सुशील देशमुखांची अपक्ष एन्ट्री; परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीची समीकरणे बदलली!
महायुती, महाआघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या तिरंगी लढतीत जातीय समीकरण, राष्ट्रवादीची भूमिका आणि 'लक्ष्मी अस्त्र' ठरणार निर्णायक?

“सुशील देशमुख ” युती आघाडीचे देव पाण्यात?
आम्ही वर्तवलेला अंदाज खरा ठरला.
परभणी हिंगोली, स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक तिरंगी होणार
हे आम्ही यापूर्वीच्या पोस्टमध्ये नमूद केले होते.
सुशील देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीने ही निवडणूक आता रंगतदार झाली आहे.
माजी आमदार सुरेश देशमुख यांनी परिपक्व राजकीय खेळी खेळत, सुशील देशमुख

यांना विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
गेल्या निवडणुकीत सुरेश देशमुख उमेदवार होते. मात्र ते बजोरिया यांना मॅनेज झाले
https://www.facebook.com/share/p/1GSZzL8k5v/
आणि अर्थपूर्ण व्यवहारातून त्यांनी निवडणुकीत कच् खाऊ भूमिका घेतली.
असा त्यांच्यावर आरोप होता.
पूर्वाश्रमीच्या नगर परिषदेच्या माध्यमातून सुरेश देशमुख यांनी बरेच वर्ष सत्ता भोगली आहे.
त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उत्तरार्धामध्ये मुस्लिम समाज आणि या समाजाचे प्रतिनिधित्व
हेही वाचा-10 हजार पावले चालण्याचे फायदे | वजन कमी करण्यासाठी आणि शुगर नियंत्रणासाठी
करणारे नगरसेवक यांच्यामध्ये सुरेश देशमुख यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आणि राग आजही खदखदत आहे.
सुरेश देशमुख यांचे चिरंजीव गणेश देशमुख हे गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत
आणि विद्यमान उपमहापौर देखील आहेत.
या कारणाने राजकीय पार्श्वभूमी नसलेले सुशील देशमुख ही कोरी पाटी सुरेश देशमुख
यांनी निवडणूक रिंगणात उतरवली आहे.
समोर महाआघाडीचे डॉक्टर विवेक नावंदर हे सक्रिय राजकारणात जरी असले
तरी मुरब्बी राजकारणी अशी त्यांची प्रतिमा नाही.
त्याचप्रमाणे सईद खान हे देखील एक कंत्राटदार आणि व्यापारी पार्श्वभूमी असलेले आणि राजकीय हेतू
साधण्यासाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा बुरखा पांघरलेले,त्याचप्रमाणे त्यांच्या मागे ईडी सारख्या संस्थांची
चौकशीचा फेरा लाग लेला असलेले उमेदवार. अशी त्यांची प्रतिमा आहे.
ही सर्व निवडणुकीतील उमेदवारांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन माजी आमदार सुरेश देशमुख
यांनी धुर्तपणे सुशील देशमुख यांची या निवडणुकीत एन्ट्री केली आहे.
महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुस्लिम महापौर दिला.
या भूमिकेचे भांडवल करत महायुतीतील घटक पक्षांनी आणि त्यांच्या बगलबच्चांनी
उबाठा सेनेवर प्रसार माध्यमातून आणि समाज माध्यमातून मोठा हल्ला चढवला.
त्याच महायुतीने आता विधानपरिषदेमध्ये मुस्लिम उमेदवार देऊन टीकेला वाट करून दिली आहे.
याच सोशल इंजिनिअरिंगचा फायदा घेत सुरेश देशमुख यांनी सुशील देशमुख यांना
निवडणूक रिंगणात उतरवून सामाजिक आणि जातीय समीकरणाचा मेळ घातला असल्याचे दिसून येत आहे.
हे समीकरण ध्यानात घेऊन सुरेश देशमुख हे सुशील देशमुख यांच्या विजयाची ग्वाही देत आहेत.
महायुतीच्या मतांच्या आकडेवारीवरून त्याचप्रमाणे महायुतीची नेत्यांची मोठी फौज कामाला लावून,
लक्ष्मी अस्त्राच्या जोरावर ही निवडणूक महायुती सहज जिंकेल असा अंदाज युतीचे नेते बांधत आहेत.
महाआघाडीत फूट पडल्यामुळे डॉक्टर विवेक नावंदर यांची अडचण नक्कीच झाली आहे.
मात्र आपल्या पक्षीय तसेच सामाजिक कार्यावर आणि आपल्या आजवरच्या सामाजिक व्यवहारावर डॉक्टर नावंदर यांना पूर्ण
विश्वास आहे. याच भांडवलावर आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास डॉक्टर नावंदर बोलून दाखवत आहेत.
मात्र वर करणी ही निवडणूक जेवढी सोपी आणि सरळ महायुतीला अथवा आघाडीला दिसते आहे, तेव्हडी ती सोपी नाही
सुशील देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीने या निवडणुकीची समीकरणे बदलवून टाकली आहेत. यात शंका नाही.
या निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका त्याचप्रमाणे जातीय समीकरण यासोबत लक्ष्मी अस्त्र निर्णायक घटक ठरणार आहेत .
तरी देखील या तीनही पैकी केवळ कुठलेही एक समीकरण कोणत्याही उमेदवाराला
विजयापर्यंत नेणार नाही हे मात्र खरे.समाज माध्यमातून एकच चर्चा सुरू आहे की,
जो जास्त पैसे खर्च करेल तोच विजयी.
आमच्या ग्रामीण भागाकडे एक म्हण आहे, “नोटांची गड्डी दाखवली तर माडीवरची पण खाली येते!”
मात्र ही म्हण पुण्याच्या बुधवारपेठेसाठी किंवा परभणीच्या मराठवाडा प्लॉट साठी लागू पडते.
सर्वच ठिकाणी ह्या तत्त्वावर विसंबून राहणे केवळ आत्मघात ठरेल.
वर सांगितलेल्या त्रिसूत्रीचा जो उमेदवार खुबीने आणि चतुराईने वापर करेल त्याचाच विजय या निवडणुकीमध्ये निश्चित होणार.
या सर्व पार्श्वभूमीवर माजी आमदार सुरेश देशमुख ही निवडणूक कशाप्रकारे हाताळतात
त्यावरच सुशील देशमुख हे या निवडणुकीत जायंट किलर ठरतात का?
हे पाहणे रंजक ठरेल.
या या माहितीचे लेखक प्रसिद्ध पत्रकार आबा शिंदे हे आहेत







