Advertisement
Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज यांना दत्तात्रय येमेकर गुरुजी यांनी अर्पण केलेले शब्द बिंब

Advertisment

शब्दबिंब
श्री
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षी,
छत्रपतींची ३९४ वी जयंती आहे
स्वराजाचा बहाद्दर बहिर्जी नाईक,
गुप्तचर विभागाचा आत्माच आहे!
सखा तानाजी मालूसरे नरवीरांनी,
मुलाचे लग्न बाजुस सारुन तोरणा,
गडाची मोहिमच फत्ते केली आहे!
अभियंता हिरोजी इंदुलकर हुशार,
श्रीमान योगींचा स्वामीभक्त आहे!
बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड,
लढतांना एकटा भारी पडला आहे
आग्रा येथुन सुटका करुन घेतांना,
मदारी मेहत्तर सह्यास धावला आहे!
संताजी अन् धनाजी धुरंधर मावळे,
मुघली घोड्यांना स्वप्नी दिसले आहे!
बादशहाच्या मंदमस्त हत्तीस लिलया,
यसाजी कंक शिवबहाद्दर मावळ्याने
लोळवून अतुल्य पराक्रम केला आहे!
शिवा काशिद दिसे राजाथिराजासम,
इतिहासात स्वामीनिष्ठा दिसते आहे।
जिवाजी महाले यांच्या कर्तबगारीवर,
होता जिवा म्हणून वाचला शिवा म्हण
समाजाच्या ह्ृदयावर कोरलेली आहे!
मुरारबाजी देशपांडे पुरंदरच्या तहात,
सहभागी लढाईत वीर गर्मावला आहे!
बहाइपूरी कवी छत्रप्तीना मानाचा,
मुजरा करताना स्वराज्य मावळ्यांना.
शब्दर्बिंबातून नतमस्तक होते आहे!
गोपकसुत – दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांती भुवन बहाद्दरपूर,ता. कंधार

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button