Advertisement
शेती

Soyabean kharedi-शासनाची खरेदीची मुदत संपली,उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे काय होणार ?

Advertisment

सोयाबीन(SOYABEAN) उत्पादक शेतकरी परत एकदा अडचणीत आले आहे कारण राज्य सरकारने जाहीर केलेली सोयाबीन खरेदीची योजना(Soybean procurement plan) या योजनेची मुदत सहा फेब्रुवारी 2025 रोजी संपली या सोयाबीन खरेदीसाठी(Soybean procurement plan) मुदतवाढ देण्याची घोषणा झाली असल्याच्या चर्चा जरी असल्या तरी प्रत्यक्षात मात्र सोयाबीन(SOYABEAN) खरेदी केंद्रावर सोयाबीन(SOYABEAN)ची खरेदी चालू नाही त्यामुळे शेतकरी कमालीचा अडचणी सापडला आहे

राज्यामध्ये जवळपास सगळीकडे सोयाबीन(SOYABEAN) हे शेतकऱ्यांचे प्रमुख पिकांपैकी एक पीक आहे सोयाबीन(SOYABEAN)चा पेरा हा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी होतो पण मागील काही वर्षापासून सोयाबीन(SOYABEAN)चे दर हे कमालीचे पडलेले आहेत हे तर इतके कमी आहेत की उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांचा निघत नाहीये आणि अशात व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हे दर 3800 ते 4000 च्या दरम्यान प्रतिक्विंटल एवढ्या कमी दारानी सध्या विक्री होत असल्याची चर्चा आहे आणि यामुळे शेतकरी मात्र चांगला चिंतेत आहे

Advertisement
soyabean
सोयाबीन

सोयाबीन(SOYABEAN) खरेदीचा निर्णय
मागील काही वर्षापासून राज्यामध्ये सोयाबीन(SOYABEAN)चे दर हे कमालीचे घसरले आहेत आणि हामी भावा पेक्षाही खाली सोयाबीन(SOYABEAN)ची विक्री होत आहे त्यामुळे शासनाने सोयाबीन(SOYABEAN) ची खरेदी करण्याचा निर्णय घेतला सोयाबीन(SOYABEAN) हे एम.एस.पी. दराने खरेदी करण्याचा घोषणा केली शेतकऱ्यांच्या जवळचा शेवटचा सोयाबीन(SOYABEAN)चा दाणा जोपर्यंत खरेदी होणार नाही तोपर्यंत ही खरेदी चालू राहील अशी घोषणा केली होती यासाठी खरेदीची मुदत ही 15 ऑक्टोबर 2024 पासून 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत राज्य सरकारकडून नाफेड व एन सी सी एफ च्या माध्यमातून सोयाबीन(SOYABEAN) खरेदी केली जाणार असल्याची घोषणा केली

Advertisement

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पाच लाख 11 हजार हजार 658 नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून 11 लाख 21 हजार 385 टन सोयाबीन(SOYABEAN) खरेदी केले गेले सदरील ही खरेदी राज्य सरकारने नाफेड व एन.सी.सी.एफ. च्या माध्यमांमधून 562 खरेदी केंद्र हे राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू करण्यात आले होते या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली नोंद करायला सुरुवात केली पण सोयाबीन(SOYABEAN) खरेदी जेव्हा प्रत्यक्षात सुरू झाली तेव्हा मात्र शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं कधी जागा उपलब्ध नसणे कधी कर्मचारी वेळेवर न येणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ही खरेदी कासव गतीने चालू होती बऱ्याच केंद्रावर बारदाना नसल्यामुळे देखील खरेदी झाली नसल्याचे सांगण्यात आले या योजनेसाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत खरेदीची मुदत होती वही मुदत संपल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन(SOYABEAN) बाकी असल्यामुळे शासनाने 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली तरी पण शेतकऱ्यांजवळील सोयाबीन(SOYABEAN) बरंच बाकी होतं

