Advertisement
सरकारी योजना

भाटेगाव शिवारात संत्रा घेऊन जाणारा ट्रक उलटला, एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी नांदेड हिंगोली मार्गावरील घटना

Advertisment

हिंगोली प्रतिनिधी-दत्ता बोडके
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात संत्रा घेऊन भरधाव वेगाने जाणारा
ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दि २५
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीकडून एका ट्रकमध्ये (क्र.केए-५१- सी-३६२७) संत्राचे कॅरेट भरून सदर
ट्रक नांदेडकडे जात होता. आज सकाळी ट्रक वारंगा फाटा ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात आला असतांना
भाटेगाव वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.व ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. याअपघातात ,
मुजफ्फर अहमद वय 35 वर्ष(मयत व्यक्ती)
आतार हुसेन वय वर्ष 30 गंभीर जखमी
राहणार इलाहाबाद उत्तर प्रदेश येथील आहेत अपघातातील जखमीला जगद्गुरु नरेंद्रचार्य या रुग्णवाहिकेने नांदेड
येथील उपचारासाठी घेऊन गेल्याची माहितीचे चालक अक्षय सूर्यवंशी यांनी रस्त्याने येणार जाणार वाहनधारकांनी
अपघातात पडलेल्या संत्र्यावर जागेवर बसून ताव मारला तर घटनास्थळी पोलीस येईपर्यंत अपघात स्थळावरून संत्राचे
क्या रेट ही येणार जाणार वाहनांनी जमील तसे घेऊन गेले

Advertisement

या अपघाताची माहिती मिळताच भाटेगाव येथील गावकरी व आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक
सुनील गोपीनवार, जमादार नागोराव बाभळे, गजानन सरकटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी
ट्रकमधील जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे. तर ट्रकमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button