“‘भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरेंची जहरी टीका, फडणवीसांबाबतही मोठा दावा”
परभणीतील कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल; राम मंदिर, बाबरी मशीद आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य.

उद्धव ठाकरे यांची भाजपवर जहरी टीका
उद्धव ठाकरे सध्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत आहेत.
यामध्ये आज त्यांनी मराठवाड्यातील परभणी येथे संजय उर्फ बंडू जाधव यांच्या
लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे
यांनी भारतीय जनता पक्षावर जहरी टीका केली. प्रसंगी बोलताना
ठाकरे म्हणाले की, “भारतीय जनता पार्टी आता बाबर जनता पार्टी झाली आहे.”?

उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
आज त्यांनी परभणी येथे सभा घेतली असून सायंकाळी त्यांची सभा धाराशिव येथे आहे.
बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये सध्या उद्धव ठाकरे कार्यकर्ता मेळावे घेत आहेत.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासह शिंदे गटालाही लक्ष्य केले.
https://youtube.com/shorts/YazdRxLfrAM?feature=share
बाबर जनता पार्टी
अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीत झालेल्या चोरीच्या प्रकरणावरून
उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. याप्रसंगी बोलताना ठाकरे
म्हणाले की, ज्या वेळी बाबरी मशीद पाडली गेली, त्या वेळी जबाबदारी घेण्यासाठी
भारतीय जनता पक्षाचा एकही नेता पुढे आला नव्हता. त्या वेळी स्वतः बाळासाहेब ठाकरे
यांनी, “जर ही मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे,” असे म्हटले होते.
तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते “आम्ही नाही, तर शिवसेनेच्या लोकांनी मशीद पाडली,” असे म्हणत होते. त्यामुळे आता
भारतीय जनता पक्षाला मी “बाबर जनता पार्टी” म्हणू का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा-नांदेड सायकलिस्ट ग्रुपचा प्रभाव; सायकलिंगची वाढती क्रेझ, विक्रीतही मोठी वाढ
ऑपरेशन देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पक्षामध्ये जो कोणी नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्याचा प्रयत्न करतो,
त्याला पक्षाकडून कसे संपवले जाते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी
यांचे उदाहरण दिले. कशा पद्धतीने नितीन गडकरी यांना लक्ष्य करून बाजूला करण्यात आले,
तसेच शिवराजसिंह चौहान यांच्या नावावर निवडणूक लढविण्यात आली;
मात्र निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर दुसऱ्याच व्यक्तीला बसवून त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले.
आता त्यांना कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीत विचारले जात नाही. यानंतर क्रमांक देवेंद्र फडणवीस यांचा आहे,
कारण ते भविष्यात पंतप्रधानपदाचे दावेदार ठरू शकतात, असा संशय भारतीय जनता पक्षातील काही
हेही वाचा-परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव केंद्रीय मंत्री होणार?
बड्या नेत्यांच्या मनात असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळेच
हे बंडखोर खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे यांच्या शिवसेनेत गेले, असेही ते म्हणाले.
परभणीत पुन्हा आपलाच खासदार होणार
परभणी हा उबाठा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र परभणीच्या शिवसेनेचा
इतिहास पाहिला तर, जो कोणी खासदार झाला त्याने पक्षाशी गद्दारी केली, असे सांगायलाही
ठाकरे विसरले नाहीत. आगामी निवडणुकीतही परभणीतील मतदार बाळासाहेब ठाकरे
यांच्या विचारांवर विश्वास ठेवतील आणि पुन्हा एकदा परभणी लोकसभा
मतदारसंघात उबाठा गटाचाच खासदार निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे आज धाराशिव येथेही सभा घेणार आहेत. तेथे ते नेमके ओमराजे निंबाळकर
यांच्याबद्दल काय बोलतात, हे पाहावे लागेल. मात्र, एकंदरीत उद्धव ठाकरे
यांच्या मेळाव्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे.







