Advertisement
लाइफ स्टाइल

शरीर देत आहे छुपे संकेत! या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

केस पांढरे होणे, थकवा, बद्धकोष्ठता ते डोळ्यांचा कोरडेपणा — जाणून घ्या कोणत्या कमतरतेची आहेत ही चिन्हे

Advertisment

VitaminDeficiency

शरीराचे छुपे संकेत इशारा देतात!

अकाली केस पांढरे होणे ही समस्या सध्या आपल्याला पाहायला मिळते पोषक तत्त्वांची कमतरता ही या मागची कारणे असतात पण तुम्हाला माहिती आहे .

Advertisement

 

Advertisement

काय केस अचानक पांढरे होणे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्याचे लक्षण आहे विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात कमतरतेची लक्षणे

सतत थकवा,चक्कर येणे,हात-पाय झिणझिण्या,स्मरणशक्ती कमी होणे विटामिन B12 वाढवण्यासाठी काय खावे?

दुग्धजन्य पदार्थ,दूध,दही,पनीर

हे शाकाहारी लोकांसाठी B12 चे चांगले स्रोत आहेत

अंडी

विशेषतः अंड्याचा पिवळा बलक (Egg yolk)

रोज 1–2 अंडी खाल्ल्यास फायदा होतो

मांसाहारी पदार्थ,चिकन,मासे (विशेषतः सुरमई, रावस),अंडी B12 साठी सर्वात समृद्ध स्रोत आहेत

 

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC9710417/

नेहमी घसा खवखवणे 

बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या घशामध्ये काहीतरी इन्फेक्शन झाले असेल किंवा आणि घसा नेहमी खवखवतो याच्या मागचे कारण थायरॉईड

 

असंतुलन हे सुद्धा असू शकते थायरॉईड ग्रंथी शरीरातील हार्मोन्स नियंत्रित करते. तिचे असंतुलन दोन प्रकारे दिसते — हायपोथायरॉईडीझम (हार्मोन कमी) आणि हायपरथायरॉईडीझम (हार्मोन जास्त).

 

हायपोथायरॉईडीझम (थायरॉईड कमी)

सतत थकवा आणि आळस,वजन वाढणे,केस गळणे,थंडी जास्त वाटणे,बद्धकोष्ठता,त्वचा कोरडी होणे

 

हायपरथायरॉईडीझम (थायरॉईड जास्त)

हृदयाचे ठोके वेगाने वाढणे,वजन अचानक कमी होणे,घाम जास्त येणे,चिडचिड, चिंता,झोप न लागणे,हात थरथरणे

थायरॉईड असंतुलनाचे उपाय

हेही वाचा-उष्माघाताचा वाढता धोका! जाणून घ्या लक्षणे, परिणाम आणि बचावाचे सोपे उपाय

हेही वाचाJamun Benefits in Marathi | जांभळाचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

 

 

आहारात काय घ्यावे?

आयोडीनयुक्त मीठ (मर्यादेत)

दूध, दही, पनीर,अंडी,फळे व हिरव्या भाज्या,ड्रायफ्रूट्स (बदाम, अक्रोड)

 

काय टाळावे?

जास्त जंक फूड,खूप साखर,प्रोसेस्ड फूड,(हायपो असल्यास) सोयाबीन व कोबी जास्त प्रमाणात टाळा

जीवनशैली सुधारणा

रोज 30 मिनिटे व्यायाम,योग (प्राणायाम, भुजंगासन, सर्वांगासन),ताण कमी ठेवा,पुरेशी झोप घ्या

 

 

यकृताच्या समस्या

बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून  एक विचित्रवास यायला लागतो बहुदा आपण हे तोंडाची समस्या आहे असे

 

आपण विचार करतो की ब्रश बरोबर केला नसेल किंवा अन्य कुठल्या कारणांमुळे असा वास येत असेल पण ही कदाचित यकृताच्या समस्या देखील असू शकते अन्य काही कारणे

 

यकृताच्या समस्या का होतात?

जास्त मद्यपान (Alcohol)

तेलकट,जंक फूड जास्त खाणे,व्हायरल इन्फेक्शन (उदा. Hepatitis B, Hepatitis C),लठ्ठपणा (Fatty Liver),औषधांचा जास्त वापर,मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉल

यकृताच्या समस्यांची लक्षणे

सतत थकवा,भूक कमी होणे,उलटी, मळमळ,पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे,त्वचा आणि डोळे पिवळे होणे (पांडुरोग),लघवी गडद रंगाची होणे,पोट फुगणे

 

काय खावे? (लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी), हिरव्या भाज्या,पालक, मेथी, दोडका

फळे

सफरचंद, पपई, केळी,आवळा (Vitamin C साठी उत्तम)

पेये

कोमट पाणी,लिंबूपाणी,ग्रीन टी

धान्य

ज्वारी, बाजरी, ओट्स, इतर

ड्रायफ्रूट्स (बदाम, अक्रोड)

हलके आणि पचायला सोपे अन्न

काय खाऊ नये?

मद्यपान पूर्णपणे टाळा,जास्त तेलकट व तळलेले पदार्थ,जंक फूड (पिझ्झा, बर्गर),जास्त साखर आणि मिठाई,कोल्ड ड्रिंक्स,जास्त मीठ

 

 

 

पायाच्या नखांना भेगा

पायांना भेगा पडणे तसेच पाया जळजळ होणे किंवा नखांमध्ये भेगा पडणे हे कॅल्शियमची कमतरता असल्याची लक्षणे आहेत

कॅल्शियमची कमतरता कशामुळे होते?

आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ कमी असणे

व्हिटॅमिन D ची कमतरता (सूर्यप्रकाश कमी मिळणे)

जास्त चहा/कॉफी व सॉफ्ट ड्रिंक्स सेवन

हार्मोनल बदल (विशेषतः महिलांमध्ये)

वाढते वय

काही औषधांचा दीर्घकाळ वापर

 

लक्षणे

हाडे कमकुवत होणे,सांधेदुखी,स्नायूंमध्ये गोळे येणे,

थकवा

उपाय

दूध, दही, पनीर रोज खा

तीळ, बदाम, हिरव्या भाज्या आहारात घ्या

रोज 15–20 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या

जंक फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळा

डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लिमेंट घ्या

टिप: संतुलित आहार + सूर्यप्रकाश = कॅल्शियमची कमतरता टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग

 

 

 

वारंवार बद्धकोष्ठता

अपचनाचा त्रास तसेच त्यामुळे अनेक रोग उद्भवू शकतात याची प्रमुख कारण असते ते फायबरची कमतरता यामुळे ही समस्या होते

 

फायबरची कमतरता का होते?

आहारात फळे व भाज्या कमी असणे

जास्त प्रमाणात जंक फूड व प्रोसेस्ड फूड खाणे

पांढरा तांदूळ, मैद्याचे पदार्थ जास्त खाणे

पाणी कमी पिणे

व्यायामाचा अभाव

 

लक्षणे (थोडक्यात)

बद्धकोष्ठता (कब्ज),पोट फुगणे,वजन वाढणे,पचन खराब होणे

 

उपाय

काय खावे?

फळे: सफरचंद, केळी, पपई

भाज्या: पालक, गाजर, बीट

संपूर्ण धान्य: ज्वारी, बाजरी, ओट्स

कडधान्ये: हरभरा, मूग, मसूर

सुकामेवा: बदाम, अक्रोड

 

 

थोडं चालताना धापा टाकणे

थोडे जरी चालले तरी आपल्याला धाप लागत असेल तर हे लोहाची कमतरता असल्याची शक्यता आहे

 

त्वचेवर निळे डाग

अचानक शरीरावर निळसर डाग पडणे हे व्हिटॅमिन सीची कमतरता असल्याचे लक्षण आहे

व्हिटॅमिन C ची कमतरता दूर करण्यासाठी काय खावे?

व्हिटॅमिन C शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्वचा निरोगी ठेवते आणि जखमा लवकर भरून येण्यास मदत करते.

व्हिटॅमिन C भरपूर असलेले पदार्थ

 

फळे

संत्रे, मोसंबी,लिंबू,आवळा (सर्वात जास्त व्हिटॅमिन C),पेरू,स्ट्रॉबेरी

 

भाज्या

ढोबळी मिरची (Capsicum)

टोमॅटो,कोबी,ब्रोकली

 

पेये

लिंबूपाणी,आवळ्याचा ज्यूस,ताज्या फळांचा रस

टिप्स

शक्यतो फळे कच्ची (raw) खा, कारण शिजवल्यावर व्हिटॅमिन C कमी होते

रोज किमान 1–2 फळे आहारात ठेवा

जास्त वेळ कापून ठेवू नका

 

हाताचा थरकाप

हातामध्ये थरका येणे हे व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता असल्याची शक्यता आहे व्हिटॅमिन B6 ची कमतरता असल्यास काय खावे?

व्हिटॅमिन B6 (पायरीडॉक्सिन) शरीरातील मेंदूचे कार्य, रक्तनिर्मिती आणि पचनासाठी महत्त्वाचे आहे.

 

व्हिटॅमिन B6 भरपूर असलेले पदार्थ

फळे

केळी,पपई,अवोकाडो

 

भाज्या

बटाटा,गाजर,पालक

 

धान्य

ज्वारी, बाजरी

ओट्स

ब्राऊन राईस,कडधान्ये व सुकामेवा

हरभरा, मूग, मसूर

शेंगदाणे,बदाम, अक्रोड

 

प्रोटीन स्रोत

अंडी,चिकन,मासे

 

लक्षणे (थोडक्यात)

थकवा

चिडचिड किंवा मूड बदल,त्वचेवर पुरळ,ओठ फुटणे,रक्ताची कमतरता (अॅनिमिया)

 

टिप्स

संतुलित आहार ठेवा

जास्त प्रोसेस्ड फूड टाळा

डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या

टिप: रोजच्या आहारात केळी + कडधान्ये घेतल्यास B6 ची कमतरता सहज भरून निघते भाज्या (सर्वात महत्त्वाचे स्रोत)

 

 

डोळ्यांमध्ये कोरडेपणा

डोळ्यामध्ये कोरडेपणा येणे हे व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्याचे लक्षण आहे

व्हिटॅमिन A डोळ्यांचे आरोग्य, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

भाज्या (सर्वात महत्त्वाचे स्रोत)

गाजर,रताळे,भोपळा,पालक, मेथी (हिरव्या पालेभाज्या)

 

फळे

आंबा,पपई,खरबूज

 

दुग्धजन्य पदार्थ

दूध,दही,बटर

प्रोटीन स्रोत,अंडी (विशेषतः पिवळा बलक),मासे

 

वारंवार उचकी येणे

वारंवार उचकी येणे या मागे सगळ्यात मोठे कारण असू शकते ते पोटात गॅस किंवा आम्लपित्त त्यामुळे आपल्याला अन्याय नीट जाऊन खाल्ले पाहिजे व आम्लपित्त वाढणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत

 

 

नोट-ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे आरोग्यासंबंधी कोणत्याही समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button