Advertisement
"आबा दाबी"

‘ऑपरेशन तुडवा’पण तुडवायचे कोणी?उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर सखोल विश्लेषण

2022 मधील आमदारांच्या बंडानंतर खासदारांची गळती, 'ऑपरेशन तुडवा'ची घोषणा आणि पक्ष संघटनेपुढील आव्हाने यांचा राजकीय परामर्श.

Advertisment

‘ऑपरेशन तुडवा’ पण तुडवायचं कुणी ?

तुमच्या उमेदवाराला मतदान द्यायच आम्हीच , रक्ताचे पाणी शिवसैनिकांनीच करायचं! उमेदवाराला निवडून आणायचंआम्हीच.

Advertisement
ऑपरेशन तुडवा
ऑपरेशन तुडवा

 

Advertisement

आणि त्यांनी गद्दारी केली की त्याला तुडवायचं ही आम्हीच! तुम्ही मात्र फक्त

मातोश्रीचे मजले चढवायचे आणि एसीत बसून नोटांची बंडल मोजत बसायचे?

हेही वाचा-WhatsApp Username फीचर सुरू! आता फोन नंबर लपवून करा चॅट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 2022 मध्ये 40आमदार फुटले. त्यावेळी

उद्धव ठाकरे यांनी, ” ज्यांना जायचे असेल त्यांच्यासाठी दारे उघडे आहेत.”

असे वक्तव्य करून बंडखोरीवर जरब नसल्याची प्रचिती दिली.

याचाच परिपाक म्हणून आता उद्धव सेनेमध्ये दुसऱ्यांदा फूट झाली आहे.

त्यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी अथवा गद्दारी म्हणा, करत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरे आता या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन निष्ठावंतांचे मेळावे घेत आहेत.

2022 पासून तर 26 पर्यंत उद्धव ठाकरे एकच राग आलापत आहेत.

हेही वाचा-लग्न जमत नाही? हजारो तरुण-तरुणी खाटू श्याम मंदिरात का जातात? जाणून घ्या इतिहास, आख्यायिका आणि श्रद्धेचे रहस्य

” माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला आणि माझे चिन्ह चोरले.

ह्या सर्व चोऱ्या होत असताना, पक्षप्रमुख म्हणून तुम्ही काय खबरदारी घेतली?

हा प्रश्न शिवसैनिकांना आणि शिवसेना प्रेमी जनतेला पडला आहे.

मुळात 2019 साली भाजपासोबतची नैसर्गिक युती तोडून काँग्रेस सोबत जाण्याची अवदसा तुम्हाला का आठवली?

हा सर्वसामान्यांसमोरचा प्रश्न आहे.

आठवली तर आठवली, शरद पवारांच्या धूर्त खेळीला बळी पडत तुम्ही

मुख्यमंत्री पद स्वीकारले. एवढेच काय आदित्य ठाकरेंचा देखील मंत्रिमंडळात समावेश केला.

तुमची ही भूमिका अख्या महाराष्ट्राला रुचली नाही. तुमच्या पक्षात देखील याबाबत मोठी खदखद होती.

अशात भाजपाने डाव टाकला.

आणि सत्तेसाठी हापापलेले तुमचे 40 आमदार 50 खोक्यांवर विराजमान होऊन सत्तेत सहभागी होऊन मालामाल झाले.

ही घटना आपण त्यावेळी गांभीर्याने घेतली नाही. पक्षाशी गद्दारी करण्यापूर्वी

100 वेळा विचार करावा लागेल अशी जरब तुम्ही निर्माण करू शकला नाही.

आणि म्हणून ऑपरेशन टायगर जन्माला आले.

तुमचे सहा खासदार गद्दारी करून शिंदे सेनेचे सामील झाले. त्यावरही तुमची कठोर भूमिका दिसली नाही.

” गेले तरी निष्ठावान शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. मी नव्याने खासदार निवडून आनिल “.

अशा पोकळ वल्गना तुम्ही करू लागलात.

आणि मग आता बाळासाहेबांचे ऑपरेशन “तुडवा ” ची तुम्हाला आठवण झाली.

शिवसेना प्रेमी जनतेला देखील तुमच्या या घोषणेने हूरूप आला.

पक्ष पातळीवरून आता मोठी मोहीम सुरू होईल आणि पक्षाची प्रतिष्ठा उंचावेल.

अशी आशा शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी जनतेच्या मनामध्ये पल्लवीत झाली.

या अनुषंगाने आपण गद्दार सहा खासदारांच्या मतदारसंघांमध्ये निष्ठावंतांचे मिळावे घेतले.

या मेळाव्यात आपण शिवसैनिक आणि मतदारांवर जबाबदारी टाकली.

“जिथे गद्दार दिसतील तिथे त्यांना जाब विचारा आमच्याशी गद्दारी का केलीस?”

आम्ही मतदारांनी मातोश्रीवर विश्वास ठेवून रक्ताचं पाणी करून शिवसेनेचे उमेदवार

मग ते आमदार असोत की खासदार निवडून द्यायचे. मातोश्रीचे राजकीय वैभव वाढवायचे.

आणि मातोश्री ने मात्र ही मिळालेली राजकीय प्रॉपर्टी सांभाळण्याची जबाबदारी पार पाडायची नाही.

