Advertisement
Uncategorized

Mahashivratri 2025-नांदेड जिल्ह्यामधील हे बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर महर्षी वाल्मिकी यांनी स्थापन केले आहे

Advertisment

आज महाशिवरात्री(mahashivratri 2025) मुळे भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आहे तसेच ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळत आहे महादेवाची एकूण बारा ज्योतिर्लिंग(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR) भारत देशामध्ये आहेत पण भारत देशामध्ये असे एक मंदिर आहे की ज्या मंदिराची स्थापना स्वतः महर्षी वाल्मिकीजींनी(Maharishi Valmiki) केली या ठिकाणी बारा महादेवाच्या पिंडी आहेत येथे दर्शन केल्यामुळे बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची पुण्य लागते

Maharshi Valmiki
महर्षी वाल्मिकी

देवाधिदेव महादेवांचे जगभरात करोडो भक्त आहेत आणि या भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर (BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR)महाराष्ट्र मध्ये औंढा नागनाथ,परळी वैजनाथ,घृष्णेश्वर,त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर अशी ज्योतिर्लिंग आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच मंदिरामध्ये बारा महादेवाच्या पिंडी आहेत(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR) व या ठिकाणी साक्षात महादेवांनी आशीर्वाद दिल्याचे आख्यायिका आहे

Advertisement

 

Advertisement
12 jyotirling Mandir Mala Koli
बारा ज्योतिर्लिंग मंदिर माळाकोळी

माळाकोळी चे बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR)
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुक्यात नांदेड लातूर महामार्गावर लोहा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर माळाकोळी(Malakoli) हे गाव आहे या गावाची विशेषता म्हणजे या गावांमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR) व या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महादेवाच्या बारा पिंडी आहेत ज्यांची एकत्रित पूजा केली जाते

महाशिवरात्रीनिमित्त(mahashivratri 2025) माळाकोळीला(Malakoli)भक्तांची मोठी गर्दी असते व महाशिवरात्री (mahashivratri 2025)नंतर रथोत्सव साजरा केला जातो यामध्ये देवाचा रथ हा संपूर्ण माळाकोळी(Malakoli)गावामध्ये फिरवला जातो ही शेकडो वर्षाची परंपरा आज देखील चालू आहे या गावाची दुसरी ओळख म्हणजे देशभरामध्ये होणारे मंदिरांचे बांधकाम या मंदिरांचे बांधकाम करणे कळसाचे बांधकाम करणे हे बांधकाम करणारे शिल्पकार मंडळी याच गावातील या गावामधील शिल्पकार मंडळी ही देशातच नाही तर विदेशात देखील हिंदू मंदिरांची निर्मिती करतात या मंदिराच्या शिखराचे काम करणारे शिल्पकार माळाकोळी(Malakoli)गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत

Baara jyotirling Temple
बारा ज्योतिर्लिंग मंदिर माळाकोळी

बारा ज्योतिर्लिंगाची मंदिर(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR)
माळाकोळीतील(Malakoli)प्रसिद्ध शिल्पकार जालिंदर महाराज कांगणे यांनी संकल्प टुडे शी बोलताना सांगितले की या मंदिरा संदर्भात पुरातनामध्ये एक कथा आढळते ज्यावरून हे मंदिर किती जुने आहे याचा अंदाजा लावता येतो ? रामायण लिहिल्यानंतर महर्षी वाल्मिकी((Maharishi Valmiki) )विविध ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी फिरत असताना याच माळाकोळी गावात ते आले त्याच दिवशी महाशिवरात्रीचे पर्व सुरू झाले होते आणि असे म्हणतात की या दिवशी कुठल्यातरी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले पाहिजे महर्षी वाल्मिकींनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले तर त्यांना त्यांच्या जवळ परळीचे ज्योतिर्लिंगाची मंदिर आणि औंढा नागनाथाचे मंदिर त्यांना दिसले पण या दोन्ही ठिकाणी पोहोचणे त्यादिवशी त्यांना शक्य नव्हते त्यामुळे महर्षी वाल्मिकींनी ज्या माळावर ते थांबले होते तेथील बारा दगड घेतले व त्यांची प्राणप्रतिष्ठा केली त्यांची ही सेवा पाहून भगवान शंकर प्रकट झाले आणि याच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाच्या (BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR)स्वरूपामध्ये ते राहिले महर्षी वाल्मिकी((Maharishi Valmiki))यांच्या वाल्मिकी पुराणांमध्ये या गोष्टीचा उल्लेख आढळतो

एकंदरीत वाल्मिकी पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे या जागेचा अंदाज घेतल्यास ते मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगाचे(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR) मंदिर माळाकोळी(Malakoli)येथेच आहे असं सिद्ध होतं कारण भोगोलिक रचनेवरून हीच ती मंदिर आहे हे सिद्ध होतं तसेच माळाकोळी(Malakoli) गावामध्ये काही यज्ञ कुंड देखील सापडले आहेत हे यज्ञ कुंड देखील त्याच काळात तील असल्याचे सांगितले जाते अशी माहिती माळाकोळीतील(Malakoli)ग्रामस्थांनी संकल्प टुडे शी बोलताना दिली

हेही वाचा –BASANT PANCAMI – माता सरस्वती व भगवान विष्णू यांच्या मध्ये युद्ध का झाले होते ?

मंदिरातील महोत्सव(Festival in the temple)
या बारा ज्योतिर्लिंगाच्या(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR) मंदिरामध्ये रोज सकाळ सायंकाळ आरती होते विशेष करून या मंदिरामध्ये सर्वात मोठा उत्सव हा महाशिवरात्रीचा(mahashivratri 2025) असतो आणि श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारच्या दिवशी देखील या ठिकाणी लाखो भाविक हे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR) घेण्यासाठी येतात या ठिकाणी दर्शन घेतल्यामुळे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते त्यामुळे ज्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR) घ्यायला जाणे शक्य नाही तेही भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात सर्वांची मनोकामना पूर्ण करणारे हे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे माळाकोळी(Malakoli)पासून आठ किलोमीटर वर भगवान खंडोबाचे मंदिर आहे याच ठिकाणी जगप्रसिद्ध माळेगावची यात्रा देखील भरते

हेही वाचा-Shingnapur temple Decision । आता फक्त ब्रॅण्डेड तेलाभिषेक, शिंगणापूर देवस्थानाचा निर्णय

माळाकोळीला कसे पोहोचायचे(How to reach Malakoli)
माळाकोळी(Malakoli) हे गाव नांदेड लातूर महामार्गावर वसलेले आहे नांदेड पासून पन्नास किलोमीटर तर अहमदपूर पासून हे गाव 20 किलोमीटर आहे लोहा शहरापासून हे गाव बारा किलोमीटर आहे नांदेड लोहा अहमदपूर या तिन्ही ठिकाणावरून या ठिकाणी जाण्यासाठी बसेस आहेत तसेच खाजगी वाहतूक देखील हा पर्याय देखील आहे
आपण जर कधी या मार्गाने जात असाल तर जरूर महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगाच्या(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR) मंदिराचे दर्शन हे आपण जरूर घ्यावे व आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात लाखो भक्तांची या मंदिरावर श्रद्धा आहे या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या माणसाची सर्व कष्ट दूर होतात त्याच्या आयुष्यामध्ये सुख शांती धनसंपदा आरोग्य त्याला मिळते ओम नमः शिवाय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button