Advertisement
महाराष्ट्र

बोलेरो व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू एक जखमी हिंगोली नांदेड महामार्गावर अपघात

Advertisment

हिंगोली प्रतिनिधी-दत्तात्रय बोडखे
कळमनुरी तालुक्यातील हिंगोली नांदेड महामार्गावर कुर्तडी शिवारामध्ये २३मार्च शनिवार
रोजी बोलेरो व दुचाकींचा भिषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एका जणांचा
जागीच मृत्यु झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे,

हिंगोली नांदेड महामार्गावर कुर्तडी शिवारात २३ मार्च शनिवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता
हिंगोली कडून वारंगा फाटा कडे जाणाऱ्या बोलेरो एम एच१२ व्हीसी ८०१४ व दुचाकी
एम एच ०६ बी क्यू ९८४३ चा भीषण अपघात झाला
भोसी येथील राहुल उर्फ सुरज दत्तराव भालेराव वय २८ वर्ष व श्याम शंकरराव देवकते व
२५ वर्ष हे दोघेजण राहणार भोसी ता कळमनुरी येथील असून हे दोघेजन भोसी येथून दुचाकी
ने वारंगा फाटा कडे जात असता हिंगोली कडून येणाऱ्या बोलेरो गाडी सोबत अपघात झाला या
अपघातात दुचाकीवरील राहुल उर्फ सुरज दत्तराव भालेराव याचा जागी मृत्यू झाला तर श्याम देवकते
हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी वारंगा फाटा येथील खाजगी रुग्णालयात
उपचाराकरता दाखल केले चार चाकी बोलेरो वाहनाचा चालक फरार असून वाहन घटनास्थळी
असल्याचे जमादार रोहिदास राठोड यांनी सांगितले आहे,घटनास्थळी आखाडा बाळापूर
स,पो,नि, सुनील गोपींनवार व वारंगा फाटा पोलीस मदत केंद्राची कर्मचारी घटनास्थळी हजर झाले,

Advertisement

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button