आणि हे वारंवार घडत राहावे यातून, पक्षप्रमुख म्हणून आपली योग्यता कुठेतरी कमी पडते हे दिसून येते.

बाळासाहेबांच्या काळातही मोठी गद्दारी झाली. मात्र त्यावेळी गद्दारांच्या उरात धडकी भरलेली होती.

” जे गेले ते गेले त्यांना जायचे त्यांच्यासाठी दारे उघडे आहेत.”तुमची ही भूमिका पक्ष हिताच्या दृष्टीने घातक आहे.

तुम्हाला जर पक्ष सांभाळता येत नसेल, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पक्षाशी बांधून ठेवता येत नसेल!

तर, पक्षाचा जनाधार हळूहळू निसटत जाईल. यात शंका नाही

शिवसेनेचा असा ऱ्हास महाराष्ट्राला परवडणारा नाही. याची आपणास कितपत जाणीव आहे याबद्दल शंका येते?

कधी कधी वाटते, बाळासाहेबांचा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय चुकला की काय?

महाबळेश्वरच्या अधिवेशनात, सर्वसामान्य शिवसेना कार्यकर्ते आणि शिवसेना प्रेमी

जनतेच्या अपेक्षेप्रमाणे बाळासाहेबांनी शिवसेना राज ठाकरेंच्या स्वाधीन केली असती तर,

https://www.facebook.com/share/p/1CtLbn62gJ/

कदाचित आज जी शिवसेनेची परवड झाली आहे.

ही टळली असती की काय?

अशी भावना शिवसेना प्रेमींमध्ये जोर धरू लागली आहे.

राज ठाकरे शिवसेनाप्रमुख असते ( तुमच्या जागी) तर गद्दारांना गद्दारी करण्यापूर्वी शंभर वेळेस

विचार करावा लागला असता. अशी चर्चा शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी करू लागले आहेत.

आमदारान पाठोपाठ खासदारांची गद्दारी आणि आता पुन्हा आमदार

तसेच नगरसेवकांची गद्दारी होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

यावर तुम्ही काय वेळीच उपाययोजना करणार त्यावर तुमच्या शिवसेनेचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.

समाजवादी पार्टीच्या खासदारांमध्ये फूट पाडण्याचा घाट घातला जात असताना,

पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी वेळीच खबरदारी घेत त्यांच्या खासदारांसह त्याच्या मतदार संघामध्ये दौरा केला. खासदारांना

त्यांच्या मतदारांप्रती असलेली त्यांची जबाबदारी आणि बांधिलकी याची जाणीव करून देत,

मतदारांचा देखील खासदारांवर नैतिक दबाव पडेल अशी खबरदारी घेतली.

अशा पद्धतीचे खबरदारी आपण ना तर 40 आमदार फुटताना घेतली आणि नाही ही फुट पडल्यानंतर खासदारांच्या फुटी वेळेत घेतली.

महाराष्ट्राशी संपर्क तोडून महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान आपण मुंबईच्या कोशात अडकून राहिलात.

परिणामी पक्षप्रमुखांना गाफील पाहून विरोधकांनी तुमच्या पक्षात फूट पाडण्याचा डाव यशस्वी केला.

आता आपण ऑपरेशन तुडवा चा नारा देऊन शिवसैनिक आणि मतदारांवर या ऑपरेशनची जबाबदारी ढकलत आहात.

या ऑपरेशन मध्ये पक्षप्रमुख म्हणून तुमची भूमिका नेमकी काय राहणार आहे याचे स्पष्टीकरण आपण दिलेले नाही.

त्याचबरोबर इथून पुढे देखील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी गद्दारी केली तरी, आम्ही पुन्हा नव्याने नवीन उमेदवार निवडून आणू.

या तुमच्या भूमिकेने तुम्ही पक्ष सांभाळण्यास आणि पक्ष चालवण्यास असमर्थ आहात.

अशी धारणा सर्वसामान्य जनतेची त्याचबरोबर निष्ठावान शिवसैनिकांची देखील होत चालली आहे.

ऑपरेशन तुडवा हे पक्षश्रेष्ठींच्या पुढाकाराने त्यांच्या उपस्थितीत अमलात आले तर आणि तरच पक्षाचे अस्तित्व टिकून राहून

पक्षाला गत् वैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने काही आशादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अन्यथा ऑपरेशन “तुडवा”ची घोषणा करायची आणि त्याची जबाबदारी मतदार आणि

शिवसैनिकांवर सोपवायची.अशी जर भूमिका असेल? तर, मात्र ऑपरेशन

तुडवा च्या ऐवजी ऑपरेशन पक्ष गुंडाळा असा परिणाम समोर येऊ शकतो.

आमच्या या विश्लेषणाविषयी आपणास काय वाटते?

आपली भूमिका कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून मांडा.

तुमच्या प्रत्येक भूमिकेचे आनंदाने स्वागत आहे.

विश्लेषण आवडल्यास आपल्या पेजवर अवश्य शेअर करा आणि आम्हाला फॉलो करा.

धन्यवाद,

 

आबा शिंदे( पत्रकार)

सामाजिक व राजकीय विश्लेषक

9975909595

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button