लोहा डॉक्टर्स असोसिएशनकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात
संकटात देव बनले लोहा डॉक्टर्स – गरजूंना दिला आधार
लोहा तालुका डॉक्टर असोसिएशन चा पुढाकार
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र अतोनात नुकसान झाले आहे. व्यापारी, शेतकरी तसेच सामान्य नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात काही भटक्या जमातींचे लोक पालामध्ये राहतात. त्यांच्या पालामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांच्या सर्व अन्नधान्याचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, कारण जेवढे कमवले आणि साठवले होते, ते सर्व पाण्याखाली गेले. लहान बालक भुकेने व्याकुळ झाले होते.

अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी लोहा डॉक्टर्स असोसिएशन पुढे आले आणि गरजू लोकांना मदत केली. लोहा शहरातील नगरसेवक पंचशील कांबळे यांनी सर्वात आधी 26 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर भटक्या जमातीतील लोकांच्या पालामध्ये पाणी शिरल्याची माहिती घेतली आणि पुढाकार घेऊन हि माहिती सर्वांसमोर आणली
हे हि वाचा-लोहा शहरात पाणीच पाणी पंचशील कांबळे,बी.डी. जाधव सर,गजानन दांगटे मदतीला धावले
लोहा डॉक्टर असोसिएशन ने पुढाकार घेतला आणि येथील गरजू लोकांना अन्नधान्याची किट वाटप केली. त्यामुळे लोहा शहर तसेच परिसरात डॉक्टरांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले.
कोरोना काळात असे म्हटले जात होते की, “देव सध्या मंदिरात नाही, तर डॉक्टरांच्या रूपात पीपीई किटमध्ये आहे.” त्यावेळी लाखो भारतीयांचे जीव डॉक्टरांच्या रूपातील देवांनी वाचवले. जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा डॉक्टर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजसेवेसाठी समोर येतात. लोहा शहरात देखील तसेच घडले.

एरवी रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर आपण पाहिलेले आहेत, पण समाजाचे काही देणे आहे असा विचार बाळगून लोहा डॉक्टर असोसिएशनने गरजू लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला. लोहा शहरातील सर्व डॉक्टरांनी सढळ हाताने मदत केली. त्यांनी एका कुटुंबासाठी आवश्यक असलेले राशन व इतर वस्तू घेऊन एक कीट तयार केली आणि बालाजी मंदिर परिसरातील पालावर राहणाऱ्या लोकांना,सिद्धार्त नगर,जुना लोहा या ठिकाणी वितरित केली. तसेच लोहा शहरातील इतर भागात जिथे पुराचे पाणी घरात शिरले होते, अशा गरजू लोकांना देखील डॉक्टर असोसिएशनने मदत केली.
पुरामुळे पालामध्ये पाणी शिरल्यामुळे त्या भागातील रहिवाशांमध्ये साथीचे आजार पसरले होते. अनेक लोक आजारी पडले आणि त्यांना डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा मोफत दिली. यामध्ये औषध वाटप, पालावर जाऊन तपासणी, औषधोपचार तसेच गंभीर आजारी लोकांना स्वतःच्या दवाखान्यात मोफत सेवा देणे यांचा समावेश होता. यामध्ये मोठ्या व्यक्तींना , तर बालकांना आजार झाले असल्यास उपचार केले.
डॉक्टर असोसिएशनने आम्हाला मदत केली व वेळीच औषधोपचार केला म्हणून आमच्या लहान मुलांचा जीव वाचला अशी भवन या प्रसंगी लोकांनी व्यक्त केली
याप्रसंगी एका महिलेने आपली प्रतिक्रिया संकल्प टुडेला देताना भावुक झाल्याचे पाहिला मिळाले डोळे पाणावले होते हात जोडून भरभरून आशीर्वाद देऊन डॉक्टर असोसिएशन चे आभार मानले
आणि लोहा शहरातील डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
डॉक्टर असोसिएशनने केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वेळ काढून अडचणीत असलेल्या लोकांना मदत करून त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा.








