Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

स्व.विनायकराव मेटे यांच्या पत्नी श्रीमती ज्योतीताई मेटे शरद पवार गटात प्रवेश करणार

Advertisment

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे स्वर्गीय विनायकराव मेटे हे एक मोठं नाव एका अपघातामध्ये विनायकराव मेटे यांचे निधन झाले
विनायकराव मेटे हे विधान परिषदेचे सदस्य देखील होते मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एक महत्त्वाच्या बैठकीसाठी विनायकराव मेटे तातडीने मुंबईकडे जात असताना त्यांचा अपघात झाला विनायकराव मेटे यांचा पक्ष शिवसंग्राम सेना यांची युती भाजपा सोबत होती त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती ज्योतीताई मेटे ह्या पण समाजकारणामध्ये व राजकारणामध्ये सक्रिय झाल्या बीड लोकसभा मतदारसंघांमधून महायुतीतून भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली व महाविकास आघाडीने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही बीड ही जागा शरद पवार गटाला मिळाली आहे या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी ज्योतीताई मेटे यांनी आज शरद पवार साहेब यांची भेट घेतली व त्या लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत व विश्वसनीय सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे शरद पवार साहेब हे त्यांना उमेदवारी देण्यास तयार आहेत त्यामुळे ज्योतीताई मेटे या उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील आता जर ज्योतीताई मेटे यांना महाविकास आघाडी ची उमेदवारी मिळाली तर ज्योतीताई मेटे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना पाहायला मिळू शकतो
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व स्वर्गीय विनायक मेटे यांचे संबंध फार प्रेमाचे होते त्यामुळे मुंडे विरुद्ध मेटे या लढाईकडे सर्वांचे लक्ष राहील

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button