Advertisement
देश

रेल्वेत कचरा टाकणे महागात पडणार! आता थेट 1,000 रुपयांपर्यंत दंड

रेल्वे आणि रेल्वे स्थानकातील स्वच्छतेसाठी नियमांमध्ये मोठा बदल; कचरा टाकण्यासह पोस्टर लावणे, थुंकणे आणि इतर कृत्यांवरही कारवाई

Advertisment

रेल्वेत कचरा टाकल्यास दंड

रेल्वे प्रशासन रेल्वेमधील तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मवरील साफसफाईसाठी विशेष लक्ष देत आहे

Advertisement

आणि अशातच रेल्वेच्या काही नियमांमध्ये बदल केला आहे, ज्यामुळे आपण

Advertisement

जर रेल्वेमध्ये कचरा फेकल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो व

गरज भासल्यास न्यायालयात देखील सादर केले जाऊ शकते.

नेमके कोणत्या नियमात बदल केला आहे व त्याचा काय परिणाम हा

प्रवाशांवर होईल, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रेल्वेत कचरा टाकल्यास दंड
रेल्वेत कचरा टाकल्यास दंड

रेल्वेत कचरा टाकल्यास एक हजार रुपये दंड

नवी दिल्ली: रेल्वे आणि रेल्वे स्टेशनचा परिसर यामध्ये आता कचरा टाकल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

यापूर्वी हा दंड पाचशे रुपये होता. या दंडामध्ये वाढ करून आता दंड एक हजार रुपये करण्यात आला आहे.

हेही वाचा-एका महिन्यात १३ वेळा पेनकिलर घेतल्याने दोन्ही किडन्या खराब?

रेल्वे मंत्रालयाने नुकतेच एका राजपत्र अधिसूचनेद्वारे ‘भारतीय रेल्वे (रेल्वे परिसरातील स्वच्छतेस

बाधा आणणाऱ्या कृतींसाठी दंड) नियम, २०१२’ मध्ये सुधारणा केली आहे. हे नवीन नियम राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून अंमलात आले आहेत.

 

दंड न भरल्यास न्यायालयात सादर केले जाईल

 

सुधारित नियमानुसार पाचशे रुपयांच्या ऐवजी आता रेल्वेत कचरा टाकल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड होणार आहे.

जर हा दंड जागेवरच भरला नाही किंवा दंड भरण्यास नकार दिला,

https://www.indianrail.gov.in/enquiry/StaticPages/StaticEnquiry.jsp?StaticPage=index.html

तर संबंधित व्यक्तीला न्यायालयात देखील सादर केले जाऊ शकते

आणि न्यायालयामध्ये हाच दंड दोन हजार रुपयांपर्यंत सुद्धा लागू होऊ शकतो.

 

काय केल्यास दंड लागणार

 

रेल्वेच्या स्वच्छता नियमांनुसार स्थानकांवर, रेल्वेगाड्यांमध्ये किंवा

हेही वाचा-सप्टेंबरमध्ये बँका किती दिवस बंद? पाहा संपूर्ण सुट्टीची यादी

रेल्वेच्या परिसरात अनेक गोष्टींना मनाई आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

 

निर्धारित जागेव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी कचरा फेकणे किंवा सोडून देणे.

 

रेल्वेच्या आवारात स्वयंपाक.

 

अंघोळ करणे किंवा कपडे धुणे.

 

रेल्वेच्या आवारात थुंकणे.

 

उघड्यावर लघवी किंवा शौच करणे.

 

रेल्वेच्या आवारात प्राण्यांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालणे.

 

रेल्वेच्या आवारात वाहने धुणे.

 

भांडी किंवा कपडे धुणे.

 

ज्या ठिकाणी यासाठी विशेष सुविधा उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी वस्तू ठेवणे.

 

रेल्वेमध्ये पोस्टर लावल्यास देखील कारवाई होणार

 

या नवीन नियमानुसार फक्त कचरा टाकल्यास दंड नाही, तर रेल्वेच्या पूर्वपरवानगीशिवाय रेल्वे डब्यात किंवा रेल्वेच्या इतर

मालमत्तेवर कुठल्याही प्रकारचे चित्र किंवा पोस्टर लावण्यास मनाई केली आहे.

रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या किंवा पोस्टर लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते.

 

दंड कोण वसूल करणार

रेल्वेच्या नियमानुसार कोणत्या विशिष्ट अधिकाऱ्यांना या तरतुदीअंतर्गत

दंड आकारण्याचा व वसूल करण्याचा अधिकार आहे, हे जाणून घेऊया.

यामध्ये स्टेशन व्यवस्थापक, स्टेशन मास्तर, वाणिज्य विभागातील

तिकीट कलेक्टर आणि परिचालन विभागातील सक्षम अधिकारी, तिकीट कलेक्टर यांचा समावेश आहे. जर हा नियम

मोडला, तर यापैकी कोणताही अधिकृत अधिकारी हा दंड आकारू शकतो व दंड वसूल करू शकतो.

 

तसेच रेल्वेमध्ये विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही हे नियम लागू आहेत.

रेल्वे परिसरात व्यवसाय करणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांना आणि फेरीवाल्यांनाही स्वच्छताविषयक नियम लागू होतात. त्यांनी

कचरा गोळा करण्यासाठी कचराकुंड्या किंवा योग्य कचरापेट्या ठेवल्या पाहिजेत.

गोळा केलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button