Advertisement
राजकीय बातम्या

काँग्रेस-NCPमधील मतभेद चव्हाट्यावर? शरद पवारांच्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण

मोदी-पवार भेटी, सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य आणि विजय वडेट्टीवारांच्या टोमण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा

Advertisment

काँग्रेस NCP मतभेद

काँग्रेस NCP मतभेद 
काँग्रेस NCP मतभेद

एनसीपी आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाले असल्याची चर्चा आहे आणि कारण आहे.

Advertisement

भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जवळी वाढत असल्याची

Advertisement

चर्चा यामुळेच या आघाडी मधील दोन पक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे.

 

दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलनीकरण करण्याची चर्चा सध्या परत एकदा जोर पकडत आहे आणि याला कारण आहे.

ते मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली जवळीक.

यामुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा सध्या चालू आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची भेट

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शरद पवार यांची एका महिन्यातच दोनदा भेट झाली.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.

हे ही वाचा-एका महिन्यात १३ वेळा पेनकिलर घेतल्याने दोन्ही किडन्या खराब?

यानंतर सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या लग्नाच्या स्वागत समारंभात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. याप्रसंगी नरेंद्र

मोदी व शरद पवार यांच्यामध्ये परत एकदा चर्चा झाली आणि यामुळेच

राज्यामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणाचीदेखील चर्चा सुरू झाली आहे.

 

राज्यातील काँग्रेस आमच्यावर का नाराज ते कळत नाही – सुप्रिया सुळे

 

कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी जेव्हा सुप्रियाताई सुळे यांना प्रश्न विचारला,

की तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत जाणार का? त्यावर त्यांनी उत्तर दिले की,

तुम्ही जर काँग्रेसचे ट्विटर हँडल पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा लोकसभेचे अधिवेशन होतं,

हेही वाचा-तारक मेहता का उल्टा चश्मा कलाकारांचे मानधन: कोण घेतो सर्वाधिक पैसे?

तेव्हा रोज विरोधी पक्षांची बैठक व्हायची, ज्यामध्ये राहुल गांधी, मी स्वतः,

संजय राऊत सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांची बैठक व्हायची. त्या बैठकीला

मी उपस्थित राहायचे. 30 दिवस अधिवेशन चाललं, त्यापैकी वीस दिवस कामकाज झालं.

वीस दिवस मी राहुल गांधी यांच्यासोबत होते. मला माहित नाही की दिल्लीतील काँग्रेससोबत मी आहे,

राज्यातील काँग्रेसला माझ्याबद्दल काय अडचण आहे, तेच मला कळायला तयार नाही.

महाराष्ट्रातील काँग्रेस कमिटीला माझ्याबद्दल काय राग आहे, ते कळायला तयार नाही, असे खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

आमच्याबद्दल काय नाराजी आहे, हे तुम्ही राहुल गांधींनाच विचारलं पाहिजे तर.

 

विजय वडेट्टीवार यांनी दिले सुप्रिया सुळे यांना उत्तर

 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की,

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षावर नाराज का व्हावं? तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांना कितीदा ही भेटले तरी आमची नाराजी नाही. तुम्ही कोणाच्याही विमानातून गेले

तरी आम्हाला राग नाही. आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्यासोबत आहात.

सत्ताधारी पक्षांना भेटलंच पाहिजे. तीन-तीनदा जरी भेटले तरीसुद्धा आम्हाला राग नाही,

असा टोमणा देखील विजय वडेट्टीवार यांनी लगावला. काय ते आम्ही पाहत आहोत, नेमकं काय शिजत आहे?

 

एनडीएला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदारांची गरज?

 

लोकसभेमध्ये काही महत्त्वाची विधेयके येणार आहेत. यामुळे सध्या एनडीए विरोधी पक्षातील अनेक पक्षांच्या तसेच

खासदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडे आठ खासदार आहेत.

त्या खासदारांची गरज एनडीएला आहे. शरद पवार हे विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत.

जर शरद पवार एनडीएसोबत आले तर विरोधी पक्षाला फार मोठा फटका बसेल.

त्यामुळे देखील भारतीय जनता पार्टी सध्या शरद पवार यांच्यासोबत

संपर्क वाढवत असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये सध्या मतभेद चालू असल्याची चर्चा आहे.

जरी हे दोन्ही पक्ष याबाबतीत नकार देत असले तरी नाराजी मात्र बोलण्यातून जाणवत आहे.

नेमकं शरद पवार एनडीएसोबत जाणार की विरोधी पक्षातच राहणार, हे आता पाहावे लागेल.

पण भेटीगाठींमुळे राजकीय चर्चा मात्र रंगत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button