Advertisement
लाइफ स्टाइल

किडनी स्टोन (मुतखडा) होण्याचे कारण व उपाय

Advertisment

डॉ .दिनेश राठोड लोहा
मूत्रकृत्छ म्हणजेच मुतखडा
मुत्राची कष्टाने प्रवृत्ती होणे त्यावेळी वेदना सहन न होणे यालाच
मुत्रकृछ असे म्हटले जाते. या व्याधिमध्ये थांबून वारंवार अगदी
अल्प प्रमाणात मूत्रप्रवृत्ती होते, हा एक गंभीर असा मध्यम मार्गातील
व्याधी आहे.मुत्रप्कृछ आणि मूत्राघात एक नसून वेगवेगळ् व्याधी
आहेत मूत्रकृत्छ मध्ये लघवी अडकत अडकत होते आणि मुत्रघात
त्यामध्ये लघवी लगेच थांबून जाते त्याला आपण रिटेन्शन म्हणतो.
सात प्रकार आहे
वातच,पित्तच,कफच,सनीपातीक, पुरिषिज, अशिमरिज
अभिघातज, शुक्रजां असे चरक सहिंतेमध्ये आठ प्रकार सांगितले
आहेत.
हेतु..
म्हणजेच कारण अति व्यायाम, तिक्षण औषधांची सेवन, रुक्ष
पदार्थाची सेवन, घोड्यासारख्या अती वेगवान वाहनावर बसून प्रवास
करणे, अनुप मांस व मासे अधिक प्रमाणात खाणे, उपाशी राहणे
आणि अजीर्ण. मध्यपान तेलकट हॉटेलचे अतिप्रमाणामध्ये सेवन
करणे
चिकित्स
सोनोग्राफी केल्यानंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये सात ते आठ, दहा,
१२, 16 एमएम पर्यंतची खडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट केल्याने सहज
पडून जातात कारण हा खडा कशामुळे तयार झाला; तर यामध्ये
अपचन किंवा पचनामध्ये आम तयार होणे म्हणजे acidity lewal
जास्त वाढणे किडनीत क्षार चे प्रमाण वाढणे या कारणाने एकापेक्षा
जास्त खडे तयार होतात त्यावर चिकित्सा करताना अभ्यंग म्हणजे
पूर्ण अंगाला मालिश करून वाफारा दिल्यास किंवा बस्ती प्रयोग
केल्यास याचा खूप फायदा होतो तसेच औषधांमध्ये अनेक औषधी
आहेत त्यामध्ये गोक्षुर, पुनर्नवा, काढा, चंद्रप्रभा वटी ई. असे अनेक
गुणकारी औषध आहेत याचा दोन प्रकारे फायदा होतो एक तर खडा
पडतो आणि पुन्हा पुन्हा खडा तयार व्हायची प्रवृत्ती बंद होते आणि
रुग्णांना ऑपरेशन पासून वाचवू शकतो परंतु यामध्ये रुग्णांनी भोंदू
लोकांकडून औषधे घेण्यापेक्षा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घ्यावा
नंतरच उपचार करावे कोणतेही मनाने प्रयोग करत राहिल्यास याची
गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button