Advertisement
राजकीय बातम्या

शरद पवार यांचे फोटो वापरणार नाही अशी लेखी हमी द्या सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सांगितलं

Advertisment

राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर हे प्रकरण केंद्रीय
निवडणूक आयोगासमोर गेले तेथे निकाल
हा अजित पवार यांच्या बाजूने लागला याच्या
विरोधात शरद पवार गट न्यायालयात गेला
त्यावर आज सुनावणी पार पडली या सुनावणी
दरम्यान मा सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला
चांगलं खडसावलं कोर्टाने असे सांगितले की
तुम्ही यापुढे शरद पवार यांचे फोटो वापरणार नाही
असं लेखी न्यायालयाला द्यावे असे सांगितले
शरद पवार गटाची वकील अभिषेक मनु सिंघवी
यांनी छगन भुजबळ यांचे एक विधान वाचून दाखवले
यामध्ये छगन भुजबळ म्हणाले की आपल्याला घड्याळ
निशान तसेच शरद पवार यांचे फोटो वापरावे लागतील
ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी यानंतर माननीय कोर्टाने
अजित पवार गटाला सांगितले की तुम्ही तुमचे स्वतःचे
फोटो का वापरत नाही यापुढे शरद पवार यांचे फोटो
वापरणार नाही असे आम्हाला लेखी हमी द्या
यावर अजित पवार गटाची वकील यांनी सांगितलं
की आम्ही शरद पवार यांचे फोटो वापरत नाहीत
काही उत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर
अशा पद्धतीचे फोटो वापरले आहेत या मीडिया
पोस्टवर आम्हाला लक्ष ठेवून होणार नाही असेही
अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितले तर यावर
न्यायमूर्तींनी तुमच्या कार्यकर्त्यांना शिस्त लावा असं
सांगितलं
आता सर्वांचे लक्ष पुढील सुनावणी कडे लागली आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button