनात आहेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे सध्या यात तीन जिल्ह्यांची पाहणी करत आहेत त्यांनी आणखीन हेलिकॉप्टरची मागणी केलेली आहे भारतीय लष्कराशी बोलून आणखीन काही हेलिकॉप्टर मिळतात काय ते सुद्धा पाहणे चालू आहे ज्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलेले आहे
त्यांच्या खाण्याची उपचाराची व्यवस्था ही शासनामार्फत केली जाणार आहे तसेच याचा संपूर्ण खर्च शासन उचलणार आहे जोपर्यंत पुराचे पाणी ओसरत नाही तेथील साफसफाई होत नाही तोपर्यंत त्यांना सुरक्षित जागी ठेवण्यात येणार आहे
975.5 मिलिमीटर एवढा पाऊस पडलेला आहे तो सरासरी पेक्षा 102% एवढा जास्त आहे अलीकडच्या काळामध्ये अहिल्यानगर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण गंभीर जखमी आहेतनुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी व किती मिळेल?
या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis LIVE)यांनी सांगितले की आत्तापर्यंत नुकसानग्रस्त 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढले आहेत यातील 1829 कोटी रुपये हे जिल्ह्यातील खात्यात जमा झाली आहेत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा वेळ लागेल तसेच अद्यापही हे काम थांबलेले नाहीये कारण रोज नवनवीन ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामुळे हे काम आता चालू राहील मदत करण्यासाठी

शासन कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली अतिवृष्टी झाल्यानंतर पंचनामा करणे व त्यांना मदत करणे ही काम अधिक वेगाने होईल शासनाने काही धोरणांमध्ये बदल केल्या यामध्ये ज्या तालुक्यात नुकसान करत त्याच तालुक्याला मदत करण्याचे धोरण देखील तयार करण्यात आले आहे जर कोणी मृत्यूमुखी पडले असेल जखमी झाले असेल तर त्यांना मदत करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर मदत होऊ शकेल
हे हि वाचा-NO SUGAR-“२१ दिवस साखर खाणे बंद करा; जाणून घ्या शरीरात होणारे अद्भुत बदल”
पुरामध्ये अनेक जनावरे वाहून गेले आहेत?
>अतिवृष्टी मुळे आलेला पूर या पुरामुळे शेतीचे नुकसान तर झालेच आहे त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे जनावरे देखील वाहून गेले आहेत आता यांना मदत कशी करायची त्याविषयी सुद्धा शासनाने नवीन धोरण आणले आहे पूर्वी जे जनावर वाहून गेले किंवा पावसामुळे दगावले त्यांना मदत करण्यासाठी शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमार्टम रिपोर्ट लागायचा पण आता पुरामुळे जनावरही पाण्यासोबत वाहून गेली आहेत त्यांना मदत कशी करायची हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यावर शासनाने घेतलेले निर्णय म्हणजे की त्या

शेतकऱ्याने यापूर्वी जनावरांचे केलेले लसीकरण त्याची पावती असेल तर त्याच्याकडे जनावर होती हे ग्राह्य धरले जाईल तसेच जर लसीकरणाची पावती नसेल तर ग्रामसेवक सरपंच यांनी अहवाल दिला की सदरील व्यक्तीकडे जनावर होते तरीसुद्धा त्यांना शासन स्तरावर मदत करण्यात येणार आहे पोस्टमार्टम ची अट ही आता शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांची जनावरे वाहून गेलेली आहेत त्यांना मोठा दिलासा या निर्णयामुळे होणार आहे मुखेड तालुक्यांमध्ये एका डेरी फार्म मधून जवळपास 20 म्हशी व गाई पुरात वाहून गेले आहेत अशा शेतकऱ्यांना या निर्णयामुळे निश्चित मदत होईल
पुरामुळे घरांची झालेली पडझड त्यांना मदत कधी?
>देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis LIVE)या प्रसंगी बोलताना असे म्हणाले की पुरामुळे ज्या घरांची पडझड झालेली आहे त्यांना जिल्हास्तरावर मदत करण्याची निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्याचे संपूर्ण अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतील घराची पडझड झाली चा पंचनामा आल्यानंतर त्यांना मदत देखील केली जाईल जिल्हाधिकाऱ्यांना हा अधिकार असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना ऊणे पैसे विड्रॉल करण्याची अधिकार दिला आहे पद्धतीने त्या कामाला गती येईल असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला
>आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सध्याच्या परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेण्यात आलेला आहे काही ठिकाणी दौरे करणार आहेत
राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला जाईल काय?
>या प्रश्नाचे उत्तर मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis LIVE)यांनी स्पष्ट त्यांनी टाळले त्यांनी जी काही नुकसान झाले आहे त्यांना योग्य पद्धतीने मदत ही शंभर टक्के केली जाईल अशी ग्वाही दिली पण ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत कुठलीही भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis LIVE)यांनी केले नाही
>ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना मदत करण्याचा जीआर आहे त्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्यात येतील तसेच नरेगा अंतर्गत सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis LIVE)यांनी सांगितले
केंद्र शासनाने एन डी आर एफ अंतर्गत आपल्याला आधीच पैसे दिलेले असतात ते पैसे खर्च करू आणि गरज पडली तर राज्य शासन देखील मदत करेल
या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis LIVE)यांनी
मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते ते पाहावं लागेल कारण सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे सतत पाऊस चालू आहे पिके हातची गेलेली आहेत अशा शासनाची मदत किती येते ते पाहावे लागेल







