PM Kisan 22nd Installment Date हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता;शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
शेतकरी सन्मान निधीचा 22वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता; कोणाला मिळणार नाही ते जाणून घ्या

PM Kisan 22nd Installment Date
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेचा 22 वा हप्ता कधी जमा होणार याविषयी सध्या शेतकऱ्यांमध्ये तसेच शासन स्तरावर देखील चर्चा सुरू आहे. कारण या महिन्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.
शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) अंतर्गत हे पैसे सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात.
हेही वाचा-PM Kisan 22वा हप्ता : तुमच्या गावात कुणाला मिळणार 2000 रुपये? 2 मिनिटांत यादी तपासा
हेही वाचा-लखपती दीदींचे लक्ष्य दुप्पट, ६ कोटींचा नवा संकल्प
वर्षाचे सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 21 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तर 22 वा हप्ता कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणि सुरू असलेल्या चर्चेनुसार कोणत्या तारखेला शेतकरी सन्मान निधीचा 22 वा हप्ता जमा होणार ते पाहूया.
22 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार?
शेतकरी सन्मान निधीचा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT अंतर्गत जमा होणार आहे. 2019 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये देशातील पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये दिले जातात.
याचे तीन टप्पे पाडण्यात आले असून प्रत्येक टप्प्यामध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी देशाचे अर्थमंत्री पियुष गोयल होते. जगातील सर्वात मोठी योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तर 22 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2026 रोजी वितरित केला जाईल, अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे. तसेच शासन स्तरावर देखील या संदर्भातील हालचालींना वेग आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना 22 वा हप्ता मिळणार नाही?
या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना काही निकष पाळावे लागतात. ज्यांनी हे निकष पाळले नाहीत, त्यांना 22 वा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील कारणे आहेत:
नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक
e-KYC न केलेले शेतकरी
बँक खात्याची चुकीची माहिती दिलेली
भू-सत्यापन अर्धवट ठेवलेले
आधार क्रमांक चुकीचा असणे
ज्या शेतकऱ्यांना 21 वा हप्ता मिळाला नाही, त्यांनी या त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करून घ्याव्यात. तरच 22 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.
फार्मर आयडी नसल्यास अडचण
महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच देशातील इतर राज्यांमध्ये फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत.
तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीसाठी देखील फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, त्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी काढून घ्यावा.
हप्ता मिळणार की नाही ते कसे तपासायचे?
शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात PM Kisan योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे आता अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन तपासता येते. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या – pmkisan.gov.in
होमपेजवर गेल्यानंतर “Know Your Status” किंवा “Farmer Corner” या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका
पुढे “Get Data” या बटणावर क्लिक करा
क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या हप्त्याची पेमेंट स्थिती स्क्रीनवर दिसेल
वरील प्रक्रिया पूर्ण करून आपण शेतकरी सन्मान निधीचा 22 वा हप्ता तपासू शकता. सदरील तारीख ही संभाव्य तारीख आहे.







