राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक शेतीला नवे बळ
. नाम फाउंडेशन, कणेरी मठ, श्री श्री रविशंकर आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या अनुभवाचा उपयोग होणार.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून राजभवनात नैसर्गिक शेती परिषद आयोजित.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत सहभागी होऊन या मोहिमेची गरज अधोरेखित केली. तसेच राज्यपालांनी हाती घेतलेला हा संकल्प सिद्धीस जावा यासाठी त्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
नैसर्गिक शेतीची आवड असणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्य आहे. ते स्वतः अनुभवी शेतकरी आहेत आणि रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेत त्यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा संकल्प जाहीर केला.
असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले. राज्यपाल देवव्रत लवकरच राज्यभर नैसर्गिक शेतीबाबत स्वतः दौरे करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
काळाची गरज ओळखून नैसर्गिक शेतीकडे पावले टाकणे गरजेचे आहे. कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर स्वामी, श्री श्री रविशंकर, नाम फाउंडेशन, धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थांच्या अनुभवाचा लाभ घेऊन आपण
ही शेती पद्धत हवामान बदलावर उपाय व उत्पादन खर्च कमी करणारी आहे.
नैसर्गिक शेतीला चालना देऊ शकतो. पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठीही आपण प्रयत्न करत आहोत, त्यासाठी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणे देखील एक महत्त्वाचे पाऊल असेल असेही याप्रसंगी नमूद केले.
राजभवनातील ही परिषद मर्यादित न राहता, राज्यातील आमदार-खासदारांनी आपल्या कार्यक्षेत्रात नैसर्गिक शेतीचा प्रचार करावा. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात २५ लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले आहे.
महायुती सरकार सेंद्रिय शेतीला चालना देणारे सरकार असून यापुढेही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.
नैसर्गिकशेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही #शेती पध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजल पातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदल या संकटावर उपाय असून शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या
रक्षणाबरोबरच पर्यावरण, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, पाणी आणि माती या तिन्हींचे रक्षण करते ही पध्दती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेती परिषदेत सांगितले
हवामान बदलाचा शेतीवर होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेता, नैसर्गिक शेती ही त्यावरचा सर्वाधिक परिणामकारक उपाय आहे. नैसर्गिक शेती ही केवळ सेंद्रिय शेतीसारखी नाही, तर ती अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक आहे.
२०१४ मध्ये झालेल्या नैसर्गिक शेती मिशनचा हा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला, मात्र त्यावेळी नैसर्गिक व सेंद्रीय शेती हे दोन्ही एकत्रच
हेही वाचा-दुधाळ जनावरांसाठी केंद्र सरकारची नवी विमा योजना — 80% हप्ता केंद्राकडून
हेही वाचा-“शेत रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक: जिल्ह्यात सुरू सीमांकन आणि अतिक्रमणमुक्ती मोहिम”
राबविण्यात आले होते. नैसर्गिक आणि सेंद्रीय शेती पद्धतीत भेद ठेवला नव्हता. मात्र २०२३ साली राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर महाराष्ट्रात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैसर्गिक शेती परिषदेत सांगितले.
https://www.facebook.com/share/p/17JUV6TKBp/
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सौ.पंकजा मुंडे, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री गिरीश महाजन, मंत्री आशिष शेलार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच अनेक मंत्री, आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते







