Raj Thakre -राज ठाकरे यांचा वरळी येथील पदाधिकारी मेळावा
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MAHARASHTRA NAVNIRMAN SENA)अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आज वरळी येथे आपल्या पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांशी आज संवाद केला या संवाद मेळाव्यामध्ये त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला व आगामी काळात पक्ष संघटनेमध्ये मोठे बदल होणार असल्याच्या सूचना देखील या प्रसिद्धी राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी दिल्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(MAHARASHTRA NAVNIRMAN SENA) स्थापनेपासून राज ठाकरे (RAJ THAKRE)यांच्या भूमिका ह्या सतत बदलत असल्याचे आरोप राज ठाकरे (RAJ THAKRE)यांच्यावर होत होते प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन भूमिका घेऊन राज ठाकरे (RAJ THAKRE)मतदारांसमोर जातात असाही आरोप अनेक प्रसार माध्यमांनी आणि अनेक पक्षाच्या लोकांनी राज ठाकरे (RAJ THAKRE)यांच्यावर केले होते याच गोष्टीचा राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी आज चांगला समाचार घेतला व कोणत्या कोणत्या पक्षाने कशाकशा भूमिका बदलल्या याविषयी त्यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले
1)यामध्ये राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी शरद पवार यांच्याही बदललेल्या भूमिकेचा उल्लेख केला यामध्ये राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी सांगितलं की वसंत दादा पाटील यांच्याशी बंड करून कशा पद्धतीने शरद पवार यांनी पुलोद चे सरकार स्थापन करून कसे मुख्यमंत्री झाले याही घटनेचा दाखला राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी दिला राज ठाकरे (RAJ THAKRE)म्हणाले की आता शरद पवार यांना जाऊन कोणीही विचारणार नाही की तुम्ही भूमिका कशी काय बदलली मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांनी लगेच काँग्रेस पक्षामध्ये संभाजीनगर येथील तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला यावर सुद्धा वारंवार भूमिका बदलल्या असा आरोप कोणी केल्याचं मी ऐकलं नाही असाही आरोप राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी केला त्यानंतर त्यांनी 1999 मध्ये शरद पवार यांनी केलेला ऐतिहासिक बंड आणि काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावर काँग्रेस मधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली व यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा चित्र असे स्पष्ट झाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असे सत्ता स्थापन करता येत नाही त्या वेळेला शरद पवार यांनी भूमिका बदलून लगेच काँग्रेस सोबत युती केली अवघ्या सहा महिन्याच्या आत त्यांची ही बदललेली भूमिका देखील कोणाच्याही लक्षात नाही असाही आरोप राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी केला. यानंतर शरद पवार यांनी थेट त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेची देखील सत्तेसाठी हात मिळवणे की तेव्हा सुद्धा एकही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीने शरद पवार यांनी भूमिका बदलली असल्याचे सांगितले नाही
हे हि वाचा-GSB DISEASE UPDATE पुणेकरांनो सावधान,GSB आजराचा धोका वाढला
2)भारतीय जनता पार्टी यांच्याही बदललेल्या राजकीय भूमिकांचा देखील समाचार राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी चांगलाच घेतला याप्रसंगी बोलताना राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जनसंघाचा उदय कसा झाला आणि त्यानंतर जनता पार्टी या नावाखाली एकत्र लोकसभेच्या निवडणुका लढलेल्या व नंतर कशा पद्धतीने जनता पार्टीच्या आधी भारतीय लावून भारतीय जनता पार्टीचा उगम कसा झाला पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी हे झाले यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी संपूर्ण भूमिका बदलून गांधीवादी समाजवाद आम्ही पाळु अशी भूमिका घेतली या दरम्यान अनेक निवडणुका झाल्या पण निर्णय ठरली ती 1986 ची निवडणूक मुंबईमधील एका मतदारसंघांमध्ये हिंदुत्व या एका विचारसरणीवर ही निवडणूक लढवली गेली आणि त्यामध्ये यश देखील आले तेव्हापासून भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रमुख केला

तसेच आपण मागील काही महिन्याच्या घडामोडी पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की 70 हजार कोटीच्या घोटाळ्या चा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला व ज्यांनी घोटाळा केला त्यांना आम्ही मध्ये टाकू असे वक्तव्य केले पण मध्ये टाकू म्हणत थेट त्यांनाच सत्तेत घेतलं असा खोचक तोला देखील राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी लगावला तसेच भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पुढे सत्तेत सामावून घेतले त्यांचीही त्यांनी उदाहरण दिले यामध्ये मुकुल रॉय,अशोकराव चव्हाण,कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडुरप्पा,अजित दादा पवार यांच्या नावांचा उल्लेख केला तसेच राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी प्रत्येक वेळी भूमिका नाही बदलली ना असा टोला देखील लगावला
