Advertisement
लाइफ स्टाइल

Benefits of Soaking:या गोष्टी भिजवून खा व निरोगी राहा

Advertisment

सध्या अनेक जण अनेक व्याधींमुळे त्रस्त आहेत आणि या मागचे मुख्य कारण जर आपण बघायला गेलो तर ते आहे केमिकल युक्त अन्नपदार्थ आणि दुसरे म्हणजे अन्नपदार्थांमधील कमी झालेली पोषक घटकांची कमतरता या दोन कारणांमुळे आपल्याला अनेक आजार होत आहे पण जर आपण काही मोड आलेले धान्य खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहे तसेच काही पदार्थही भिजवून खाल्ले( Benefits of Soaking) तर आपल्याला अनेक फायदे होतात

उत्तम आरोग्यासाठी कोणते पदार्थ भिजविल्याशिवाय खाऊनये

Advertisement

आपण जेव्हा स्वयंपाक करतो अन्नधान्य शिजवतो तेव्हा त्यामधील पोषक घटक हे कमी होतात त्यामुळेच आपण आहारामध्ये सॅलड चा वापर केला पाहिजे जेणेकरून अगदी नैसर्गिक रित्या ते खाद्यपदार्थ हे आपल्या पोटात गेले पाहिजे तसेच आयुर्वेदामध्ये जलचिकित्सा ही एक पद्धत खूप गाजलेली आहे आणि त्याचे प्रचंड फायदे देखील आहेत यामध्ये महत्त्वाचे जर आपण खाद्यपदार्थ भिजवून ठेवून त्याचे पाणी पिले तर प्रचंड फायदे होतात कारण भिजविल्यामुळे( Benefits of Soaking) त्यातील पोषक घटक हे त्या पाण्यात मिसळतात त्याचप्रमाणे जर आपण मोड आलेले धान्य जर खाल्ले तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला पोषक घटक हे मोठ्या प्रमाणात मिळतात म्हणून डॉक्टर देखील मोड आलेले कडधान्य खाण्याचा सल्ला आपल्याला देतात तसेच काही पदार्थ हे जर आपण भिजून खाल्ले( Benefits of Soaking)तर त्याचेही मोठे फायदे हे आपल्याला मिळतात कोणते कोणते पदार्थ भिजवून खाल्ल्यामुळे( Benefits of Soaking)काय काय फायदे होतात हे आपण पाहूया

Advertisement
 Benefits of Soaking
भिजविलेले बदाम

बदाम
बदाम खाल्ल्यामुळे आपल्याला त्वचे संबंधितल्या तक्रारी अपचनाच्या समस्या तसेच अकाली त्वचेवर सुरकुत्या पडण्याच्या अशा असंख्य आजारांपासून मुक्ती मिळू शकते पण जर आपण बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवून( Benefits of Soaking)सकाळी खाल्ल्यास आपल्याला बदामा मध्ये असलेले मॅग्नेशियम आपल्याला मिळते याचा फायदा ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे त्यांना अधिक प्रमाणात होतो तसेच ज्यांना बॅड कॅलोस्ट्रॉल ची समस्या आहे काही दिवस रोज रात्री बदाम भिजत ठेवून सकाळी अनशापोटी खाल्ल्यास त्यांचे बॅड कॅलोस्ट्रॉल कमी व्हायला लागते तसेच बदाम मध्ये प्रोटीन फायबर विटामिन ई कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न पोटॅशियम झिंक विटामिन बी यांसारखी महत्त्वाचे घटक मिळतात

 

Benefits of Soaking

जवस
जवस रात्री भिजून सकाळी खाल्ले तर अनेक फायदे आपल्याला माहिती असतील जवसामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटिक ऍसिड यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेले बॅड कोलेस्ट्रॉल तसेच एल डी एल कमी होण्यासाठी मदत मिळते जवस ही शाकाहारी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळण्याच्या एकदम चांगला पर्याय आहे रात्री एक चमचा जवस पाण्यात भिजवून ठेवले( Benefits of Soaking) व सकाळी ते चावून खाल्ले व वरून ते पाणी पिल्यास अनेक फायदे होतात हृदया संबंधित आजारांमध्ये तसेच जवसामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचन संस्था देखील चांगली होती जवसामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम असल्यामुळे आपले हाडे देखील मजबूत होतात जवसामध्ये असलेले मोठे अँटीऑक्सिडेंट मुळे आपली त्वचा तजेलदार होते तसेच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मुळे त्वचा चमकदार होते व केसांच्या समस्येपासून सुद्धा मुक्ती मिळते

 

हे हि वाचा-Anemia:एनीमिया प्रकार, लक्षण, कारण आणि इलाज

 