 

त्यामुळे 31 जानेवारी नंतर परत एकदा 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत अशी दोनदा मुदतवाढ देण्यात आली या दरम्यान शासनाने सोयाबीन(SOYABEAN) खरेदीचे उद्दिष्ट हे 14 लाख 13 हजार टन एवढे उद्दिष्ट खरेदीचे होते पण पण 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत 2.11 लाख टन एवढे सोयाबीन(SOYABEAN) कमी खरेदी केले म्हणजे शासनाने खरेदीचे जे उद्दिष्ट ठेवले होते ते देखील अजून पूर्ण झालेले नाही सध्या ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन(SOYABEAN)चे मोजमाप झालेच नाही त्या शेतकऱ्यांची संख्या ही दोन लाख 66 हजार एवढी आहे यामधील काही शेतकऱ्यांनी तर किरायाची गाडी,ट्रॅक्टर,टेम्पो करून थेट खरेदी केंद्रावर येऊन थांबलेले आहेत आणि अचानक बंद झालेल्या खरेदीमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे

soyabean
सोयाबीन

नाफेड संस्थेकडे पाच लाख 64 हजार 523 शेतकऱ्यांनी सोयाबीन(SOYABEAN) खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे तर एन.सी.सी.एफ. संस्थेकडे दोन लाख 13 हजार 234 शेतकऱ्यांनी नोंद केली आहे यामध्ये नाफेड मधून तीन लाख 62 हजार 242 एवढ्या शेतकऱ्यांकडून सोयाबीन(SOYABEAN) खरेदी करण्यात आली आहे सोयाबीन(SOYABEAN) खरेदीमध्ये नाफेड ने आठ लाख 34 हजार 741 टन एवढे सोयाबीन(SOYABEAN) खरेदी केले आहे तर एनसीसीएफ कडून दोन लाख 84 हजार 644 टन एवढे सोयाबीन(SOYABEAN) खरेदी करण्यात आले आहे तर एन.सी.सी.एफ. संस्थेकडून एक लाख 49 हजार 415 शेतकऱ्यांकडून सोयाबीन(SOYABEAN) खरेदी केली आहे आता या दोन्हीही संस्थेकडे नोंदणी केलेल्या उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न हा उपस्थित झाला आहे

यामध्ये नोंदणीकृत शेतकरी यांची सोयाबीन(SOYABEAN) खरेदी आणखीन बाकी आहे तसेच राज्यातील बहुतांश ठिकाणी सोयाबीन(SOYABEAN) उत्पादक शेतकऱ्यांची सोयाबीन(SOYABEAN)ची नोंदणीच बाकी आहे त्यामुळे नोंदणी झालेले व नोंदणी न झालेले या दोन्हीही शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे बाजारामध्ये जात प्रती क्विंटल 1000 रुपये कमी भाव असल्याची चर्चा आहे आणि शासनाकडे खरेदीसाठी जात खरेदी बंद आहे अशा परिस्थितीत सध्या शेतकरी अडकलेला आहे

हे हि वाचा –मराठवाड्यात मुसळदार पाऊस जनजीवन प्रभावित शेतीचे मोठे नुकसान
कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी तर सांगितले आहे की सोयाबीन(SOYABEAN) ठेवायला शासनाकडे जागाच नाही पाशा पटेल यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये पटेल यांनी स्पष्ट केले की शासनाकडे आता खरेदी केलेले सोयाबीन(SOYABEAN) ठेवायला जागाच उपलब्ध नसल्यामुळे सोयाबीन(SOYABEAN) ची कधी सुरू होईल ते सांगता येणार नाही
काही प्रसार माध्यमांमध्ये याही बातम्यांची शासनाकडून सोयाबीन(SOYABEAN) खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत पण आपण जर प्रत्यक्षात पाहायला गेलो तर खरेदी केंद्रावर आणखीनही असा कुठलाही आदेश आलेला नाही सगळ्या सोयाबीन(SOYABEAN) खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा सध्या पाहायला मिळत आहे

