Advertisement
राजकीय बातम्या

Supriya Sule-सुप्रिया सुळे यांना केंद्राची मोठी जबाबदारी

भारत-सिंगापूर व्यापार करारासाठी संसदीय समितीवर निवड; राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू

Advertisment

महाराष्ट्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादीत सध्या बातम्या येत आहेत आणि यामुळे शरद पवार हे एनडीएसोबत जाणार काय, याविषयी देखील सध्या चर्चा चालू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्यावर

 

Advertisement

एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना एका महत्त्वाच्या समितीवर घेण्यात आले आहे. नेमकी ती समिती कोणती आणि या समितीवर निवड केल्यामुळे याचे परिणाम पुढे काय होतील, याविषयी चर्चा करूया.

Advertisement
Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी

 

सुप्रिया सुळे यांची समितीवर निवड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची एका महत्त्वाच्या समितीवर निवड करण्यात आली आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Supriya_Sule

 

परदेशातील व्यापार कराराबाबत संसदीय मैत्री समितीमध्ये लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आणखी एकदा नरेंद्र मोदी सरकारने विश्वास दाखवला आहे आणि त्यांची या समितीवर निवड करण्यात आली आहे.

 

 

हेही वाचा-कुत्र्याच्या चाटण्यामुळे महिलेला गमवावे लागले हात-पाय

हेही वाचा-तिरुपती बालाजी दर्शनासाठी नवीन पर्याय: ₹300 मध्ये मिळणार झटपट दर्शन, जाणून घ्या पूर्ण माहिती

 

भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये एक महत्त्वाचा व्यापारी करार पुढील काही महिन्यांमध्ये होणार आहे. या कराराबाबत चर्चा करण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले आहे.

 

ही समिती भारत आणि सिंगापूर यांच्या व्यापारी कराराबाबत चर्चा करेल. या समितीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश करण्यात आला आहे.

 

याआधी देखील सुप्रिया सुळे अनेक समित्यांमध्ये सहभागी होत्या

आताही निवड झाली आहे, पण याआधी देखील खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केंद्र सरकारने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची बाजू जगासमोर मांडण्यासाठी तयार केलेल्या

 

 

शिष्टमंडळात देखील सुप्रिया सुळे यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता. या शिष्टमंडळाला जगभरात पाठविण्यात आले होते. संसदेमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ‘संसद रत्न’ सुप्रिया सुळे यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

तसेच सुप्रिया सुळे यांनी आंतरराष्ट्रीय समित्यांवर काम केले आहे. त्यांनी संसदेतील माहिती आणि तंत्रज्ञान तसेच गृह व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार यांच्या स्थायी समित्यांवर काम केले आहे.

 

वेगवेगळ्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि धोरणात्मक चर्चेसाठी स्थापन केलेल्या संसदीय मैत्री गटामध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भाजपा यांची जवळीक वाढली आहे?

खासदार सुप्रिया सुळे यांची या समितीवर निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची जवळीक वाढल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

 

पण जर आपण याचा विचार केला, तर याआधी देखील अशा समित्यांवर सुप्रिया सुळे यांची निवड झालेली आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम होईल असे चित्र दिसत नाही.

 

कारण नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये संबंध चांगले आहेत आणि सुप्रिया सुळे यांची संसदेमध्ये काम करण्याची पद्धत अत्यंत चांगली आहे. त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आता एवढे पाहावे लागेल की या दोन पक्षांतील जवळीक भविष्यात आणखी वाढेल का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button