कुत्र्याच्या चाटण्यामुळे महिलेला गमवावे लागले हात-पाय
पाळीव कुत्र्यांमुळे होऊ शकतात गंभीर आजार

Dog Licking Infection
बऱ्याच घरांमध्ये कुत्रा पाळला जातो आणि या कुत्र्याला इतका लळा लागतो की तो घरातील सदस्य झाल्यासारखा होतो. बऱ्याच उदाहरणांमध्ये कुत्र्याच्या अचानक

जाण्यामुळे मानसिक तणाव देखील आल्याचे पाहायला मिळाले आहे. पण एका ब्रिटिश महिलेसोबत काही वेगळंच घडलं. फक्त कुत्र्याच्या चाटण्यामुळे(Dog Licking Infection) तिला आपला एक हात गमवावा लागला आणि हार्ट अटॅक देखील आला.
हे ही वाचा –SIR प्रक्रिया एप्रिलपासून देशभरात सुरू होणार
हेही वाचा-तिरुपती बालाजी दर्शनासाठी नवीन पर्याय: ₹300 मध्ये मिळणार झटपट दर्शन, जाणून घ्या पूर्ण माहिती
कुत्र्यांमुळे होतात गंभीर आजार?
कुत्र्यामुळे माणसाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने रेबीज नावाचा रोग आहे, ज्याला कुठलाही इलाज नाही. जर आपल्याला कुत्रा चावला आणि लवकर इंजेक्शन घेतले तरच हा रोग टाळता येतो,
नाहीतर हा रोग शंभर टक्के प्राणघातक ठरतो. कारण कुत्र्यांची वागण्याची पद्धत थोडी वेगळी असते. सहसा कुत्री चाटतात(Dog Licking Infection) किंवा हळूच चावा घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते. यामध्ये त्वचेचे विकार देखील होण्याची शक्यता दाट असते,
कारण कुत्र्यांमध्ये त्वचेचे विकार मोठ्या प्रमाणात पाहिले गेलेले आहेत. ते विकार देखील या कुत्र्यांच्या संपर्कात येणाऱ्याला होऊ शकतात. कुत्रा चाटल्यामुळे देखील गंभीर आजार होऊ शकतात. यामध्ये महत्त्वाचा आजार म्हणजे सेप्सिस. हा आजार किती गंभीर आहे ते पाहूया.
https://en.wikipedia.org/wiki/Sepsis
सेप्सिसचा प्रसार कसा होतो?
सेप्सिस (Sepsis) हा एक गंभीर वैद्यकीय आजार आहे, जो शरीरात झालेल्या संसर्गामुळे निर्माण होतो. साध्या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास तो सेप्सिसमध्ये परिवर्तित होऊ शकतो.
सेप्सिस हा थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरत नाही, पण त्याला कारणीभूत असणारे जंतू (बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस) हे संसर्गाद्वारे पसरू शकतात.(Dog Licking Infection)
सर्वसाधारणपणे सेप्सिसची सुरुवात एखाद्या संसर्गापासून होते, जसे की न्यूमोनिया (फुफ्फुसांचा संसर्ग), मूत्रमार्गातील संसर्ग, पोटातील संसर्ग किंवा त्वचेवरील जखम. हे जंतू रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि संपूर्ण शरीरात पसरतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा अतिप्रतिक्रिया देते आणि शरीरातील अवयवांवर परिणाम होतो.
रुग्णालयांमध्ये सेप्सिसचा धोका जास्त असतो, कारण तिथे संसर्ग पसरवणारे जंतू सहज आढळतात. विशेषतः आयसीयूमध्ये असणारे रुग्ण, ऑपरेशन झाल्यानंतरचे रुग्ण किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे,
त्यांना सेप्सिसचा धोका अधिक असतो. स्वच्छतेचा अभाव, योग्य वेळी उपचार न मिळणे आणि अँटिबायोटिक्सचा चुकीचा वापर यामुळेही सेप्सिसचा प्रसार वाढू शकतो.
सेप्सिस टाळण्यासाठी स्वच्छता राखणे, जखमा स्वच्छ ठेवणे, संसर्गाची लक्षणे दिसताच त्वरित उपचार घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेणे आवश्यक आहे. वेळेत उपचार केल्यास सेप्सिसवर नियंत्रण मिळवता येते, अन्यथा तो जीवघेणा ठरू शकतो.
ब्रिटिश महिलेसोबत काय घडले?
५२ वर्षीय ब्रिटिश महिला मनजित संघा यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. सेप्सिस नावाच्या धोकादायक संसर्गामुळे तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिचे हात आणि पाय कापावे लागले. हा संसर्ग तिच्या कुत्र्याने तिला चाटल्यामुळे झाला होता. या काळात तिला अनेक
हृदयविकाराचे झटके आले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तिच्या कुत्र्याने तिच्या हातावर किंवा पायावर असलेला छोटासा कट किंवा जखम चाटला(Dog Licking Infection) असावा, ज्यामुळे तिच्या शरीरात संसर्ग झाला आणि सेप्सिस झाला असावा. पाळीव कुत्र्याशी खेळल्याने ती आजारी पडली.
मनजित संघा यांनी बीबीसीला सांगितले की, चारही हातपाय गमावल्यानंतर तिला जीवन समजून घेणे आणि स्वीकारणे खूप कठीण झाले होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये एका रविवारी ती अस्वस्थ वाटत घरी परतली, तेव्हा तिच्यासाठी हे सर्व सुरू झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी
ती कोसळली. तिचे पाय थंड होते, तिचे ओठ निळे झाले होते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिचे पती काम संघा यांनी सांगितले की तिची प्रकृती वेगाने बिघडत होती. ते म्हणाले, “शनिवारी ती कुत्र्यासोबत खेळत होती, रविवारी ती कामावर गेली आणि सोमवारी रात्रीपर्यंत ती कोमात गेली.”
6 वेळा हृदयविकाराचा झटका आला
संसर्ग वाढत गेल्यामुळे डॉक्टरांना तिचे दोन्ही पाय आणि गुडघ्याखालील दोन्ही हात कापावे लागले. न्यूमोनिया आणि पित्ताशयाच्या खड्यांमुळे तिची प्लीहा काढून टाकावी लागली. आता मनजित संघा कृत्रिम अवयव (प्रगत कृत्रिम अवयव) साठी निधी उभारत आहेत आणि सेप्सिसच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करत आहेत. तिने सांगितले की आता तिला पुन्हा चालायचे आहे आणि कामावर परतायचे आहे.
या महिलेला पायावर काही जखमा होत्या आणि त्या जखमांना कुत्र्याने चाटल्यामुळे(Dog Licking Infection) हा गंभीर आजार झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घरांमध्ये असलेले कुत्रे लहान मुलांना चाटतात, त्यामुळे
आपण देखील काळजी घेणे गरजेचे आहे, नाहीतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या महिलेसोबत जे घडले ते अन्य कोणासोबतही घडू नये हीच अपेक्षा आहे. आपण आपल्या कुत्र्याचे लसीकरण (व्हॅक्सिनेशन) वेळेत करून घ्यावे.
नोट-सदरील माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून गोळा केलेली आहे ही माहिती फक्त आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे वैद्यकीय उपचारासाठी नाही वैद्यकीय उपचाराच्या आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर द्या







