Advertisement
शेती

नांदेड हवामान अलर्ट : 24 ते 26 सप्टेंबर यलो, तर 27 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट

नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Advertisment

नांदेड जिल्ह्यासाठी 24 ते 26 सप्टेंबर या तीन दिवस यलो तर 27 सप्टेंबर रोजी ऑरेज अलर्ट जारी

नांदेड दि. 24 सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २४ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २४, २५ व २६ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. तर २७ सप्टेंबर या दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. २४ व २५ सप्टेंबर २०२५ हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व २७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Advertisement
"24 September 2025 Maharashtra Weather Alert Map – Yellow Alert Districts"
“24 September 2025 Maharashtra Weather Alert Map – Yellow Alert Districts”

या गोष्टी करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

Advertisement

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

हे हि वाचा-DEVENDRA FADAVNIS-मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर | दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button