Advertisement
"आबा दाबी"

हिंगोली ठरणार गेम चेंजर? परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत बदलती समीकरणे

सुशील देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे रंगत वाढली; हिंगोलीच्या मतदारांची भूमिका ठरणार निर्णायक

Advertisment

*हिंगोली ठरणार गेम चेंजर *

Parbhani Hingoli MLC Election

परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक रंगतदार होऊ लागली आहे.

Advertisement

महायुती आणि महाआघाडी असा सरळ सामना होईल असे वाटत असताना,

Advertisement

https://www.facebook.com/share/p/1cegqWdFeG/

सुशील देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीने या निवडणुकीची रंगत वाढविली आहे.

त्यासोबतच निवडणुकीची समीकरणे बदलल्यामुळे युती आणि आघाडीमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.

हेही वाचा-पुरेशी झोप न घेतल्यामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार! जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम आणि शांत झोपेचे उपाय

या मतदारसंघात एकूण 465 मतदार असून त्यापैकी 335 मतदान

हेही वाचा-10 हजार पावले चालण्याचे फायदे | वजन कमी करण्यासाठी आणि शुगर नियंत्रणासाठी

परभणी जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेतून तर 130 मतदान हिंगोली जिल्ह्यातून आहे.

Parbhani Hingoli MLC Election
Parbhani hingoli MLC ELECTION

परभणी जिल्ह्यातील मतांची विभागणी होईल. असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

ही फूट विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मतांची होईल. असा अंदाज वर्तविला जात आहे.

त्याचप्रमाणे जातीय समीकरणे देखील जुळविण्याचा प्रयत्न होईल.

आणि त्यातून मतांची फूट होईल असे बोलले जात आहे.

मात्र या निवडणुकीत हिंगोली ची भूमिका निर्णयक ठरणार. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हिंगोलीला स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात प्रतिनिधित्व करायला मिळत नाही.

म्हणून या निवडणुकीत उमेदवाराच्या विजयामध्ये हिंगोली चा प्रभाव दिसावा.

जेणेकरून आगामी काळात या मतदारसंघावर हिंगोलीला दावा सांगता येईल.

या भूमिकेतून हिंगोलीच्या मतांमध्ये एकसंघता दिसेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

हिंगोली जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बऱ्यापैकी प्रभुत्व आहे.

त्यामुळे शिंदे सेनेचे शिलेदार, आमदार संतोष बांगर, माजी आमदार गजानन घुगे त्याचप्रमाणे

माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे या निवडणुकीत पक्षाची

आणि पक्षात स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी बाजी लावतील.

असा अंदाज वर्तविला जात आहे.

हिंगोलीच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात(Parbhani hingoli MLC ELECTION) अजून तरी एक वाक्यता किंवा मतदारांमध्ये एकसंघता दिसून येत नाही.

शिंदे सेनेने युतीचा मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. याच टीकेला भाजपला देखील सामोरे जावे लागत आहे.

मतदार संघात सर्वात जास्त 131 मतदार असून देखील राष्ट्रवादीला संधी मिळाली नाही. याचीही खंत राष्ट्रवादीच्या गोटात आहे.

सुषिल देशमुख यांच्या उमेदवारीने मतांचे ध्रुवीकरण होईल असेही बोलले जात आहे.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जातीय समीकरणावर ध्रुवीकरण होईल आणि त्यातून आपली

राजकीय पोळी भाजता येईल. अशी राजकीय खेळी देखील खेळण्याचा डाव आखला जात आहे.

महायुतीने मात्र ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असून राज्यातील मंत्र्यांचा ताफा आमदारांची फौज आणि

कार्यकर्त्यांचा जथ्था, यासोबतच लक्ष्मी अस्त्राचा वारे बाप वापर या माध्यमातून ही निवडणूक

येन केन प्रकारेन जिंकायचीच. असा चंग युतीने बांधलेला दिसतोय.

या सर्व पार्श्वभूमीवर युतीचे उमेदवार सईद खान हे निवडणूक आपणच जिंकणार अशा आत्मविश्वासात आहेत.

निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यात विरोधक काय खेळी खेळतात आणि ही निवडणूक मतांच्या जातीय

ध्रुवीकरणाकडे घेऊन जाण्यात कितपत यशस्वी ठरतात यावर पुढच्या टप्प्यात निवडणुकीची सूत्रे आणि समीकरणे बदलत जातील.

मात्र हे तेवढेच खरे की, या निवडणुकीत हिंगोलीच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

हे झाले आमचे मत.

आपणास याविषयी काय वाटते ते आवश्यक कळवावे.

आपल्या कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा देतात त्याचबरोबर विषयाचा गहण अभ्यास करण्यास प्रोत्साहित करतात.

 

या बातमीसाठी टायटल सब टायटल मेटा डिस्क्रिप्शन एसइओ टायटल फोकस कीवर्ड लिहून द्या

हा लेख प्रसिद्ध पत्रकार आबा शिंदे यांनी लिहिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button