मेथी दाना
मेथी दना हे चवीला कडसर असते रात्री काही मेथीचे दाणे जर पाण्यात भिजवून( Benefits of Soaking)सकाळी ते चावून खाऊन वरून पाणी पिल्यास मेथी दाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर ज्यामुळे आपल्या पोटातील आतडी साफ व्हायला मदत होते तसेच ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना मेथीदाणे हे संजीवनीच आहे तसेच मेथीदाण्यामुळे बॅड कॅलेस्ट्रॉलमध्ये देखील फायदा झाल्याचे अनेक अध्ययन्यांमधून समोर आले आहे मेथीदाण्यांमुळे वजनही कमी होते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते केसांसाठी देखील मेथी दाणा लाभदायक आहे त्वचेच्या विकारांमध्ये सुद्धा मेथी दाणा फायदेशीर आहे मेथीदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट मिनरल्स विटामिन्स प्रोटीन फायबर अँटी इम्पलेमेंटरी गुण असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत

 

हे हि वाचा-हाडांमधील कमजोरी दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय

 

मुग
जर आपण रात्री मूग भिजत ठेवले( Benefits of Soaking)व ते खाल्ले तर यामधून आपल्याला विटामिन बी प्रोटीन आयर्न मॅग्नेशियम हे पोषक घटक मिळतातच त्याबरोबरच मुगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर मॅग्नेशियम ही घटक असतात यामध्ये फायबर आणि प्रोटीनमुळे आपले पचनसंस्थेमध्ये सुधारणा होते तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांमुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना देखील याचा चांगला फायदा होतो रात्री भिजवून ठेवलेले( Benefits of Soaking)मूग खा किंवा मोड आलेले मुखा दोन्हीहीचे फायदे अत्यंत चांगले आहेत त्यामुळे आपण आहारामध्ये मुगाचे सेवन केले पाहिजे

 

 


मनुका
आपण जर द्राक्षाला वाळविले तर त्यापासून मनुका तयार होतात मनुका देखील खायला अत्यंत चवदार असतात मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलशियम पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी तसेच ज्यांच्या शरीरामध्ये रक्तची कमतरता आहेत त्यांनी देखील रात्री काही मनुके पाण्यात भिजत ठेवून( Benefits of Soaking)सकाळी ते पाणी पिऊन मनुके चावून खाल्ले पाहिजे मनुक्यामध्ये असलेले फायबरचे प्रमाण यामुळे पचन संस्था सुधारते तसेच आपण नियमित काही दिवस मनुके खाल्ल्यास कॅन्सर सारख्या आजारामध्ये देखील फायदा मिळतो

 

 

 Benefits of Soaking
भिजविलेली खसखस

खसखस
मसाला पदार्थ म्हणून आपण खसखस मसाल्यांमध्ये वापरतो खसखशीचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत खसखस मध्ये थियामीन फोलेट पेंटोथिनिक ऍसिड त्यासोबतच कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम मॅग्नीज फॉस्फरस आणि झिंक ही अन्य घटक देखील फक्त सी मध्ये मोठ्या प्रमाणात असतात एक चमचा खसखस रात्री पाण्यात भिजवून ठेवावी( Benefits of Soaking)व सकाळी खसखस चावून खावी व वरून पाणी प्यावे त्यामुळे खसखस मध्ये असलेले सर्व गुणधर्म हे आपल्याला मिळतात व त्याचा आपल्याला मोठा फायदा व्हायला लागतो
नैसर्गिक रित्या पिकविलेल्या वस्तू व त्यांचा वापरही देखील निसर्गाने दिला त्याच अवस्थेमध्ये जर केला तर त्याचा फायदा हा आपल्याला निश्चित चांगला होतो त्यामुळेच आपल्या कडधान्य हे मोड आल्यानंतर खावेत तसेच काही पदार्थ

भिजून(Benefits of Soaking)खाल्ल्यास आपल्याला आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळतात वर दिलेले काही पदार्थ याचा आपण विचार केल्यास हे अगदी सहजरीत्या आपल्या घरामध्ये सापडतात आणि ते भिजवून खाल्ल्यास आपल्याला चमत्कारिक फायदे देखील होऊ शकतात कारण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे( Benefits of Soaking)त्या पदार्थांमधील पोषक तत्वे ही त्या पाण्यामध्ये उतरतात व सकाळी जाऊन खाल्ल्यानंतर वरून पाणी पिल्यास सर्व घटक हे आपल्याला मिळतात त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात आरोग्याला फायदा होतो वर दिलेले काही पदार्थ हे आपण भिजून सहजरीत्या खाऊ शकतो निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिलेले आहे त्याचा आपण फायदा निश्चित घेतला पाहिजे

 

 

नोट वर दिलेली माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून जमा केलेली आहे आम्ही या लेखांमध्ये कुठलाही वैद्यकीय उपचारा बाबतीत चर्चा केली नाही वरीलपैकी कोणताही प्रयोग करताना आपण एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरर घयावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button