४,९१२ सामन्यांनंतर इतिहास! पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात फक्त फिरकीपटूंनी टाकली सर्व ५० षटके
वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी बांगलादेशविरुद्ध मीरपूर येथे लिहिला एकदिवसीय क्रिकेटचा नवा इतिहास

मीरपूर (ढाका) |
एकदिवसीय क्रिकेट फिरकी विक्रम

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तब्बल ४,९१२ सामन्यांनंतर असा दुर्मिळ प्रसंग घडला आहे. पहिल्यांदाच एका डावातील सर्व ५० षटके फक्त फिरकीपटूंनीच टाकली आहेत
मंगळवारी मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी हा अनोखा विक्रम केला.
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने एकही वेगवान गोलंदाज न वापरता पूर्ण डाव फिरकीवरच खेळवला. या सामन्यात बांगलादेशने २१३ धावांत ७ बाद असा डाव संपवला.
वेस्ट इंडिजचा गुडाकेश मोती हा या सामन्याचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ६५ धावा देत ३ बळी घेतले. त्याला केविन सिंक्लेअर,
हे ही वाचा-‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरू
हेही वाचा-हृदयरोग टाळण्यासाठी आवश्यक माहिती: कारणे, लक्षणे, तपासण्या आणि उपचार
अकील हुसैन आणि रोस्टन चेस यांनी उत्तम साथ दिली. या सर्वांनी मिळून संपूर्ण डावात नियंत्रण ठेवत बांगलादेशच्या फलंदाजांना मोकळा श्वास घेऊ दिला नाही.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम घडले, मात्र फक्त स्पिन गोलंदाजांनी पूर्ण ५० षटके टाकल्याचा हा पहिलाच प्रसंग ठरला आहे. ही घटना क्रिकेटप्रेमींसाठी एक अनोखी ऐतिहासिक नोंद ठरणार आहे.
https://www.icc-cricket.com/matches/266876/bangladesh-vs-west-indies







