Advertisement
राजकीय बातम्या

“पिपाणी चिन्ह गोठवले: शरद पवार गटाला मोठा दिलासा

19 जागांवरील फटका आता टळणार!"

Advertisment

“पिपाणी चिन्ह गोठवले”

 

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासारखेच

Advertisement

 

Advertisement

एक चिन्ह म्हणजे ‘पिपाणी’ (इंग्रजीमध्ये ट्रंपेट) गोठविण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली होती. आज त्या विनंतीला यश मिळाले आहे.

शरद पवार भारतीय राजकारणी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे राजकीय नेते.

नेमकी मागणी काय होती?

 

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांना वेगळे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित दादा पवार यांच्या वाट्याला गेले. शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या चिन्हासारखेच ‘पिपाणी’ हे देखील चिन्ह होते. लोकसभा निवडणुकीत

 

अनेक जागीं प्रतिस्पर्धी उमेदवारांनी तुतारीच्या विरुद्ध पिपाणी हे चिन्ह घेतले आणि मतदारांना दोन्ही चिन्हे सारखी वाटल्यामुळे गोंधळ झाला. पिपाणी चिन्हाला मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले. हा मतांचा टक्का एवढा जास्त होता की काही जागीं जिंकण्याचे मार्जिन कमी झाले, तर काही जागीं उमेदवारांचा पराभवही झाला.

 

लोकसभेच्या लगेच विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. यादरम्यान शरद पवार यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या-मंडळींनी निवडणूक आयोगाकडे पिपाणी हे चिन्ह गोठविण्यासाठी अर्ज दाखल केला. मात्र हा अर्ज विधानसभेच्या निवडणुकीनंतरही निकाली लागला नाही

हेही वाचा-“महानगरपालिका निवडणुका कधी?

हेही वाचा-बिहार विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत?

 

आणि विधानसभेला देखील पिपाणी चिन्हामुळे शरद पवार यांच्या पक्षाला मोठा फटका बसला. पण आज निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठविल्याने याचा फायदा शरद पवार यांच्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत होणार आहे.

https://youtu.be/TQdcExiU_2c?si=hClgI2m0PMULyIcj

लोकसभेला कोणत्या मतदारसंघांमध्ये पिपाणीमुळे अडचण आली?

 

लोकसभा निवडणुकीत ‘पिपाणी’ या चिन्हामुळे शरद पवार यांच्या पक्षाला अनेक मतदारसंघांत फटका बसला होता. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘पिपाणी’ चिन्हावर अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली. विशेषतः

 

 

शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, बीड आदी मतदारसंघांत या चिन्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सातारा लोकसभेची जागा पवार गटाला पिपाणी चिन्हामुळे थोडक्यात गमवावी लागली होती.

 

विधानसभेला कोणत्या मतदारसंघांमध्ये पिपाणीमुळे अडचण आली?

 

विधानसभेत तब्बल १९ जागांवर फटका बसल्याची चर्चा आहे. आकडेवारीही हेच सुचवते. शरद पवार गटाच्या माहितीनुसार, जितूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज आणि परांडा

 

 

या विधानसभा मतदारसंघांत पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारांना पक्षाच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. या मतांची विभागणी झाली नसती तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे किमान १९ आमदार निवडून आले असते, असा पक्षाने दावा केला होता.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मोठा दिलासा

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय शरद पवार यांच्या पक्षासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. पिपाणी हे चिन्ह गोठविल्यामुळे आता तुतारीसारखे दुसरे चिन्ह उपलब्ध नसल्याने जे

 

मतदार भ्रमित होत होते, ते आता होणार नाहीत. त्यामुळे याचा थेट फायदा निश्चितच शरद पवार यांच्या पक्षाला होईल. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी 184 यादीतील पिपाणी हे चिन्ह कायमचे वगळले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button