हे हि वाचा-MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
ईडीची आलेल्या नोटिसी बाबतीत राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी खुलासा केला(Raj Thakre disclosed about the notices received by ED)
काही वर्षांपूर्वी राज ठाकरे (RAJ THAKRE)यांना ईडीची नोटीस आली होती आणि ही नोटीस का आली होती नेमकं त्याच्यामागे काय पार्श्वभूमी याचा खुलासा देखील राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी आज केला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोहिनूर मिल ही विक्रीस निघाली आम्ही टेंडर भरलं आणि ते टेंडर आम्हाला मिळाले देखील पण त्यानंतर काही लोक कोर्टात गेल्यामुळे मी त्या मिल मधून भागीदारी कमी केली व इन्कम टॅक्स देखील भरला पण ज्यांच्याजवळ इन्कम टॅक्स भरला त्यांनी तो पुढे भरला नाही जेव्हा मला ईडीची नोटीस आली तेव्हा जाऊन मी तो इन्कम टॅक्स पूर्ण भरला त्यामुळे मी कुठल्याही ईडीच्या दबावाखाली भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला नव्हता भारतीय जनता पार्टीच्या काही भूमिका या मला पटलेल्या होत्या म्हणून मी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता याच प्रसंगी बोलताना राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला की मी कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व स्वतःच्या फायद्यासाठी मी कधीही कोणासोबत जाणार नाही तुमचा घात करणार नाही अशा पद्धतीचा शब्द देखील राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी याप्रसंगी बोलताना दिला

विधानसभेच्या निकालावर राज ठाकरे (RAJ THAKRE)यांचे मोठे वक्तव्य (Raj Thakre’s big statement on the result of the Vidhan Sabha)
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचंड अपयश आलं पण या अपयशाच्या मागची कारण सांगणारा राज ठाकरे यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणूक जिंकून देखील महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा जल्लोष साजरा केला गेला नाही याची कारण काय आहे राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MAHARASHTRA NAVNIRMAN SENA)माजी आमदार राजू पाटील यांच्या गावाचा देखील उल्लेख केला राजू पाटील यांच्या गावांमध्ये चौदाशे मतदान होतं दरवेळेला राजू पाटलांना 700 ते 800 मतदान व्हायचं पण या निवडणुकीमध्ये राजू पाटलाला त्यांच्याच गावामधून एकही मतदान झालेल्या नाही तसेच मराठवाड्यातील एका नगरसेवकाचे देखील उदाहरण दिले की नगरपालिकेमध्ये त्याला पडलेले मतदान आणि त्याला विधानसभेला मिळालेले मतदान हे कुठेच जुळत नाहीये तसेच लोकसभेचाही दाखला देत राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी काँग्रेसला लोकसभेला 13 सीट मिळाल्या तर विधानसभेला फक्त 20 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना लोकसभेला आठ जागा व विजय मिळाला तर विधानसभेला मात्र थेट ते दहा जागांवरच विजयी झाले आहेत एवढी मोठी तफावत आली कशी असं मागच्या सहा महिन्यात काय घडलं ज्यामुळे असे निकाल आले असं बोलत त्यांनी संपूर्ण मतदान व मतमोजणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षांतर्गत मोठे बदल होणार(There will be major changes under the Maharashtra Navnirman Sena party)
विधानसभेला आलेल्या अपयशाने खचून जाऊ नका कारण मी बरेच अपयश पाहिलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका आपण केलेली कामे आपण केलेली आंदोलने ही जनतेपुढे नेऊन तुम्ही ठेवा आणि पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना(MAHARASHTRA NAVNIRMAN SENA) संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार असून त्या संदर्भामध्ये पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण येईल राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी आपल्या जमलेल्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवत मी कधीही तुमचं नुकसान असा निर्णय घेणार नाही व महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय मी पुढे घेईल असा शब्द देखील राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला
तसेच आगामी होणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा असे आदेश देखील राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी कार्यकर्त्यांना दिले
आज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यामध्ये (MAHARASHTRA NAVNIRMAN SENA) राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला व कशा पद्धतीने परत एकदा आपल्याला उंच भरारी मारता येईल असे स्वप्न देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दाखवले यामुळे निश्चित कार्यकर्त्यांचा मनोबल वाढेल पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप मोठे बदल स्वतःमध्ये करावे लागतील हेही तेवढेच खरं
खरंच राज ठाकरे (RAJ THAKRE)ही आपल्या पक्षांमध्ये काही बदल घडवून स्थानीय स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेत येतात का ती आता पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होईल