हे हि वाचा –पीककर्ज देताना सिबिल अडथळा आणल्यास FIR दाखल करणार देवेंद्र फडणवीस
शेतकरी आक्रमक
सोयाबीन(SOYABEAN) खरेदीला मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची विनंती शेतकऱ्यांच्या वतीने शासनाने करण्यात येत आहे अनेक शेतकरी संघटना देखील या मुदत वाढीत द्यावी यासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे काही शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन देखील केले तसेच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सोयाबीन(SOYABEAN) खरेदी चालू करावी अशी मागणी केली आहे

महाराष्ट्र,गुजरात,मध्य प्रदेश,तेलंगाना,कर्नाटक या राज्यांपेक्षा सर्वाधिक सोयाबीन(SOYABEAN)ची खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झाल्याची नोंद आहे
शासनाने जाहीर केलेला हमीभाव हा 2023 24 या आर्थिक वर्षापेक्षा 292 रुपयांनी जास्त केला आहे आता सोयाबीन(SOYABEAN)चा हमीभाव हा 4892 एवढा आहे
महाराष्ट्रामध्ये सोयाबीन(SOYABEAN) खरेदी ही नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक झाली आहे तसेच नांदेड आणि परभणी या जिल्ह्यात देखील सोयाबीन(SOYABEAN) ची खरेदी ही झाली आहे पण एकंदरीत सर्वच राज्यात ज्या ठिकाणी सोयाबीन(SOYABEAN) पीक घेतले जाते त्या ठिकाणच्या लाखो शेतकऱ्यांची सोयाबीन(SOYABEAN) आज देखील जसेच्या तसे आहे त्यामुळे या सोयाबीन(SOYABEAN)चे पुढे काय होणार हा प्रश्न मोठा आहे बाजारात जर समजा सोयाबीन(SOYABEAN) घेऊन गेले तर पडलेल्या दरामुळे ती सोयाबीन(SOYABEAN) परवडत नाही

शासनाने त्वरित सोयाबीन(SOYABEAN) ची नोंदणी चालू करावी व खरेदी केंद्र त्वरित चालू करावे व शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे यंदाच्या हंगामामध्ये सोयाबीन(SOYABEAN)चे उत्पन्न हे अपेक्षे पेक्षा कमी झाले आहे कारण सुरुवातीला झालेली अतिवृष्टी त्यानंतर आलेला येलो मोझॅक रोप यामुळे आधीच सोयाबीन(SOYABEAN)चे उत्पन्न 50% पेक्षा देखील खाली गेले आहे एकंदरीत सोयाबीन(SOYABEAN) वर होणारा खर्च पाहता आणि बाजारामध्ये विक्री होणारा भाव पाहता शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च देखील निघणे जवळपास अशक्य आहे जर हमीभावावर शासनाने सोयाबीन(SOYABEAN) खरेदी केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक झळ ही कमी बसेल आणि शासनाने देखील आधीच जाहीर केले होते की शेतकऱ्यां जवळचा शेवटचा दाणा खरेदी केल्याशिवाय ही सोयाबीन(SOYABEAN)ची खरेदी बंद केली जाणार नाही तरीपण आता अचानक सोयाबीन(SOYABEAN)ची खरेदी ही बंद झालेली आहे

शासन स्तरावर जरी मुदतवाढ दिल्याचे बातम्या येत असल्या तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र खरेदी केंद्रावर कुठलाही लेखी आदेश नसल्यामुळे खरेदी केंद्र बंद आहेत
आता सोयाबीन(SOYABEAN) उत्पादक शेतकऱ्यांना बाबतीत शासन काय निर्णय घेते ते पहावे लागेल शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा व सोयाबीन(SOYABEAN)ची खरेदी ही लवकरात लवकर चालू व्हावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button