जैविक कीड व्यवस्थापन : पर्यावरणपूरक शेतीसाठी काळाची गरज
पिकांवरील किडींचे नैसर्गिक व जैविक पद्धतीने नियंत्रण कसे करावे?

जैविक कीड व्यवस्थापन काळाची गरज
पिकांवरील किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी कीड नियंत्रणासाठी उपलब्ध सर्व पद्धतींचा एकत्रित वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. कीड व्यवस्थापनात जैविक घटकांचा वापर करणे ही जैविक कीड नियंत्रणाची संकल्पना आहे. फक्त कीटकनाशके वापरूनच कीड नियंत्रित करणे ही प्रक्रिया मातीच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यामुळेच जैविक कीड व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे .

निसर्गामध्ये प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवावर आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी अवलंबून असतो. सर्व सजीवांमध्ये सदैव अंतर्गत जैविक युद्ध सुरूच असते. त्यामुळेच निसर्गात कोणत्याही सजीवाचे संख्यात्मक तुलनात्मक स्थैर्य आढळते.
https://en.wikipedia.org/wiki/Biological_pest_control
कित्येकदा ही संख्या कमी किंवा जास्त दिसत असली तरी ती एका पातळीवर जाऊन स्थिरावते. या प्रक्रियेमुळेच कोणत्याही सजीवांची संख्या कमी-अधिक होते, पण ती नामशेष मात्र होत नाही. याला कारण निसर्गचक्र असते.

पिकांवर पडणाऱ्या किडींवर जगणारे असंख्य प्राणी, पक्षी, गोळी कीटक अवलंबून असतात. तसेच या किडींमुळे जीवाणू, विषाणू, बुरशी, सूक्ष्मजीव, जंतूंमुळे निर्माण होणारे रोग पिकाच्या संरक्षणासाठी जैविक नियंत्रणाच्या कक्षेत येतात. पिकांवर येणाऱ्या हानिकारक किडीचे नियंत्रण सजीव परोपजीवी कीटक म्हणजेच मित्र कीटक, सूक्ष्म विषाणू, जीवाणू, बुरशी इत्यादींच्या वापराने केले जाते. यालाच जैविक कीड नियंत्रण असे म्हणतात.
हेही वाचा-भविष्यात हृदयरोग टाळायचा असेल तर या तपासण्या वेळेवर करा
हेही वाचा-शेतकऱ्यांना मोठी संधी अमेरिकेची २५०+ अन्न उत्पादनांवरील करसूट
नैसर्गिक जैविक कीड नियंत्रणामध्ये महत्त्वाचे हे असते की पिकांवर पडणाऱ्या किडींचे असंख्य शत्रू असतात आणि ते त्यांना खात असतात. जर आपल्या शेतामध्ये मित्र किडींचे प्रमाण वाढले, तर शत्रू किडींचे प्रमाण आपोआप कमी होईल. यालाच नैसर्गिक जैविक कीड नियंत्रण असे म्हणतात.
भक्षक कीटक
या कीटकांच्या प्रकारामध्ये हे कीटक आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या किडींना पकडून त्यांचे भक्षण करतात. ज्यांना आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी दोनपेक्षा अधिक भक्ष्य लागतात अशा कीटकांना भक्षक कीटक असे म्हणतात. पिकांवर पडणाऱ्या किडींमध्ये प्रमुख कीटकांमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, भुंगेरे, आळ्या, रस शोषक किडी, ढेकूण इत्यादींचा समावेश होतो.
यांच्यासाठी भक्षक कीटक म्हणून लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा, मोंटू जरी, सिरफीड माशी, पेंट्या टोमिड ढेकूण, ओरिअस ढेकूण यांचा समावेश होतो. हे कीटक लहान कीटकांना खाऊन जैविक कीड नियंत्रण करतात.
परोपजीवी कीटक
नावाप्रमाणेच या किडीचे आयुष्य हे दुसऱ्या किडीच्या आयुष्यावर अवलंबून असते. शेतात पडणाऱ्या किडीला खाऊन हे परोपजीवी कीटक जगत असतात. मुख्यतः हे परोपजीवी कीटक तंबाखू पाने खाणारी अळी, उंट अळी, शेंद्री बोंड अळी, खोडकिड इत्यादी किडींवर जगतात. परोपजीवी कीटकांमध्ये प्रामुख्याने ट्रायकोग्रामा, अपनेटेलस इत्यादी कीटकांचा समावेश होतो.
जैविक कीडनाशकाचे फायदे
पर्यावरणास पोषक
मित्र कीटकांस सुरक्षित
आर्थिक दृष्ट्या परवडणारे
लपलेल्या किड्यांनाही मारून टाकतात
कायमस्वरूपी नियंत्रण
रासायनिक कीटकनाशकांप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत नाही
जैविक कीड व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे असते ते परोपजीवी व परभक्षी कीटकांचा वापर. मुख्यतः हा वापर सकाळी करावा. तसेच या कीटकांचा वापर केल्यानंतर पंधरा दिवसांपर्यंत कीटकनाशकांची फवारणी करू नये. आपल्या शेतामध्ये मित्र किडींची संख्या वाढविण्यासाठी निवडक सुरक्षित कीटकनाशकांचा वापर करावा. तसेच या मित्र कीटकांसाठी पोषक असलेल्या चवळी, कोथिंबीर, मका इत्यादी पिकांची लागवड करावी. मुख्यतः या मित्र कीटकांचा वापर नुकसानाची पातळी गाठताच लगेच करावा.
अशा पद्धतीने जैविक कीड व्यवस्थापन करून उत्पादनाचा खर्च कमी करता येतो तसेच पर्यावरणपूरक शेती करता येते. यासाठी महत्त्वाचे आहे ते आपल्या शेतांमध्ये जैविक किडींची संख्या वाढविणे. यासाठी शासन वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करत असते.
त्या ठिकाणी जाऊन जैविक कीड व्यवस्थापनाची माहिती घ्यावी व आपली शेती फायदेशीर करावी. तसेच किसान कॉल सेंटरला कॉल करूनही याविषयी अधिक माहिती मिळवता येते. तरी सर्व शेतकरी बांधवांनी जैविक कीड व्यवस्थापनाकडे वळावे.







