Advertisement
राजकीय बातम्या

ठाकरे कुटुंब एकत्र-उद्धव-राज ठाकरे एकत्र दीपोत्सवात; मराठी एकजुटीचा नवा प्रकाश शिवाजी पार्कवर उजळला

ठाकरे घराण्याच्या वारसदारांनी दिली 'एकजुटी'ची साक्ष, फोटोची तुफान चर्चा...

Advertisment

उद्धव-राज ठाकरे एकाच गाडीत; मराठी एकजुटीचा दीप उजळला! मनसेच्या दीपोत्सवात उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान

मुंबई : शिवाजी पार्कवर मनसेकडून आयोजित दीपोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ठाकरे कुटुंब एकत्र  अनेक वर्षांनंतर एका मंचावर एकत्र आले. या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यासह तेजस, आदित्य, अमित आणि मिताली ठाकरे सर्वजण एकत्र उपस्थित होते.

 

Advertisement
ठाकरे कुटुंब एकत्र
ठाकरे कुटुंब एकत्र

या सोहळ्यात उद्धव ठाकरे म्हणाले, “आजची दिवाळी ही वेगळी आणि विशेष आहे. मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. सर्वांनी प्रकाशात राहा, आनंदात राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र!” या शब्दांतून उद्धव ठाकरेंनी मराठी एकतेचा संदेश दिला.

Advertisement

 

 

विशेष म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे हे दोघेही एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी आले. राज ठाकरे स्वतः स्टीअरिंगवर होते, तर उद्धव ठाकरे शेजारी बसले होते. आदित्य आणि अमित ठाकरे दुसऱ्या गाडीत, तर रश्मी आणि शर्मिला ठाकरे तिसऱ्या गाडीत दाखल झाल्या. ठाकरे कुटुंबाच्या या आनंदी उपस्थितीने शिवाजी पार्क प्रकाशमय झाला.

 

हे हि वाचा –दिवाळी प्रवासात प्रवाशांची लूट! खाजगी ट्रॅव्हल्सकडून तिकीट दरवाढ दुपटीपेक्षा जास्त

हे हि वाचा –दिवाळी प्रवासात प्रवाशांची लूट! खाजगी ट्रॅव्हल्सकडून तिकीट दरवाढ दुपटीपेक्षा जास्त

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केवळ अर्ध्या मिनिटाचे भाषण केले. त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य टाळले आणि दिवाळीच्या शुभेच्छाच दिल्या. तर राज ठाकरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले नाही. तरीसुद्धा या दोघांच्या देहबोलीने आणि हसऱ्या चेहऱ्यांनी एक नवा संदेश दिला – “एकजूट आणि सलोखा!”

 

 

तीन महिन्यांत सातव्यांदा झालेल्या या भेटीमुळे ठाकरे कुटुंबातील दुरावा संपुष्टात येत असल्याचे संकेत मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे तसेच उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य, संजय राऊत यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या कार्यक्रमात उपस्थित होते. दिवाळीच्या उत्सवात उजळलेला हा ठाकरे मिलाफ मराठी एकजुटीचा नवा दीप ठरला, हे निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button